भानू काळे

‘नावात काय आहे? गुलाबाला कुठलेही नाव दिले तरी त्याचा सुगंध तितकाच गोड असेल.’ हे शेक्सपियरचे वाक्य विख्यात आहे. पण व्युत्पत्तीचा विचार केला तर नावांमागील अनेक गमतीजमती पुढे येतात. आपल्याकडे देवादिकांची नावे मुलांना ठेवली जात. मुलगा असेल शंकर, महादेव, गणेश, राम, लक्ष्मण, हरी, कृष्ण, नारायण आणि मुलगी असेल तर सीता, जानकी, पार्वती, रुक्मिणी, द्रौपदी, उमा, लक्ष्मी, सरस्वती वगैरे. त्यामागे कदाचित देवाचे नाव सतत तोंडी यावे ही भावना असावी. या संकल्पनेत प्रथम बदल झाला बंगालमध्ये.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार

अभिषेक, अमिताभ, सुभाष, सौरव, सुजय, अविनाश, तपन, रवींद्र वगैरे नावे मुलांसाठी आणि शर्मिला, मौशुमी, निवेदिता, चारुलता, सुचित्रा, गीतांजली, नवनीता, शिबानी वगैरे मुलींसाठी ठेवली जाऊ लागली. ही आधुनिक नावे बंगाली साहित्यातून आणि सिनेमांतूनच परिचित झाली आणि देशभर स्वीकारली गेली.

काही नावे केवळ कानाला गोड वाटतात म्हणून ठेवली जातात पण त्यांचा अर्थ विपरित असतो. ‘शलाका’ हे मुलीचे नाव ऐकायला गोड लागले तरी त्याचा शब्दकोशातील अर्थ ‘लोखंडाची सळई’ असा आहे! ‘अनामिका’ म्हणजे जिला नाव नाही ती. पण तोच शब्द एखाद्या मुलीचे नाव बनू शकतो! ‘अनिकेत’ म्हणजे ज्याला घर नाही तो. पण ते नाव प्रशस्त घरात राहणाऱ्या मुलालाही ठेवले जाते!

काही नावांना रोचक ऐतिहासिक संदर्भ असतो. उदाहरणार्थ, ‘मेघावती’. जगात सर्वाधिक मुस्लीम लोकवस्ती असलेल्या इंडोनेशियाचे सर्वोच्च नेते सुकार्नो यांच्याशी ओरिसाचे बिजू पटनाईक (सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील) यांची वर्षांनुवर्षे मैत्री होती. सुकार्नो यांच्या कन्या ‘मेघावती’ पुढे इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षही झाल्या. त्यांनी लिहिले आहे, ‘माझे नाव

मेघावती ठेवावे ही सूचना बिजूंनी माझ्या वडिलांना केली. मेघावती म्हणजे मेघाची कन्या आणि कालिदासाच्या मेघदूत या संस्कृत नाटकातील एका मुलीचे ते नाव. वडिलांना ते अतिशय आवडले आणि त्यांनी मला तेच नाव ठेवले.’

सत्तेवर असताना जनतेवर ज्याने अनन्वित अत्याचार केले, त्या स्टॅलिनचे नाव करुणानिधी यांनी चिरंजीवांना ठेवले आणि तेच स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. मुलाचे नाव रावण किंवा दुर्योधन ठेवल्याचे मात्र माझ्यातरी ऐकिवात नाही!bhanukale@gmail.com