औष्णिक प्रदूषण : अणुऊर्जा प्रकल्पात अणुभट्टी थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अणुभट्टीची उष्णता शोषून घेतल्यामुळे गरम होते, त्याची उष्णता खूप वाढते. असे पाणी थेट समुद्रात सोडल्याने त्याचा परिणाम जलचरांवर होतो. या उच्च तापमानामुळे मासे, झिंगे, खेकडे यांच्या प्रजननावर परिणाम होतो. त्यांच्या पिल्ले जगण्याची शक्यता उणावते. अनेक जलीय वनस्पती व प्राणी यामुळे मृत्यू पावतात. प्लवकांचीही (फायटोप्लांक्टन) संख्या कमी होते. याचा थेट परिणाम अन्नसाखळीवर होतो.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

औद्योगिक व घरगुती सांडपाणी : हे पाणी योग्य प्रक्रिया न करता सोडल्यास जलाशयांच्या पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम (एनपीके) यांचे प्रमाण वाढते. जैविक कचऱ्यामुळे पाण्यात कबरेदके व अमिनो आम्ले यांचीही मात्रा वाढते. हे घटक प्लवक, सूक्ष्म शैवाल अशा प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवांसाठी उत्तम पोषकद्रव्ये पुरवतात. त्यामुळे या जीवांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते व पाण्यावर त्यांचा थर तयार होतो. यालाच ‘हार्मफुल अल्गल ब्लूम’ असे म्हणतात. कोणत्या शैवालाची वाढ झाली आहे त्याप्रमाणे लाटा कधी हिरव्या किंवा लाल दिसतात. रात्रीच्या वेळेस जैवदिप्तीदेखील पाहायला मिळते. या शैवाल थरामुळे हवेतील ऑक्सिजन पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच सूर्यप्रकाश पाण्याच्या आत पोहोचू शकत नाही. पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन खूप कमी होतो. रात्रीच्या वेळी जलीय वनस्पतीदेखील ऑक्सिजन शोषून कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. अशा परिस्थितीतील जलचर रात्रीच्या वेळी मरण्याची शक्यता असते. पाण्यात पोषक पदार्थाची व ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे मासेसुद्धा मोठय़ा संख्येत मरतात.

प्लास्टिक प्रदूषण : प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता टाकून दिले व असा प्लास्टिकयुक्त कचरा जलाशयात पोहोचला, तर त्याचे परिणाम जलचरांवर होतात. हा कचरा मासे किंवा इतर जलचर प्राण्यांच्या कल्ले, पर किंवा इतर अवयवांमध्ये अडकून त्यांना इजा करतो. एखादा लहानसा तुकडा या जिवांनी गिळला तर त्यांच्या पचनसंस्थेत बिघाड होतो. असे दीर्घकाळ चालू राहिल्यास त्यांना जीवही गमवावा लागतो. समुद्रातील कासवे पाण्यात तरंगणाऱ्या पिशवीला जेलीफिश समजून खातात. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे उपासमारीने त्यांचा मृत्यू होतो.

मानवी कृतीमुळे झालेल्या जलप्रदूषणाचे घातक परिणाम जलचरांना भोगावे लागतात. याचे प्रत्यक्ष परिणाम मानवापर्यंतही येऊन पोहोचले आहेत.

– चिन्मय सोमणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org