मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. रक्तामधील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक होणे हे या आजाराचे लक्षण आहे. या आजाराचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. सावकाश पण निश्चित येणारा मृत्यू हेच १९२२ सालापर्यंत मधुमेहाच्या रोग्यांचे भवितव्य होते. परंतु त्या वर्षी मधुमेहावर मात करू शकणारा इन्सुलिन नावाचा संप्रेरक (हार्मोन) मिळविण्यात फ्रेडरिक बँटिंग या कॅनडा निवासी शास्त्रज्ञाला यश आले. प्राण्यांच्या शरीरातून वेगळे केलेले इन्सुलिन त्या वर्षी प्रथमच मधुमेह झालेल्या रोग्यांच्या रक्तात प्रविष्ट करण्यात आले. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाचे आयुर्मान वाढण्याची आणि त्यांना सामान्य जीवन जगता येण्याची शक्यता निर्माण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाचा सुमारे १५ सेंटिमीटर लांबीचा एक अवयव आहे. जर प्राण्यांच्या शरीरातील हा अवयव काढून टाकला तर त्यांनाही मधुमेहासारखाच रोग होतो, ही गोष्ट डॉक्टर मंडळींच्या लक्षात आधीच आली होती. स्वादुपिंडात आइस्लेट्स ऑफ लँगेरहॅन्स नावाच्या पेशी असतात. त्यामधून इन्सुलिन स्रवते. याशिवाय यामधून पचनाला उपयोगी असणारी संप्रेरकेही स्रवतात. फ्रेडरिक बॅंटिंग हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यामुळे या गोष्टी त्यांना माहीत होत्या. मधुमेह झालेल्या व्यक्तीला इन्सुलिन दिले तर काही फायदा होईल काय, हे त्यांना तपासून पाहायचे होते. हे संशोधन करण्यासाठी त्यानी टोरोंटो विद्यापीठाच्या प्राध्यापक जे. आर. मॅक्लिऑड यांची मदत घेण्याचे ठरविले. मॅक्लिऑड यांनी त्यांना आपली प्रयोगशाळा तर उपलब्ध करून दिलीच त्याचबरोबर आपला एक विद्यार्थी चार्ल्स बेस्ट याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमला.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on the discovery of insulin abn
First published on: 18-02-2022 at 00:05 IST