जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी – WALMI- Water And Land Management Institute) महाराष्ट्र शासनाने १९८० मध्ये स्थापन केली. औरंगाबाद शहरापासून सहा किमी अंतरावर असलेली ही संस्था स्वायत्त आहे. जल व भूमी या संसाधनांचा एकात्मिक विचार करून पाणी- जमीन – पीक यांच्या परस्पर संबंधांचा कार्यक्षम वापर व्हावा, म्हणून शेतकरी ते अभियंते यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते. शेतकरी तसेच शेतीत काम करणाऱ्या स्त्रिया यांना जल व भूमी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी येथे काही विशेष प्रयोग राबविले जातात. शेतकऱ्यांना प्रयोगशाळेत काम करण्याची संधी दिली जाते. सिंचनाच्या विविध पद्धती, ठिबक व तुषार सिंचन, पाण्याची मोजणी, जमिनीतील ओलावा मोजणे हे प्रत्यक्ष शेतीत काम करून शिकता येते. त्यासाठी स्थापत्य अभियंते, कृषी अभियंते, कृषी शास्त्रज्ञ, संगणक शास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ हे सर्व एकत्रितपणे काम करून शेतकऱ्याला तसेच जलसंपदा खात्यात काम करणाऱ्या अभियंत्याला प्रशिक्षण देतात.
वाल्मीने यासाठी स्वत: अनेक चित्रफिती निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांना उपयुक्त असे संशोधन येथे केले जाते. त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतावर केला जातो. काही वेळेस प्रत्यक्ष शेतावरच प्रयोग करतात. दुष्काळी भागासाठी जलव्यवस्थापन कसे करावे, पाणी वापर संस्थांचा व्यवहार कसा चालवावा, प्रवाहाचे मापन करून शेतकऱ्याला पाण्याचे बिल कसे द्यावे, कालव्यातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद पाइपद्वारे पाणी वितरण व्यवस्था कशी तयार करावी, ठिबकद्वारे होणारी पाण्याची बचत, असे अनेक संशोधन प्रकल्प, कृती कार्यक्रम संस्थेने त्या त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी येथे मराठी प्रकाशने उपलब्ध आहेत. प्रकाशनाद्वारे विविध संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. शेती व सिंचनासंबंधी नियम करणे, पाणी वापर संस्थांच्या कार्यपद्धतीत सुधारणा सुचविणे, सिंचन कायद्याचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे ही काय्रेदेखील वाल्मी करते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची संधी तसेच मागणीनुसार प्रशिक्षण देण्याची सुविधाही वाल्मीमध्ये आहे.                                          
उपेंद्र कुलकर्णी (नांदेड)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १२ मार्च
१८४७ > रसायनशास्त्रावरील २२ पुस्तके लिहून मराठीत विज्ञान-पुस्तकांची वाट रुंद करणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. इतिहासलेखनातही रस असल्याने त्यांनी ‘फेरिस्ता’च्या आधारे दक्षिणेतील मुसलमानी राज्याचा इतिहास लिहिला तसेच ख्रिस्ती सन, तारीख आणि शक-तिथी यांचा मेळ घालणारी काळ-जंत्री (मोडक-जंत्री) तयार करण्याचे मोठे कामही त्यांनी केले.
१८९१ > ‘बहुरूपी’ या अप्रतिम आत्मचरित्रातून मराठी रंगभूमीच्या वाटचालीला उजळा देणारे श्रेष्ठ दिवंगत अभिनेते आणि नाटय़दिग्दर्शक चिंतामण गणेश कोल्हटकर यांचा जन्म. ‘बहुरूपी’ या पुस्तकाची गणना अव्वल आत्मचरित्रांत होते. याखेरीज ‘माझे नाटककार’ हे पाच लेखकांचा चिकित्सक वेध घेणारे पुस्तक  तसेच ‘पुण्यावतार’ हे स्वतंत्र नाटकही त्यांनी लिहिले होते. अर्थात, नट म्हणून त्यांचे स्थान अनन्य होते.
१९१५ > सात खंडांत ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, तसेच आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे दोन खंड लिहिणारे ज्येष्ठ दिवंगत संशोधक डॉ. अच्युत नारायण देशपांडे यांचा जन्म. ‘चिपळूणकर दर्शन’, ‘केशवसुत : नवे दर्शन’ आणि ‘विदर्भाचे मानकरी’ ही पुस्तके अनांनी लिहिली.
संजय वझरेकर

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
An appeal to complain to district administration if If not given leave for voting
मतदानाला सुट्टी न देणे महागात पडणार
Pune, Pune Ring road
पुणे : आचारसंहितेमुळे रिंगरोडच्या भूसंपादनाला ब्रेक

वॉर अँड पीस : निद्रानाश- भाग २
निद्रानाश विकारात झोप न येणे याबरोबरच पुढील लक्षण समूहांचा वेगवेगळा विचार केला व नेमक्या कारणांचा मागोवा घेतला तर उत्तम झोपेचा लाभ निश्चितपणे होतो.
लक्षणे- १) उन्माद, अपस्मार, चेहरा ओढणे, डोळे तारवटणे, २) पोटात वायू धरणे, गुडगुड, पोट फुगणे, भरल्यासारखे वाटणे, दुखणे. ३) शौचास साफ न होणे, पुन:पुन्हा जाणे, जंत वा कृमी असणे. ४) कंबर, पाठ, हातापायांचे सांधे दुखणे, ५) रक्ताल्पता, थकवा, अनुत्साह, आळसावणे, ६) तीव्र ताप व चढउतार असणे. ७) नेत्रदाह, लाली, तळहात, तळपाय व लघवीची आग, ८) अंगाला खाज सुटणे, श्वास लागणे, जिवाची उलघाल, उलटय़ा वा जुलाब होणे.
 कारणे- १) मानसिक विकार- मन दुर्बल होणे, कमकुवत होणे, त्यामुळे दैनंदिन साध्यासोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्न, संकटे यांच्या विचारामुळे झोप न येणे. उन्माद, अपस्मार, भय या विकारामुळे वेळीअवेळी गुंगीत असणे. त्यामुळे वेळेत झोप न येणे. २) अजीर्ण- रात्री खूप उशिरा जेवणे. रात्री नेहमीपेक्षा जास्त जेवणे, जड पदार्थ खाणे, विशेषत: वायू पोटात धरेल असे शेव, भजी, चिवडा, मांसाहार, आइस्क्रीम, कोल्ं्रिडक, लस्सी, बर्फ इ. घेणे. मलावरोध, कृमी, जंत यांची खोड असणे. ३) जखम- निरनिराळय़ा शस्त्रकर्मामुळे व आघातांमुळे झालेल्या जखमेचा ठणका, पू, ताप यामुळे झोप न येणे, शय्याव्रण, प्रसूतीच्या काळी प्रसूतीनंतर झोप न येणे. ४) वातविकार- अर्धागवात, संधिवात, गृध्रसी, सायटिका, आमवात या विकारांत झोप न येणे. ५) श्रम व दुबळेपणा- शारीरिक श्रम अधिक झाल्यामुळे झोप न येणे. ताकदीचे बाहेर काम पडणे व त्या प्रमाणात शरीराचे पोषण न होणे. आहारामध्ये संतुलन नसणे. काही कारणांनी शरीरातून रक्त कमी होणे, रक्तस्राव होणे.  ६) ज्वर व पित्तविकार- तापाचे मान खूप असणे, तापामध्ये चढउतार असणे. डोळे, हातपाय, सर्वाग यांची आग होणे.  ७) दमा, शीतपित्त, कावीळ, रक्तदाबवृद्धी आदींमुळेही निद्रानाशाचा त्रास होतो.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : सुखलोलुपता- लयलूट
मागच्या लेखात चारच मजले लिफ्ट किंवा उद्वाहक चढणार असला तरी पंखा लावणाऱ्या व्यक्तीबद्दल मी लिहिले. एका अर्थाने अशा प्रकारे पंख्याचे बटण दाबणे हा एक चाळा असला तरी त्यात बरेच काही दडलेले आहे. माणसांना पृथ्वीवरच्या वातावरणावर कब्जा करून त्याला नमवायचे आहे. हे एक प्रकारचे आक्रमण शोषण आहे. मध्यंतरी मध्य मुंबईतल्या एका पाच मजली इमारतीचे चित्र छापून आले होते त्या इमारतीच्या दर्शनी भागावर मोजून २५ वातानुकूल यंत्र होती. त्याचे पाणी खाली गळत असणार हे पाणी ज्या पदपथावर गळते तिथे फेरीवाले किंवा इतर तत्सम मंडळी असतात. ही झोपडपट्टीत राहतात आणि स्थिरस्थावर होईपर्यंत विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरतात. यांना संरक्षण देणारे छोटे-मोठे म्होरके असतात. अशा म्होरक्यांच्या पुढे आणि मागे नगरसेवक असतात. हे नगरसेवक या गरिबीने कळवळतात मग त्यांना अधिकृत वीज देतात. त्यातही मीटरमध्ये फेरफार होतात. या बदल्यात नगरसेवकांना गठ्ठा मते मिळतात. अशी खिरापत चालू असल्यामुळे विजेचा तुटवडा होतो. तुटवडा, चोरी आणि गलथान कारभार यामुळे विजेचे भाव वाढतात. आकडा टाकणाऱ्या झोपडपट्टीवाल्यांसारखेच राज्याचे मुख्यमंत्री असतात. आपल्याला मते मिळावीत म्हणून हे दिलेल्या परवान्यापेक्षा आपल्या प्रांतात जास्त वीज खेचतात त्यामुळे आंतरप्रांतीय विजेचे जाळे कोलमडते आणि सगळीकडेच अंधार होतो. मग एकमेकांवर दोषारोप होतात. विजेची मागणी वाढतच जाते. एका घरात दोन टेलिव्हिजन येतात आणि सगळ्या झोपडय़ांवर टीव्हीचे खांब उभे राहतात. प्रत्येकजण ‘मला का नाही?’ असा प्रश्न विचारतो. काही काही लोक सगळे घरच वातानुकूल करतात आणि म्हणतात आमच्या घरात तीन संगणक आहेत म्हणून ही वातानुकूल यंत्रे बसवली आहेत. असल्या यंत्रामुळे चांगली झोप लागते याच्या जाहिराती होतात. चाळीत, गावांमधून पंख्याशिवाय ज्यांना गाढ झोपा लागल्या आणि ज्यांनी त्या परिस्थितीत उत्तम अभ्यास करून आपली कारकीर्द केली त्यांना ए. सी. गाडीतून उतरून घरात जाईपर्यंत घामाच्या धारा फुटतात. मग घरात गेल्याबरोबर पंखा किंवा ए. सी. चालू केला जातो. त्यामुळे यांचा उत्साह द्विगुणीत होतो. मग त्यामुळे घरी आणि दारी यांच्या हातून भरीव कामगिरी होते. पूर्वी एसी नव्हता त्या वेळच्या यांच्या कामगिऱ्या बहुतेक पोकळ असणार. घरी आल्यावर बहुतांश जोडप्यांमध्ये मात्र एक वादाचा मुद्दा असतो. बहुतेक बायकांना जास्त उकडते. कधी कधी उलटे असते. त्यामुळे झोपायच्या खोलीत पंखा कितीवर आणि एसी किती याबद्दल नेहमीच वाद असतो, पण एकत्रच एसी लावून झोपतात. त्यामध्ये एकाला खूप मोठा स्वार्थत्याग करावा लागतो, पण निरनिराळ्या खोल्यांमध्ये झोपण्याची छाती नसते. कारण लोक काय म्हणतील, अशी भीती वाटते.
रविन मायदेव थत्ते-  rlthatte@gmail.com