एक ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून भारतात आलेला, परंतु धर्मप्रसारापेक्षा भारतीय भाषांच्या अभ्यासात अधिक रममाण होणारा तसेच लोककल्याणकारी कामे करणारा, आपल्या आयुष्याचा निम्मा अधिक काळ भारतीय प्रदेशात व्यतीत करणारा, अशी ओळख आहे विल्यम कॅरे या इंग्रज माणसाची.

विल्यम कॅरे हे मराठी भाषेचे व्याकरणकार, कोशकार, मराठी भाषेतील ग्रंथांच्या देवनागरी लिपीतील मुद्रणाची सुरुवात करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, मराठी व्याकरणकार, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. इंग्लंडच्या नॉर्दम्प्टन परगण्यातील एका खेडय़ात १७६१ साली जन्मलेल्या विल्यमच्या घरच्या गरिबीमुळे त्यांचे फारसे शिक्षण झाले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एका चर्मकाराकडे उमेदवारी केली. चर्मकाम करीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून विल्यमला मिशनरी कामाची प्रेरणा होऊन त्यांनी चर्मकाराकडील काम सोडले आणि बॅप्टिस्ट ख्रिश्चन पंथात दाखल झाले. विल्यम कॅरे पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून १७९३ मध्ये भारतात आले. भारतात येण्यापूर्वीच त्यांनी हिब्रू, ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास करून काही धार्मिक पुस्तिकाही लिहिल्या होत्या. इंग्लंडमधील ‘बॅप्टिस्ट मिशनरी सोसायटी’तर्फे विल्यम कॅरे कलकत्त्यात आले आणि आपल्या धर्मप्रसाराच्या कार्याला लागले. परंतु त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर अनेक निर्बंध घातले असल्याने विल्यम कॅरेंनी कलकत्त्याजवळच्या मदनावती येथील एका निळीच्या कारखान्यात नोकरी धरली.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
us ambassador to india
“भविष्य घडवायचं असेल, तर भारतात या”; अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचं कौतुक
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’

पुढे १७९९ ला हा नीळ-कारखाना बंद पडून कॅरेंच्या पुढे आता काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. त्याच दरम्यान इंग्लंडहून मिशनच्या कामासाठी ग्रांट, मार्शमन वगरे चौघे धर्मप्रसारक कलकत्त्यास आले.

या चौघांची कॅरेंशी भेट झाल्यावर त्यांनी १८०० साली कलकत्त्यापासून २९ कि.मी.वर असलेल्या श्रीरामपूर येथे एका डॅनिश वसाहतीत आपल्या बॅप्टिस्ट मिशनचे कार्य सुरू केले. श्रीरामपूर मध्ये डॅनिश वसाहत असल्यामुळे इथे मिशनच्या कार्यात ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नव्हती. यांनाच ‘सेराम्पोर मिशनरीज’ म्हणून ओळखले जाते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com