प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. पूर्वी ग्रामोफोनच्या तबकडय़ा ‘लाख’ या नसíगक रेझिनपासून बनवत. हल्ली प्लास्टिकच्या बहुतांश वस्तू या संश्लेषित रेझिनवर आधारित असतात. रेझिन व प्लास्टिक हे शब्द बऱ्याच वेळेला समान अर्थी म्हणून वापरतात. रेझिन पाण्यात अविद्राव्य असून त्याला स्वतंत्र अस्तित्वच नसते. तो बहुवारीकाचा अविभाज्य भागच असतो. एकवारीकाचे (मोनोमर) अनेक रेणू एकत्र येऊन बहुवारिक (पॉलिमर) बनते. शुद्ध कार्बनी पदार्थाप्रमाणे त्यांना विलय िबदू अथवा उत्कलन िबदू नसतो. बहुवारिकाला इंग्रजीत पॉली म्हणतात. त्यात जो एकवारिक असतो, त्याच्या नावापुढे पॉली असे लावतात. उदाहरणार्थ पॉलिइथिलिन. यात इथिलिन या एकवारीकाचे बहुवारीकरण केलेले असते. नायलॉन म्हणजे पॉलिअमाइड. यात अमाइडचे बहुवारीकरण असते.
काही बहुवारीकांच्या निर्मितीसाठी दोन रासायनिक संयुगांची जरुरी असते. बेकेलाइट प्लास्टिकसाठी लागणारे फिनोलिक रेझिन फिनोल व फार्माल्डिहाइड यांच्या प्रक्रियेने तयार होते. हे बेकेलाइट प्लास्टिक डायिनग टेबले, टी-पॉयसाठी इत्यादी वस्तूंसाठी वापरले जाते. शोभिवंत वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पत्र्यासाठी युरिया, मेलामिन या अमिनो वर्गाच्या संयुगांची रेझिन वापरतात.
एकवारीकांच्या निर्मितीसाठी अथवा रेझिनच्या निर्मितीसाठी लाकडाचा भुसा, सेल्यूलोज, तंतुमय काच, इतर नसíगक व संश्लेषित तंतू व माती अथवा तत्सम खनिज पदार्थ वापरतात. रेझिनसाठी वापरले जाणारे फिनोल डांबराच्या उध्र्वपतनापासून बनवतात. फिनोलिक रेझिन प्लास्टिक पृष्ठलेपासाठी रंग म्हणून वापरतात. काजूचे तेल हे एक प्रकारचे फिनॉलच आहे.
प्रबोधन पर्व: संपत्तीचा उपभोग आणि कायदेशीर चोरी
‘‘संपत्तीचा उपभोग घेतल्यावाचून कोणताही मनुष्य जगूही शकत नाही. अर्थात प्रत्येक मनुष्य समाजात उत्पन्न होणाऱ्या संपत्तीचा उपभोग घेतच असतो. म्हणजेच तो एकप्रकारे समाजाच्या संपत्तीचा विनाश करीत असतो. अर्थात आपण जितकी संपत्ती उपभोगून नष्ट केली तितकी तिच्यात भर घालण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीने त्यांच्यावर पडली पाहिजे. दुसऱ्याने श्रम करावेत आणि त्यांच्या श्रमांतून निर्माण झालेली संपत्ती आपणास उपभोगता यावी ही वृत्ती म्हणजेच चोरांची वृत्ती होय. स्वत: श्रम न करता संपत्तीचा उपभोग घेण्याचा हक्क हा केवळ लहान मुले, म्हातारी मनुष्ये, रोगी, अंध, पंगु एवढय़ांनाच असला पाहिजे. जो धडधाकट आहे आणि ज्याला काम करणे शक्य आहे अशा मनुष्याने केवळ आईबापांनी, वाडवडिलांनी किंवा पूर्वजांनी संपत्ती मिळवून ठेविली म्हणून काम न करिता समाजाच्या संपत्तीचा उपभोग घेणे ही नैतिक दृष्टय़ा चोरीच समजली पाहिजे.’’ संपत्तीच्या उपभोगाचा ऊहापोह करत आचार्य जावडेकर तिच्या विभागणीतील असमतोल दाखवून देताना म्हणतात-
‘‘जे आर्थिक व्यवहार न्यायाचे नव्हेत ते कायदेशीर असले, तरी नैतिक दृष्टीने ती चोरीच समजली पाहिजे.. समाजात ज्या मानाने आर्थिक व्यवहारांची अधिकाधिक गुंतागुंत होऊ लागते आणि व्यापारी, सावकारी, जमीनदारी व कारखानदारी यांची वाढ होऊ लागते, त्या मानाने कायदेशीर चोरीचे प्रमाणही वाढत जाते. ज्यांच्या श्रमामुळे संपत्तीची उत्पत्ती होते त्यांना तिचा संग्रह मुळीच करता येत नाही आणि ज्यांच्यापाशी संग्रह वाढत जातो त्यांना त्यांच्या वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे श्रम करावे लागत नाहीत.. अशा परिस्थितीत कायदा हा सावांचे रक्षण करीत नसून चोरांचे रक्षण करीत असतो असे म्हणावे लागते. हे कायदे मोडण्याकडे लोकांची प्रवृत्ती होते. पण केवळ एकेकटय़ा व्यक्तीने आपापल्या स्वार्थासाठी समाजातील कायदे मोडू लागल्याने समाजात सुव्यवस्था नांदू शकणार नाही. अशा वेळी ही कायदेशीर चोरी नष्ट करावयाची, तर संपत्तीच्या मिळकतीसंबंधी आणि संग्रहासंबंधी ज्या पद्धती रूढ झालेल्या असतील, त्या आमूलाग्र बदलून नव्या पद्धतीवर समाजाची आर्थिक घटना कारावी लागते.’’   

मनमोराचा पिसारा: जववरी रे.. तववरी!
संतकाव्यातला ‘भारूड’ हा प्रकार अधिक थेटपणे भिडतो. त्याचं स्वरूप मुळातच ‘परफॉर्मिग फोक आर्टसारखं असल्यानं, त्या काव्यातला रांगडेपणा श्रोत्याला खाडकन भानावर आणतो. संत एकनाथांची भारुडं लोकशाहीर साबळ्यांनी विलक्षण समर्थपणे आपल्यापर्यंत पोहोचविली आहेत. ‘जववरी रे तववरी..’ हे भारूड त्यांचंच असावं म्हणून शोधलं तेव्हा ते ज्ञानदेवांनी रचलं हे कळलं आणि त्यांच्या अद्वितीय प्रतिभेची प्रचीती पुन्हा आली.
या भारुडामध्ये सुरुवातीला अतिशय रम्य दाखल्यामधून सारं मर्म नेमकं सांगितलंय. त्यानंतरच्या कडव्यातून ज्ञानदेवांनी आपले विचार सरळ मांडलेत.
(गायक : स्नेहल भाटकर)
जववरी रे तववरी जम्बुक करी गर्जना
तव त्या पंचानना देखिले नाही रे बाप
जववरी रे तववरी वैराग्याच्या गोष्टी
जव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही रे बाप
जववरी रे तववरी मैत्रत्व संवाद
जव अर्थेसी संबंध घडला नाही रे बाप
जववरी रे तववरी युद्धाची मात
जव परमाईचा पूत देखिला नाही बाप
जववरी रे तववरी समुद्र करी गर्जना
जव अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही रे बाप
जववरी रे तववरी बाधी हा संसार
जव रखुमादेवीवर देखिला नाही बाप
रानातल्या कोल्ह्य़ाच्या कोल्हेकुईमध्ये त्याच्या पोकळ अहंकाराच्या गमजा घुमतात, कारण आपल्यापेक्षा मोठय़ा पंचाननाची ओळख पटलेली नसते. जोवर आपण अज्ञानी आणि अडाणी असतो, तोवर अहंपणाचा टेंभा मिरवतो. अथांग चैतन्याची जाणीव झालेली नसल्यामुळे आपण गर्विष्ठ होतो. हाच आशय ज्ञानदेव विविध प्रकारे आपल्यापुढे मांडतात. सत्याची जाणीव जगाकडे बघून होते त्यापेक्षा अधिक प्रखरपणे आत्मचिंतनातून होते. ही गोष्ट ज्ञानदेव नित्य व्यवहारातील अनुभवांचे दाखले देऊन रंजकपणे स्पष्ट करतात.
निरासक्तपणे जगण्याच्या गोष्टी आपण करतो कारण देखणी ललना तोवर दिसलेली नसते. आपल्या वैराग्याचा कस तेव्हाच लागतो, जेव्हा मोहमयी जगाकडे आपण निर्मोहीपणे पाहू शकतो.
मैत्रीच्या गप्पांचे फड रंगतात. केव्हापर्यंत जोपर्यंत कोणी आर्थिक अपेक्षांचा संबंध जोडत नाही! म्हणजे दोस्तीची पारख होते व्यवहारातील विश्वासपूर्वक केलेल्या सहकारातून. तेव्हा गप्पिष्ट मित्रांच्या स्वार्थी बडबडीपासून सावध राहा.
कुरुक्षेत्रावर कौरवांनी शौर्याच्या बढाया मारल्या कारण तोपर्यंत महावीर अर्जुनाच्या तळपत्या सामर्थ्यांची माहिती त्यांना नव्हती.
अफाट पसरलेला समुद्र लाटांच्या आवाजाने जणू आपल्या बलाची दवंडी पिटवितो. कारण त्या महासागराला गिळून टाकणाऱ्या अगस्तीच्या सामर्थ्यांची जाणीव नसते. ती झाली की, आपल्या शक्तीचा डंका पिटविणं, तो आपोआप थांबवेल.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी