दत्तकविधान नामंजूर करून राज्ये खालसा करण्याच्या पद्धतीशिवाय राज्यांचे दिवाण आणि राजांनी दिलेले प्रशासन, हेही काही वेळा संस्थाने खालसा करण्यास कारणीभूत होई. त्यावर ब्रिटीश रेसिडेंटची देखरेख असे. संस्थानिक किंवा दिवाणाने व्यक्तीगत फायद्यासाठी प्रजेचा केलेला छळवाद, स्वतच्या अधिकारांचा दुरुपयोग, गुन्हेगारास संरक्षण, अशा प्रकारचे कुशासन आढळल्यास एकतर त्या राजाला पदच्युत केले जाई किंवा प्रसंगी राज्यही खालसा केले जाई. अशा तऱ्हेने, सन १८५४ सालापर्यंत दत्तक विधान नामंजुरीमुळे खालसा झालेल्या संस्थानांनंतर अर्काट, नरगुंड, रामगढ आणि तुळसीपूर इत्यादी राज्ये खालसा केली गेली. कंपनी सरकारने जिंकलेल्या, खालसा केलेल्या राज्यांना आपल्या अधिकार क्षेत्रात आल्यावर त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण आणि एकत्रीकरण करणे सुरू केले. जवळपासच्या पंधरावीस राज्यांना ‘एजन्सी’मध्ये वर्ग करुन अशा काही एजन्सीजचे ‘प्रॉव्हिन्स’ म्हणजेच इलाखे बनविले गेले. अशी लहान मोठी राज्ये संपूर्ण देशभर दूरवर पसरलेली आणि प्रचंड मोठय़ा संख्येने असल्यामुळे त्यांचे एकीकरण, वर्गीकरण, आणि प्रशासन हे मोठय़ा जिकिरीचे काम होते. युद्धात जिंकलेल्या, आणि विविध करार केलेल्या राज्यांशी कंपनी सरकारचे संबंध कसे असावेत या विषयी काही पक्के प्रमाणभूत नियम वा कायदे केलेले नव्हते. ते सर्वस्वी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक आणि गव्हर्नर जनरलच्या मर्जीवर अवलंबून होते.सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.comकुतूहल - तंतूचे रासायनिक गुणधर्मतंतूच्या भौतिक गुणधर्माइतकेच त्याचे रासायनिक गुणधर्मही महत्त्वाचे असतात. मागावर तयार झालेले कापड फार कमी प्रमाणात तसेच्या तसेच ग्राहकांपर्यंत पोहचते. बहुतांश कापडावर रासायनिक प्रक्रिया करून त्यात विविधता आणली जाते आणि ते कापड अधिक उपयोगी आणि आकर्षक बनवले जाते. रासायनिक गुणधर्मानी कापसाच्या तंतूंना प्रदान केलेले एक आगळेवेगळे रूप म्हणजे रंगीत कापूस. यामध्ये जनूक अभियांत्रिकी संशोधनाचा फार मोठा वाटा आहे. रंगीत कापूसरासायनिक प्रक्रियेमध्ये धुलाई (वॉिशग), सफेदीकरण (ब्लिचिंग), रंगाई (डाइंग), छपाई (िपट्रिंग) आणि विशेष रूपीकरण (फिनििशग) या प्रकिया जरुरीप्रमाणे केल्या जातात. या मूलभूत प्रक्रियांच्या मागे पुढे, पूर्व, उत्तर आणि पूरक अशा अजून काही प्रकियाही केल्या जातात. या प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता विविध रासायनिक पदार्थ वापरावे लागतात. मात्र हे रासायनिक पदार्थ आणि तंतूंचे रासायनिक गुणधर्म जेव्हा एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच प्रक्रिया सफल होते. आज नसíगक तंतूइतकेच महत्त्व मानवनिर्मित तंतूंना आले आहे.याकरिता तंतूचे गुणधर्म समजावून घेणे आवश्यक आहे. या विविध तंतूंच्या रासायनिक गुणधर्मात पराकोटीचे फरक असतात. उदाहरणार्थ, कापसाचे तंतू ओले झाले. तर ताकद वाढते पण विस्कोजचे तंतू ओले झाले तर त्यांची ताकद कमी होते. विस्कोज कापसापेक्षा स्वस्त असू शकते. तंतूंच्या अशा काही अंगभूत गुणधर्माचा फायदा घेऊन चुकीच्या प्रघातांना कळत-नकळत चालना मिळाली. कमी उत्पादन खर्चासाठी नसíगक कापसाच्या तंतूंमध्ये विस्कोजचे मिश्रण करण्याचे प्रकार अजूनही आढळत नाहीत असे नाही; परंतु ग्राहकाच्या दृष्टीने अशा वस्त्राचा टिकाऊपणा कमी असतो. बऱ्याचदा सुती वस्त्रावर गुठळ्या येण्याचे जे अनुभव येतात, त्या वेळी कापसात विस्कोजचे मिश्रण केलेले असू शकते. त्यामुळे वस्त्राला चकचकितपणा येतो हे खरे. तेव्हा खरेदी करताना ग्राहकाने किंमत, दर्जा, चकचकितपणा यांचे भान ठेवून समर्पक पर्याय निवडावा.- प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org