आशिष महाबळ
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीबरोबर नकाशे आणि आपला त्यातला सहभाग यात आमूलाग्र बदल होत आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात अनेक रोमांचक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कृत्रिम बुद्धिमत्ता-संचलित नकाशांशिवाय स्वयंचलित वाहने अशक्य आहेत. हे नकाशे अत्यंत अचूक आणि तपशीलवार असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर स्वयंचलित वाहनांना सेकंदागणिक रस्त्यांवरील बदलत्या परिस्थितीचा त्यावरील अडथळ्यांसहित माग ठेवणे अनिवार्य असते. याचा थेट परिणाम स्मार्ट सिटी नियोजनात दिसतो तो खास करून सर्वानुकूल सुविधांची रचना करण्यासाठी आणि संसाधनांच्या वाटपासाठी.
हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट नकाशे
नकाशा म्हटलं की डोळ्यासमोर येतात गावं, शहरे, देश वगैरे. पण नकाशा बनवण्याचे हे तंत्रज्ञान मॉल्समध्ये, रुग्णालयांमध्ये, विमानतळांमध्ये तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. दुकाने, माहिती केंद्रे, आग विझवण्याची साधने, आत यायचे व बाहेर जायचे मार्ग, यांच्या सर्वांत चांगल्या जागा इतर ठिकाणच्या अनुभवांवरून हे तंत्रज्ञान योग्यरीत्या ठरवू शकते.
ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) यांच्या वापरात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदल घडून येत आहेत. एआर वास्तविक जगाच्या दृश्यांसह नकाशे एकत्रित करून दाखवते तर व्हीआर प्रवास करण्यापूर्वी आभासी नकाशे दाखवून प्रवासाचे नियोजन सोपे आणि आकर्षक करते. दोन्हीसाठी विविध विदास्राोत एकत्र केले जातात. यावरून अद्यायावत भौगोलिक विश्लेषणही शक्य आहे. यामध्ये उपग्रह प्रतिमा, संवेदकाकडून मिळालेला डेटा आणि वापरकर्त्याने तयार केलेला संबंधित मजकूर समाविष्ट करता येतो.
हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट परिधानियांचे भविष्य
स्मार्ट परिधानियांच्या वापराप्रमाणेच इथेही नकाशांबरोबरच्या अद्यायावत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात. विदा गोपनीयतेची चिंता पण आहेच. उदाहरणार्थ एका देशातील नकाशे वापरून जेव्हा लोक प्रवास करतात तेव्हा ती विदा जर दुसऱ्या देशातल्या संगणकांकडे जात असेल आणि तिथल्या एखाद्या कंपनीच्या आणि कदाचित तिथल्या राज्यकर्त्यांच्या हाती पडत असेल तर त्यामुळे अनेक धोके संभवतात. असे प्रश्न असल्यामुळे भारतासहित अनेक देश आपापले जीपीएस उपग्रह वापरायचा प्रयत्न करताहेत. अलीकडे युरोपमधील एका देशाने मुद्दाम जीपीएसच्या काही चॅनल्समध्ये फेरफार करून दुसऱ्या देशाची क्षेपणास्त्रे भरकटवली. त्यामुळे चक्क काही विमानांचाही मार्ग चुकला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर करणे आणि वापरकर्त्याच्या डेटाचे संरक्षण करणे हे या प्रणालींवरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेगाने कार्य करणारी कणखर कायदेशीर चौकट आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. तसे करणे-करवून घेणे आपल्या हातात आहे.
आशिष महाबळ
मराठी विज्ञान परिषद
ईमेल – office@mavipa.org
संकेतस्थळ – http://www.mavipa.org