ढगफुटी म्हणजे अकस्मात, कुठलीही पूर्वसूचना न देता तात्पुरत्या काळासाठी कोसळणारा मुसळधार पाऊस. ढगफुटीमध्ये सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. ही घटना पर्वतीय भागात जास्त आढळते पण सपाट मैदानी प्रदेशसुद्धा आता त्यास अपवाद राहिलेले नाहीत. ही एक पावसाळय़ात घडणारी असाधारण नैसर्गिक घटना आहे. काही मिनिटांत अनेक मिलिमीटर पाऊस कोसळतो. ६ ऑगस्ट २०१० रोजी लेह, लडाख येथे एका मिनिटात ४८ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आणि तो जागतिक विक्रम ठरला. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला, किती तरी बेपत्ता झाले. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईला १० तासांत प्रचंड पाऊस झाला आणि मोठी जीवितहानी झाली. या सर्व ढगफुटीच्याच घटना होत्या.

ढगफुटी ही स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. जेव्हा नैसर्गिक पद्धतीने पाऊस पडू लागतो तेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर तयार झालेली गरम हवा या थेंबांना खाली पडू न देता, त्यांचे बाष्प करून परत ढगाकडे पाठवते. ढगामध्ये हे बाष्परूपी थेंब आणि मूळचे थेंब यांची गर्दी होते, या थेंबाच्या एकत्रीकरणामुळे त्यांचा आकार मोठा होतो, ढगात अब्जावधी थेंबांची गर्दी होते त्यामुळे ढगाचे आकारमान, घनता आणि वजन वाढते अशा वेळी खालून वर आलेली उष्ण हवा जी या ढगांना तोलून ठेवत असते ती विरळ होऊ लागते आणि पाण्याने भरलेले हे ढग वेगाने खाली येऊ लागतात, त्यांचे आपआपसात घर्षण वाढते. त्यामुळे गडगडाट होऊ लागतो, विजा चमकू लागतात आणि एका विशिष्ट क्षणी ढग फुटून प्रचंड मोठय़ा पावसास सुरुवात होते. या पावसाचे थेंब आकाराने मोठे असतात आणि त्यांचा खाली येण्याचा वेग ८० ते ९० किलोमीटर एवढा असू शकतो. पर्वतीय भागात असे बाष्प थेंबांनी थबथबलेले ढग लहान-मोठय़ा शिखरांना धडकतात आणि ढगफुटी होते.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

ढगफुटी ही प्रतिरोध (ओरोग्राफिक लिफ्ट), अपड्रॉप (अपड्रॉप) आणि संघनन (कन्डेन्सेशन) या तीन घटकांना जोडलेली आहे. प्रतिरोधमध्ये भूपृष्ठावरील गरम हवा ढगातील थंड हवेला मिळत असताना पावसाच्या सूक्ष्म थेंबांना वर घेऊन येते म्हणून त्यास अपड्रॉप म्हणतात. ढगामध्ये मूळचे थंड बाष्प आणि उलट प्रवास करून आलेले बाष्प थेंब एकत्र येऊन संघनन वेगाने सुरू होते म्हणूनच पाण्याचे थेंब आकाराने मोठे होतात. ढगफुटीचे वाढते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय आहे.

डॉ. नागेश टेकाळे , मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org