गीताईची रचना करताना विनोबांनी काही निश्चय केले होते. त्यातील पहिला निश्चय होता – गीतेचा सर्वयोगसमन्वयकारी साम्ययोगपर अर्थ नीट प्रगट व्हावा. यातील ‘समन्वया’चा आणखी थोडा विचार करायचा आहे. संतांच्या साहित्याचा विनोबांनी कसा मेळ घातला ते आपण संक्षेपाने पाहिले. साम्ययोगाच्या अनुषंगाने हिंदूू धर्मातील समन्वयाचा आणखी विचार होईलच. आज अन्य धर्माकडे विनोबा कसे पाहात ते जाणून घेऊ. आरंभ जैन धर्मापासून करू.

‘प्रथम सत्याग्रही’ ही विनोबांची मोठी ओळख होती. आजही विनोबांचे नाव घेतले की तिचे स्मरण होते. तथापि विनोबांनी ‘सत्याग्रही’ऐवजी ‘सत्यग्राही’ ही ओळख जवळची मानली.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हा केवळ शब्दांचा खेळ नाही. सत्यग्राही म्हणजे सत्याचा स्वीकार करणारा. सत्याग्रहामध्ये नाही म्हटले तरी सत्यासाठी आग्रह येतो. असा हट्ट ही अतिसूक्ष्म पातळीवरची हिंसा असते. सत्यग्राही सत्याचे नम्रपणे ग्रहण करतो. सत्यासाठी आग्रह हवाच कशाला?

या एका शब्दात जैन धर्माची सारी शिकवण विनोबांनी पाहिली. गांधीजींवरही जैन धर्माचा प्रभाव होता. विनोबांचे श्रमण संस्कृतीवरचे चिंतन या प्रभावाला आणखी पुढे नेणारे होते.

बुद्धदेव आणि भगवान महावीर यांना ते भारताच्या गगनातील ‘गुरू’ आणि ‘शुक्र’ म्हणत. बुद्धांचा प्रभाव आशियाभर गेला आणि महावीरांचा उपदेश भारतामध्ये ज्ञानवर्धन करत राहिला.

आपल्या शिक्षणाची धुरा पूर्वी जैनांकडे होती असे ते म्हणत. आपल्या मताच्या पुष्टीसाठी त्यांनी एक उदाहरण दिले. मुलांच्या शिक्षणात ‘णमो सिद्धाणं’ या मंत्राला मोठे स्थान होते. भारताच्या ज्ञानपरंपरेत जैनांनी मोठी भर टाकली आहे याची त्यांना जाणीव होती. विविध विषयांवर विनोबांना ज्ञात असणाऱ्या जैन ग्रंथांची संख्या होती, १०,०००!

त्यांना महावीरांची महती आणखी एका कारणासाठी जाणवत असे. वर्धमानांना ते स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा उद्गाता मानत. महावीरांच्यासह आणखी दोघांना त्यांनी या मालेत ठेवल्याचे आढळते. हे दोन महात्मे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी.

महावीरांची महिलांविषयीची विशेषता अशी की, साध्वी म्हणून दीक्षा देताना त्यांच्या मनात कोणताही किंतु नव्हता. ही नि:शंकता बुद्धांना वाटली नाही, अगदी रामकृष्ण परमहंसांना साधली नाही ती महावीरांना साधली.

विनोबांनी सर्व धर्माच्या उपदेशाचे सार काढले; तथापि त्यांना जैन धर्माची शिकवण सार रूपाने काढता आली नाही. याचे कारण म्हणजे धम्मपद आणि गीतेप्रमाणे जैन धर्मीयांचा एकच असा ग्रंथ नाही. पण शांत बसतील ते विनोबा कसले!

महावीरांच्या २५०० निर्वाण वर्षांत त्यांनी जैन मुनींची एक ‘संगीती’ (परिषद) भरवली. चिंतन आणि चर्चेमधून एक सार निघाले. जिनेंद्रकुमार वेर्णी यांनी त्याचे संकलन केले. त्या संकलनाचे ग्रंथरूप ‘समणसुत्त’ म्हणून १९७५ प्रकाशित झाले.

जैन धर्माची अशी सेवा करून हा ‘सत्यग्राही’ अनंतात विलीन झाला तो दिवस महावीरांचा निर्वाण दिन होता. – अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com