News Flash

अणूचं वजन

अणू-रेणू म्हणजे आपल्या दृष्टीनं या विश्वातली लहानातली लहान वस्तू.

अणू-रेणू म्हणजे आपल्या दृष्टीनं या विश्वातली लहानातली लहान वस्तू. नुसत्या डोळ्यांना तर ती दिसतच नाही, पण शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्राची मदत घेतली तरीही ते शक्य होत नाही. मग त्याचं वजन तरी कसं करायचं, हा प्रश्न बिट्टय़ाला सतावत होताच.

पण मग ही वैज्ञानिक मंडळी हायड्रोजनचं वजन १, कार्बनचं १२ तर युरेनियमचं २३३ वगरे छातीठोकपणे सांगतात ते कसं काय? म्हणून बिट्टय़ानं त्यांनाच विचारलं की, कार्बनच्या अणूचं वजन १२ काय? १२ ग्रॅम की १२ किलोग्रॅम की जुन्या वळणाचे असाल तर १२ रत्तल? तेव्हा कुठं स्पष्ट झालं की अणूचं वजन अ‍ॅटॉमिक मास युनिट (एएमयू), मराठीत सांगायचं झालं तर ‘आण्विक-वस्तुमान-एकक’मध्ये म्हणजेच ‘आवए’ मध्ये मोजलंजातं. तरीही प्रश्न उरतोच की एक एएमयू म्हणजे किती?

तर त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण परत एकदा अ‍ॅव्होगॅड्रोचा धावा करायला हवा. त्यानं सांगितलं होतं की, ‘कोणत्याही मूलतत्त्वाच्या अणूभाराइतक्या ग्रॅममध्ये तब्बल ६ x १०२३ इतके अणू असतात’. दुसऱ्याच शब्दांमध्ये सांगायचं तर १२ ग्रॅम कार्बनमध्ये तितके अणू असतात. आता या माहितीचा उपयोग करून साध्या त्रराशिकाच्या मदतीनं आपण कार्बनच्या एका अणूचं वजन काढू शकतो. पण ते तर १२ एएमयू इतकं होईल. कारण कार्बनच्या अणूमध्ये तब्बल सहा प्रोटॉन आणि सहा न्यूट्रॉन असतात. उलटपक्षी एएमयूची व्याख्या केवळ एकच प्रोटॉन असलेल्या हायड्रोजनच्या अणूवरून ठरवली गेली आहे. तेव्हा एक एएमयू म्हणजे किती याचं उत्तर द्यायचं झाल्यास आपल्याला हायड्रोजनच्या अणूच्या वजनाचंच मोजमाप करायला हवं. तेही याच पद्धतीनं करता येईल.

म्हणजे एक ग्रॅम हायड्रोजनमध्ये परत अ‍ॅव्होगॅड्रोच्या संख्येइतकेच अणू असतात. तेव्हा ६ x १०२३ इतक्या हायड्रोजनच्या अणूंच वजन जर एक ग्रॅम तर एका अणूचं किती? ते होईल १.६६ x १०-२४ ग्रॅम. आता एका प्रोटॉनचं वजन किती आणि हो न्यूट्रॉनचंही, असा प्रश्न बिट्टय़ानं तुम्हालाच विचारला आहे. देऊ शकाल त्याचं उत्तर?

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

डॉ. यू. आर. अनंतमूर्ती – विचार

१९९४ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनंतमूर्ती म्हणतात, ‘‘ज्या भाषेला कमीत कमी एक हजार वर्षांची परंपरा आहे अशा कन्नड भाषेत मी लिहितो. या भाषेने लोकस्मृती, संस्कृतीची कालातीत चिरंतन स्मृती जिवंत ठेवली आणि आमच्या काळात आम्हाला युरोपच्या प्रभावापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा, तो प्रभाव पचवून वर उठण्याचा उपायही शिकवला आहे, पण हेही तितकेच खरे आहे, की जर तुमचा तुमच्या परंपरेशी झगडा झाला नाही, तर वर्तमानकाळातही काही लेखन झाले नसते आणि हा झगडा स्वत: स्वत:शीच केलेला झगडा असतो. या प्रकारे प्रत्येक नवी रचना ही एका नव्या जीवनाकडे सुरू केलेली वाटचाल असते आणि ज्यांनी आम्हाला तरंगत ठेवले त्या पूर्वसुरींकडे परत येणेदेखील असते. परंपरेशी माझा झगडा कुणा बाहेरील व्यक्तीप्रमाणे नसून परंपरेत राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे आहे. त्यामुळे मी स्वत:ला गुणदोषांचे विवेचन करणारा विद्यार्थी मानतो. कन्नड परंपरेकडूनही माझ्या या प्रयत्नात मार्गदर्शन मिळते.

डॉ. लोहिया यांच्या लिखाणातून मला सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नासंबंधी एक दृष्टिकोन मिळाला. त्याबद्दल मी आजही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे, कारण त्यामुळेच मी मला पाश्चिमात्यांच्या क्रांतिकारी विचारांचे अंधानुकरण करण्यापासून वाचवू शकलो जे आमच्या युगातील महान सर्जनशील मनस्वी व्यक्तिमत्त्व होते.

माझ्यासाठी ज्या आठवणी रूपकांचे भांडार आहेत, त्यांच्या आठवणीवरच मी जगतो आणि लिहितो. सुरुवातीच्या आयुष्यातील आठवणींनी माझ्या मनात आपल्या संस्कृतीविषयी नेहमीच एक दुविधा उत्पन्न केलेली आहे. मी असे यासाठी म्हणतोय, की रूढीवादी वातावरणात राहणे केवळ दम घुसमटवणारे नव्हते, तर या छोटय़ाशा जगात मला काही असे अनुभव आले, की ते आध्यात्मिक दृष्टीने माझ्यासाठी आजही मार्मिक आणि रहस्यमय आहेत.

जर आपण असा विचार केला, की आपण लेखक आहोत आणि त्यामुळे कुणी विशेष आहोत, आपण केवळ कलेच्याच साधनेत मस्त राहू, तर क्षुद्र सौंदर्यवादाच्या गर्तेत पडू शकतो. आपल्या स्मृतींना जपून ठेवणाऱ्या लोकतांत्रिक समाजात लेखक एक सौम्य, मननशील सहनागरिकदेखील असतो. आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्याला पटविण्याची ताकद आपल्या शब्दांत आहे यावर त्याचा विश्वास असतो.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:51 am

Web Title: what is the weight of atom
Next Stories
1 अनंतमूर्ती यांची सर्वोत्तम कादंबरी
2 अनंतमूर्ती यांचे कादंबरीलेखन
3 अर्धायूचे मापन
Just Now!
X