भानू काळे

आजकाल ‘पेपरलेस कम्युनिकेशन’ हा चर्चेचा विषय झाला आहे, पण पेपराचा वापर अपरिहार्य आहे हे पदोपदी जाणवत असते. उदाहरणार्थ, छापील पुस्तके किंवा वृत्तपत्रे कालबाह्य होतील आणि आपण सगळे फक्त मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनवर वाचन करायला लागू असे गेली २५-३० वर्षे तरी तथाकथित तज्ज्ञ म्हणत आले आहेत; पण प्रत्यक्षात तसे होत नाही. वाचनासाठी किंवा लिहिण्यासाठी होणारा पेपरचा वापर हा एकूण पेपरवापराचा एक छोटा हिस्सा झाला. नॅपकिन असो की प्रशासनातील फायली, कॅलेंडर असो की वस्तूंचे पॅकिंग, पेपर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या पेपरला मराठी प्रतिशब्द आहे कागद. या कागद शब्दाची व्युत्पत्ती मजेशीर आहे. डॉ. यू. म. पठाण यांच्या ‘फार्सी-मराठी अनुबंध’ या ग्रंथानुसार कागद हा शब्द मूळ अरबी ‘कागज्’ शब्दापासून फार्सीच्या माध्यमातून मराठीत आला.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

कागदाचा वापर अगदी अल्प प्रमाणात ज्ञानेश्वरांच्या काळात सुरू झाला होता; पण त्यापूर्वी भूर्जपत्रांवरच बहुतांश लेखन होत असे. महत्त्वाच्या शासकीय नेमणुका किंवा आदेश यांसाठी कधी कधी ताम्रपट वापरले जात. त्यामुळे त्यापूर्वी होणारे काव्य, तत्त्वज्ञान, शस्त्रे, धर्मग्रंथ वगैरेंचे लेखन हे अत्यल्प लोकांपर्यंतच पोचत असले पाहिजे. कारण भुर्जपत्रांच्या प्रती मोठय़ा संख्येने काढणे अतिशय अवघड होते; त्यांची पुस्तके तयार करणे आणि वितरित करणे हेही अगदी मर्यादित प्रमाणावरच शक्य होते. तेराव्या शतकात कागद हा प्रकार लेखनासाठी प्रथम वापरात आला व तेव्हापासूनच ज्ञानाचा व्यापक प्रसार शक्य झाला. पुढे मुद्रणाच्या शोधामुळेच बहुजन समाजापर्यंत ज्ञान पोहोचू शकले. म्हणूनच मानवी इतिहासात कागदाचे आणि मुद्रणाचे इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तत्कालीन मुसलमानी अमलात मराठवाडय़ातील दौलताबादजवळ कागजीपुरा या गावी कागद तयार करण्याचा व्यवसाय होता. त्याला दौलताबादी कागद असेच म्हणत. अर्थात तो हस्तलेखनासाठी योग्य असला, तरी आधुनिक छपाईसाठी त्याचा उपयोग नव्हता. आज वृत्तपत्रांसाठी न्यूजिपट्र, स्टेशनरीसाठी क्रीमवोव्ह, पुस्तकांसाठी मॅपलिथो, रंगीत छपाईसाठी आर्ट, पॅकिंगसाठी क्राफ्ट असे कागदाचे विविध प्रकार वापरले जातात आणि त्या साऱ्यांची व्युत्पत्ती मूळची युरोपातील आहे.