२५ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनल्याची बेलारूसने घोषणा केली. पुढे भूतपूर्व दहा सोव्हिएत राष्ट्रांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स नावाची संघटना स्थापन केली. १९९४ साली बेलारूसची नवीन राज्यघटना तयार करून राजकीय व्यवस्थेत काही बदल केले गेले. या बदलांमध्ये प्रामुख्याने पंतप्रधानांचे सर्व अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे आले, आणि देशात अध्यक्षीय प्रजासत्ताक सरकार सत्तेवर आले. १९९४ साली या प्रजासत्ताकाची पहिली अध्यक्षीय निवडणूक होऊन अलेक्झांडर लुकान्शेको हे राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. १९९४ साली बेलारूसचे अध्यक्ष झालेले लुकान्शेको पुढे २००१, २००६, २०१० आणि २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही विजयी घोषित होऊन सध्याही अध्यक्षीय पदावर आहेत. हा देश नावापुरताच प्रजासत्ताक आहे; परंतु सर्वच अर्थाने लुकान्शेको हुकूमशहा आहेत. विरोधकांना वाटेल त्या मार्गाने संपवून गप्प करणे हे त्यांचे धोरण. आपल्या राजकारणासाठी रशिया आणि चीनच्या नेत्यांशी जवळचे संबंध ठेवण्यात ते सरावले आहेत. प्रत्येक निवडणुकीचा निकाल त्यांनी आपल्या बाजूने फिरवून ते विजयी झाले. ऑगस्ट २०२० मधील निवडणुकीत ते सहाव्यांदा विजयी झाले ते याच मार्गाने! त्यांची प्रतिस्पर्धी स्वेतलानाला ७० ते ८० टक्के मते मिळाल्याचे स्पष्ट असतानाही तेथील निवडणूक आयोगाने लुकान्शेकोना ८० टक्के मते मिळाल्याचे जाहीर केले ते त्यांचा मार्गदर्शक मित्र रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्या आशीर्वादानेच असे जनतेचे आणि इतर युरोपीय देशांचे मत आहे. स्वेतलाना भीतीने, आपल्या दोन मुलांना घेऊन शेजारच्या देशात परागंदा झाली. बेलारूसीयन जनतेचा आपल्या अध्यक्षांविरुद्धचा जनक्षोभ अधूनमधून रौद्र स्वरूप धारण करतो. मागच्या ऑगस्टमध्ये झालेल्या राजधानी मिन्स्कमधील निदर्शनात दोन लाख माणसे सामील झाली. बेलारूसची अर्थव्यवस्था अधिकतर औद्योगिक उत्पादनांवर अवलंबून आहे. तिथे अजूनही सोव्हिएत पद्धतीने बहुतेक मोठे उद्योग आणि शेतीचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे. सध्या बेलारूस हा एक विकसनशील देश असून त्यांचा रशियाशी व्यापारी संबंध अधिक आहे. ९५ लाख लोकवस्तीच्या या देशात ५६ टक्के लोक हे ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोकांना धर्म ही संकल्पना मान्य नसल्याने त्यांना निधर्मी म्हणता येईल. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com  

Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार