प्राणीसृष्टीत खऱ्या अर्थाने हवेत उडण्याची क्षमता केवळ पक्षी, वटवाघूळ आणि कीटक या तीनच प्रजातींमधे विकसित झाली आहे. तसे आपण उडणारे बेडूक, साप, सरडे, शेकरू यांच्याबद्दल वाचतो. परंतु हे खऱ्या अर्थाने उडणारे प्राणी नव्हेत. कारण या प्राण्यांमध्ये उडण्यासाठी लागणारे विशिष्ट शारीरिक अवयव विकसित झालेले नाहीत. वास्तवात हे प्राणी हवेत फक्त ‘तरंगत’ जाऊन काही अंतर पार करतात. परंतु पक्षी, वटवाघूळ आणि कीटक यांची शरीररचना आणि अवयव उडण्याच्या दृष्टीने विकसित झाले आहेत. अर्थात, या तीनही प्रजातींमधे विकसित झालेल्या पंखांचे कार्य समान असले तरी त्यांच्या मूळ रचनेमध्ये कमालीचे वैविध्य आढळते.

वटवाघळांमध्ये इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे पायांच्या दोन जोडय़ा असतात. परंतु पुढचे पाय आणि विशेषत: बोटे खूप जास्त लांब असतात. वटवाघळांचे ‘पंख’ हे पक्ष्यांप्रमाणे खरे पंख नसून प्रत्यक्षात त्यांच्या शरीरावरील त्वचेचा अतिरिक्त ‘पडदा’ असतो आणि लांब असलेली बोटे या ‘पडद्याला’ जोडलेली असतात. या पडद्यामध्ये रक्तवाहिन्या, मज्जातंतू, संयोजी ऊती आणि स्नायू असतात. वटवाघूळ विश्रांती घेत असताना त्वचेचा हा पडदा शरीरालगत घडी केलेल्या अवस्थेत असतो. हवेत उड्डाण करताना लांब बोटांच्या आधाराने हा पडदा शरीराच्या दोन्ही बाजूंना पंखांप्रमाणे ताणला जातो आणि स्नायूंमुळे तो ताणलेल्या अवस्थेत राहातो. पुढे या स्नायूंच्या विशिष्ट हालचालीमुळे या पडद्याची पंखांप्रमाणे हालचाल करत ही वटवाघळे हवेत उडू शकतात.

gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

पक्ष्यांची शरीररचना मात्र उड्डाणासाठी पूर्णत: अनुकूल असते. पक्ष्यांच्या पुढील पायांची जोडी खऱ्या पंखांमधे रूपांतरित झालेली आहे. हे पंख छातीच्या हाडालगत असलेल्या स्नायूंना जोडलेले असतात. हे स्नायू अतिशय मजबूत आणि कार्यक्षम असतात आणि पंखांची अतिशय लयबद्ध हालचाल घडवून आणतात. याशिवाय पक्ष्यांच्या शेपटीची रचना आणि पंखांवर आणि शेपटीवर असलेल्या पिसांची विशिष्ट रचना उड्डाणासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. या क्षमतेमुळे पक्ष्यांच्या कित्येक प्रजाती हजारो मैल स्थलांतर करत असतात.

अनेक पक्षी हवेत पंख न फडफडवता आकाशात उडताना दिसतात. यावेळी सूर्याचा उपयोग त्यांना होत असतो. सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होते आणि हवा वर जाते, याचाच उपयोग पक्ष्यांना पंख न फडफडवता आकाशात उंच उडण्यासाठी होतो. हे अंतर पार करताना हवेच्या रोधाला विरोध करण्यासाठी, पंख ठरावीक कोनात ठेवून हळू हळू प्रत्येक सेकंदाला हे पक्षी थोडे खाली झेपावून पुढे जातात.

डॉ. संजय जोशी,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org