१७६० साली अमेरिकन काँग्रेसने रेसिडेन्स अ‍ॅक्ट मंजूर करून अध्यक्ष जॉर्ज वॉिशग्टन यांना नवीन राजधानीसाठी ठिकाण निवडण्याचे अधिकार दिले. जॉर्जनी निवडलेल्या जागेवर कॅपिटॉलची नियोजित इमारत आणि अध्यक्षीय निवासस्थानासाठी फ्रेंच वास्तुविशारद पियरे एल एनफंट याची नियुक्ती झाली. पण त्याने तयार केलेला आराखडा तत्कालीन सेक्रेटरी ऑफ स्टेट थॉमस जेफरसन यांना पसंत पडला नाही. त्यांनी मग कॅपिटॉलच्या इमारतीसाठी वास्तुरचनाकारांमध्ये स्पर्धा ठेवली आणि त्यासाठी ५०० डॉलर्सचा पुरस्कार ठेवला. या स्पध्रेत विल्यम थार्नटन या वास्तुविशारदाचा आराखडा स्वीकारला जाऊन १७९३ साली कॅपिटॉल इमारतीच्या बांधकामास प्रारंभ झाला. या इमारतीसाठी ‘कॅपिटॉल’ हे नाव थॉमस जेफरसन यांनी सुचविले. कॅपिटॉल या लॅटीन नावाचे रोममध्ये ज्युपिटरचे मंदिर होते. कॅपिटॉलच्या मूळ आराखडय़ानुसार ठरलेले बांधकाम १८०० साली पूर्ण झाले; परंतु वेळोवेळी होत गेलेल्या बदलांमुळे आणि वाढत गेलेल्या कामांमुळे कॅपिटॉलची इमारत १८२६ साली पूर्ण झाली. ही वास्तू पूर्ण होईपर्यंत एकूण अकरा वास्तुविशारदांनी मूळ आराखडय़ात बदल केले. इमारतीच्या मुख्य घुमटाचा आराखडा थॉमस वाल्टेरचा होता. पूर्ण झालेल्या कॅपिटॉलच्या वास्तूची लांबी ७५१ फूट, रुंदी ३५० फूट आणि उंची २८८ फूट आहे. वॉिशग्टन शहरातील ५५५ फूट उंच असलेले वॉिशग्टन मेमोरिल हे सर्वाधिक उंच बांधकाम आहे. त्याच्याहून अधिक उंचीचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. कॅपिटॉल हिल या लहानशा टेकडीवजा उंचवटय़ावर उभ्या असलेल्या कॅपिटॉल या इमारतीत अमेरिकन काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्ज आणि सेनेटची सभागृहे, न्यायालये आणि अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या फेडरल गव्हर्न्मेंटच्या मुख्यालयीन कचेऱ्या आहेत.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

वनस्पतींमधील अनुकूलन- १

वनस्पती आणि सर्वच सजीव ज्या परिसरात जगत असतात त्यातील वातावरणाशी जुळवून  घेताना दिसतात. त्यांच्या बाह्य़ांगात आंतर्रचनेत तसेच त्यांच्या शरीरांर्तगत व्यवहारात बदल घडलेले दिसतात. या जुळवून घेण्याला वनस्पतींचे अनुकूलन असे म्हणतात.

वनस्पतींच्या अधिवासांतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार शरीरात उपयुक्त बदल घडलेले असतात त्यांच्या पानांचे कार्य खोडे करतात, मुळांचे कार्य पाने करतात. ‘पोडोस्टेयॉन’ या वनस्पतीत फक्त मूळ अस्तित्वात असते. ते मूळ प्रकाशसंश्लेषण आणि प्रजननाचेही कार्य करत असते. वनस्पतींच्या अनुकूलनानुसार त्यांचे वर्गीकरण पाण्यात किंवा पाणथळ जागेत राहणाऱ्या वनस्पती (हायड्रोफाईटस), पाण्याच्या योग्य मात्रेत उपलब्ध असणाऱ्या वनस्पती (मेझोफाईट्स) आणि पाण्याच्या दुíभक्षात जगू शकणाऱ्या वनस्पती (झिरोफाईट्स) असे केले जाते.

हायड्रिला, व्हॅलिसनेरीया, सेरॅटोफायलम, युट्रिक्युलेरीया, कारा वनस्पती सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या असतात. या वनस्पतींना आधार तसेच आवश्यक खनिजे पाण्यातूनच  मिळतात. त्यातील पुष्कळांचे प्रजननदेखील पाण्याच्या माध्यमातून होते. या कारणांमुळे या वनस्पतींच्या शरीराच्या आत किंवा बाहेर कुठल्याही प्रकारची पेशी किंवा पेशीजाल नसते. त्यांचे शरीर मृदू, नाजूक आणि हिरवेगार असते आणि त्यांच्या शरीरावर श्वसनरंध्रे नसतात.

िशगाडा, जस्सीया, जलकुंभी, सल्विनिया, पिस्टिया, अझोल्ला वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात त्यांची मुळे पाण्याच्या आत सुरक्षित असल्याने फक्त खनिजांचे आणि पाण्याचे शोषण एवढेच त्यांचे कार्य असते. या वनस्पतींच्या पानाची त्वचा मेणासारख्या पदार्थाने किंवा केसांनी आच्छादित असते. त्यामुळे ती हवेत सुकत नाही किंवा पाण्यात कुजत नाही. या वनस्पतींचे प्रजनन वारा किंवा कीटकांद्वारे होते. िशगाडा व सॅल्वीनिया या वनस्पतींची पाण्याच्या पृष्ठभागाखालची काही पाने तंतुमय मुळांमध्ये रूपांतरित झालेली असतात व मुळांप्रमाणेच शोषणाचे काम करतात. याउलट जस्सीया या पाण्यावर तरंगणाऱ्या (३) वनस्पतींची मुळे त्यांच्यातील वायुयुक्त पोकळ पेशींमुळे हलकी व फुगीर होतात. त्यामुळे ही वनस्पती पाण्यावर तरंगण्यास मदत होते तसेच ती पाण्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाच्या दिशेने वाढतात. ही मुळे त्यांचे नेहमीचे, वनस्पतींना आधार देण्याचे आणि खनिजांचे शोषण करण्याचे काम करत नाहीत.

डॉ. रंजन देसाई

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org