मराठी संस्कृतीत तमाशा हा एक मनोरंजक कलाप्रकार मानला जातो. मुख्यत: ग्रामीणभागात आणि कधी कधी शहरी भागातही रंगमंचावर सादर केला जाणारा. या लोकप्रियकलाप्रकारात एखादा नाचापोऱ्या स्त्रीचे सोंग घेतो; विनोदी, शृंगारिक व खटकेबाज संवाद असतात; नटूनथटून लावण्या म्हटल्या जातात आणि एकूण बघणाऱ्यांची करमणूक केली जाते.

महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक प्रतीक म्हणून त्याला प्रतिष्ठाही आहे. बहुतेक वेळा सांस्कृतिक कार्यक्रमांत आणि खूपदा राष्ट्रीय पातळीवरही ‘एक अस्सल मराठमोळी लोककला’ म्हणून तमाशा सादर केला जातो. पण मुळात ‘तमाशा’ हा शब्द तुर्कस्थानी आहे व तुर्की भाषेत त्याचा अर्थ देखावा किंवा दृश्य किंवा गंमत असा आहे. त्याच अर्थाने तो उर्दू किंवा हिंदीतही वापरला जातो. जसे की, ‘‘देख, तमाशा देख’’ किंवा ‘‘देखो आगे क्या तमाशा होता है.’’ विचित्र किंवा हास्यास्पद वर्तन अशाही अर्थाने तो शब्द उर्दू किंवा हिंदीतही वापरला जातो. जसे की,‘‘बंद करो ये तमाशा.’’ मराठीत मात्र कलेचे एक विशिष्ट रूप घेऊन हा शब्द रूढ झाला.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

याच तुर्की शब्दापासून बनलेला ‘तमासगीर’ हा शब्द मात्र मूळ अर्थाशी अधिक इमान राखणारा आहे. ‘दुरून मौज पाहणारा’ असा त्याचा अर्थ. ‘प्रत्यक्ष लढाईत भाग न घेता लांब उभे राहून नुसतीच गंमत बघणारे बघे’ या टीकास्पद अर्थानेही तो वापरला जातो.

तालीम हा असाच एक अर्थबदल होऊन मराठीत रूढ झालेला शब्द. ‘तअलीम्’ म्हणजे शिक्षण या अरबी शब्दापासून हा शब्द मराठीत आला. हिंदीसह इतरही अनेक भाषांत तो त्याच अर्थी वापरला जातो. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी पुरस्कृत केलेली ‘बुनियादी तालीम’ प्रसिद्ध आहे. मराठीत मात्र तालीम म्हणजे सराव या वेगळय़ाच अर्थाने हा शब्द रूढ आहे. तमाशा असो की नाटक, प्रत्यक्ष प्रयोगापूर्वी त्याची तालीम ही करावीच लागते. आयत्या वेळी वेशभूषा वगैरेसह केलेल्या सरावाला ‘रंगीत तालीम’ असेही म्हणतात. व्यायाम किंवा व्यायामशाळा या अर्थानेही मराठीत हा शब्द रूढ आहे. पण यांतील कुठल्याच अर्थाने तालीम शब्द मूळ अरबी भाषेत किंवा हिंदीसह अन्य भाषांत वापरला जात नाही.

– भानू काळे

bhanukale@gmail.com