अमेरिकन राजधानीची जागा निवडताना असा ठराव झाला होता की, ती जागा तेरा वसाहतींपकी कुठल्याही वसाहतीत नसावी. जॉर्ज वॉिशग्टननी सुचविलेली जागा मेरीलॅण्डमध्ये होती. त्यामुळे मेरीलॅण्ड आणि नदीला लागून असलेल्या व्हर्जििनया या दोन वसाहतींनी आपापली काही जमीन या होऊ घातलेल्या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियासाठी देण्याची तयारी दाखवली. ती जमीन घेऊन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाची नगररचना केली गेली. संपूर्ण डीसीचे चार भाग केले असता ते चार चतकोर जिथे मिळतात त्या जागेवर कॅपिटॉल आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचे नियोजित निवासस्थान म्हणजे व्हाइट हाऊस बांधायचे ठरले. कॅपिटॉल म्हणजे संयुक्त संस्थानांचे मुख्यालय, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट असलेली वास्तू. डी.सी.मधील सर्व रस्त्यांची मोजणी कॅपिटॉल इमारतीपासून केली जाते. आधी ठरवलेली जमीन कमी पडू लागल्याने मेरीलॅण्ड आणि व्हर्जििनयाची आणखी जमीन डीसीमध्ये जोडण्यात आली. सध्या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या कालव्हर्ट, चार्ल्स, फ्रेडरिक, माँटगोमेरी आणि प्रिन्स टाऊन या काऊंटीज मेरीलॅण्डमध्ये तर आíलग्टन, फेयरफॅक्स, प्रिन्स विल्यम, स्टॅफोर्ड आणि लाऊडन या काऊंटीज व्हर्जििनयात आहेत. अमेरिकन संयुक्तसंस्थानाच्या राजधानीचे ठिकाण नक्की झाल्यावर फेडरल गव्हर्मेटची विविध कार्यालये, कॅपिटॉल इमारत, अध्यक्षीय निवासस्थान, कर्मचारी आणि इतर नागरिकांसाठी निवासस्थाने, रस्ते आणि इतर नागरी सुविधा पूर्ण होण्यासाठी पुढची दहा वष्रे लागतील असा प्राथमिक अंदाज होता. वॉिशग्टनमधील सर्व व्यवस्था पूर्ण होईपर्यंत राजधानी न्यूयॉर्कमध्ये राहावी असा निर्णय झाला आणि तिथे पहिली काँग्रेस भरवली गेली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
चुना खाणारी झाडे
समोरच्या जुन्या चाळीच्या भिंतीवर एक वडाचं झाड वाढतंय. हावरा येथील प्रसिद्ध वनस्पती उद्यानात पसरलेले वडाचे झाड, पाँडेचरीच्या ओरोवीलमधील वडाचे झाड, वडोदऱ्यामधील उंच वाढलेली वडाची झाडं; अशा अनेक वडांची श्रीमंती मनावर बबलेली असल्याने पडक्या भतीवर वाढणारा वड पाहून मन खट्ट झाले. हा बिचारा वड अन्न-पाण्याशिवाय कसा जगत असेल? भिंतीत काय अन्न असणार, चुना-विटा-सिमेंटमधून पाणी कसे मिळणार?
पण हा वड तर व्यवस्थित दिसतोय. गेल्या वर्षभरात ५-६ फांद्यांवर चांगली २५-३० पानं आली आहेत. मनगटाएवढय़ा जाडय़ा बुंध्यापासून बोटांसारखी ४-५ मुळे भिंतीला धरून वाढत आहेत. ही मुळे दिवसेंदिवस लांब जाडी मजबूत होत जातील, त्यांच्या फांद्यांचा पसारा भिंतीवर वाढत जाईल आणि एक दिवस झाडाचे वजन सहन न होऊन भत कोसळेल. भिंतीबरोबर पडलेले झाड आपली मुळे जमिनीवर पसरेल आणि भतीच्या मदतीशिवाय उभे राहील. भिंतीच्या पराजयातून झाडाचा विजय होईल. चुन्यावर वाढणाऱ्या सर्वच वनस्पती अशाच असतात का? आपल्या आधाराला मारक ठरणाऱ्या? चुना आणि झाड यांचे नाते सगळीकडे असेच असते का? चुना खाणीचा परिसर पाहिल्यावर वेगळे दिसते.
मध्य इंग्लंडमधल्या ‘पीक’ ड्रिस्ट्रिक्टमध्ये अफाट पसरलेली जगातील सर्वात मोठी चुन्याची खाण आहे. तेथील पांढऱ्या करडय़ा खडीवर अनेक झाडेझुडपे वाढतात. झाडांवर पक्षी येतात. गवतावर गुरे चरतात. या चुनखडीवर जगणारी एक परिसंस्थाच आहे. थोडक्यात काय? तर जरुरीपेक्षा जास्त कॅल्शियमबरोबर माफक प्रमाणात का होईना; पण इतर अन्नद्रव्यं मिळाली तर अशा असंतुलित अन्नावर आयुष्य काढणाऱ्याही वनस्पती आहेत. त्यांच्यातील काही वनस्पती चुना (कॅल्शियम) खाऊन पचवतात. वड, िपपळ, धायती, एकदांडी, काही नेचे, मॉस ही याची उदाहरणे आहेत. अशा सर्व वनस्पतींना ‘कॅलसिफाइटस’ म्हणतात. काही वनस्पती चुन्यावर वाढू शकत नाहीत. चुन्यावर त्या खुरटतात, मरतात. अशा वनस्पतींना ‘कॅलसिफोब्स’ म्हणतात. पावसाळ्यात िभतीवर रुजणारे बी लवकरच मरून जाते; ते त्यांना चुना सहन होत नाही म्हणून.

– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org