बिपीन देशमाने
नुकतेच ‘गूगल डीपमाइण्ड’ आणि ‘आयसोमॉर्फिक लॅब’ यांच्या संयुक्त विद्यामाने कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘अल्फा फोल्ड थ्री’ हे एक नवीन प्रारूप तयार करण्यात आले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपामुळे, नवीन औषध शोधण्याच्या प्रक्रियेने एक वेगळीच उंची गाठली आहे.

पेशीमध्ये डीएनए, आरएनए, प्रथिने, लहान रेणू, आयन्स वगैरे अनेक प्रकारचे रेणू असतात. कोणतेही नवीन औषध पेशीतील रेणूंशी कसे संयोग पावते, त्यांची परस्परक्रिया काय होते यावर त्या औषधाची उपयुक्तता सिद्ध होते. यासाठी प्राण्याच्या पेशींवर किंवा संपूर्ण प्राण्यावरच प्रयोग करावे लागतात. पण समजा असे प्रयोग न करता औषध गुणकारी कसे ठरेल हे कळले तर? येथेच अल्फा फोल्ड थ्री हे प्रारूप मदतीला येते.

ai antibiotics loksatta article
कुतूहल : नव्या प्रतिजैविकांच्या शोधात ‘एआय’
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Arvind Kejriwal loksatta article marathi
लालकिल्ला: केजरीवालांची अचूक वेळी सुटका!
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
israeli attacks targeting hamas and hezbollah fighters
अग्रलेख : अधर्मयुद्धाचा अंत?
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
loksatta kutuhal artificial intelligence and human creativity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हेही वाचा : कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता

प्रथिन हा महारेणू आहे. २० प्रकारची अमिनो आम्ले एकमेकांना विशिष्ट अनुक्रमाने जोडून प्रथिन रेणू बनतो. या साखळीपासूनच पुढे त्रिमितीय प्रथिनाचा रेणू तयार होतो. प्रथिनाने त्रिमितीय रचना धारण केल्याशिवाय तो त्याचे कार्य करू शकत नाही. कोणत्याही प्रथिनाची त्रिमितीय रचना शोधून काढण्यासाठी एक्स-रे क्रिस्टलोग्राफी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कॉपी, क्रायोइलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यासाठी चार-पाच वर्षाचा कालावधी लागतो आणि खूप खर्च येतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे अल्फा फोल्ड थ्री प्रारूप कोणताही प्रयोग न करता प्रथिनाची प्राथमिक रचना म्हणजे त्याच्यातील अमिनो आम्लांचा क्रम माहीत असेल तर त्याचे त्रिमितीय स्वरूप कसे असेल हे फारच कमी वेळात सांगू शकते! हे प्रथिन इतर रेणूंशी परस्परक्रिया कशी करू शकेल हेही सांगू शकते आणि या माहितीचा नवीन औषध शोधण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

हेही वाचा : कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रथिनांच्या त्रिमितीय रचनेबरोबरच प्रथिन आणि डीएनए, प्रथिन आणि लहान रेणू किंवा आयन्स असे विविध रेणू एकमेकाजवळ आल्यानंतर त्यांची संयुक्त संरचना कशी असेल हेही अल्फा फोल्ड थ्री हे प्रारूप अचूकपणे सांगू शकते. थोडक्यात नवीन प्रथिन आणि पेशीमधील सर्व रेणूंचा एकमेकांशी कसा रासायनिक संवाद होऊ शकतो, कशी क्रिया होऊ शकते हे कोणतेही प्रयोग न करता सांगता येते! त्यामुळे नव्या औषधाची संरचना, स्वरूप ठरवण्याच्या कामात मोलाची मदत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आतापर्यंत आपण कधीही कल्पना न केलेली नवनवीन औषधे असाध्य रोगांसाठी कमी वेळात आणि कमी खर्चात भविष्यात निर्माण करता येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

बिपीन देशमाने
मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org