‘मद्य’ (अल्कोहोलिक बिव्हरेज) म्हणजे ज्या पेयांमध्ये इथिल अल्कोहोलचा समावेश आहे असे पेय. अशा पेयांचे अनेक प्रकार आहेत; परंतु त्यांची निर्मिती मुख्यत: पिष्टमय(धान्य, बटाटे)  किंवा शर्करायुक्त (ऊस, फळांचे रस)   पदार्थाबरोबर यीस्ट या जिवाणूच्या वेगवेगळ्या वाणांचा वापर करून किण्वन प्रक्रियेमार्फत करतात. मद्य तयार करण्याची कला मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानं होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवही आहे. मद्यामध्ये असलेलं अल्कोहोल हाच शरीरावर व मनावर दुष्परिणाम करणारा घटक होय.    
हवामानाच्या थंडपणामुळे युरोपमध्ये व इतर थंड प्रदेशात मद्याचा उपयोग घरोघरी फार पूर्वीपासून होत आला आहे. द्राक्षे व इतर फळे यांपासून मद्य तयार करण्यास सुरुवात फ्रान्समध्ये झाली. केवळ किण्वनाने मिळणारी मद्यं प्रथम प्रचारात आली. त्यानंतर त्यांचं ऊध्र्वपातन (डिस्टिलेशन) करून अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली मद्यं बनविली गेली.  स्थूलमानानं मद्यांचे दोन वर्ग पडतात. एका प्रकारात पिष्टमय पदार्थापासून अगर ज्यामध्ये शर्करा आहे अशा नसíगक पदार्थापासून किण्वन प्रक्रियेनं तयार केलेल्या मद्यांना ‘सरळ मद्य’ म्हणतात. त्यापकी पिष्टमय पदार्थापासून किण्वन प्रक्रियेनं बनणाऱ्या मद्याला ‘बीअर’ म्हणतात आणि शर्करायुक्त नसíगक रसापासून किण्वन प्रक्रियेनं तयार होणाऱ्या मद्याला ‘वाइन’ म्हणतात. या सरळ मद्यांचं ऊध्र्वपातन केलं की दुसऱ्यास प्रकारातील म्हणजेच ऊध्र्वपातित मद्य (स्पिरिटे)  मिळतात. यात इथिल अल्कोहोलचं प्रमाण १५ ते ९८ टक्क्यांपर्यंत असते. उदा. बीअरचं उध्र्वपातन (डिस्टिलेशन) केलं म्हणजे व्हिस्कीचे विविध प्रकार मिळतात आणि वाइनच्या उध्र्वपातनानं ब्रॅण्डीचे निरनिराळे प्रकार बनतात.
मेड नावाचे मद्य मधातील नसíगक साखरेपासून तयार केले जाते. बिअर, व्हिस्की, वोडका असे मद्य पदार्थ पिष्टमय धान्यापासून (उदा. तांदळाच्या, गव्हाच्या, बाजरीच्या, मक्याच्या, ज्वरीच्या पीठापासून) बनवले जातात. वोडकाचे उध्र्वपातन करून त्यात खास ज्युनिपर बेरीजचा स्वाद घालून जीन बनवली जाते. उसाच्या रसापासून साखर वेगळी केल्यावर जी मळी उरते त्यापासून रम हे मद्य तयार केलं जातं. जास्त प्रमाणात मद्य सेवन करणं हे शरीरासाठी घातकच आहे. शिवाय मद्य सतत सेवन केल्यानं मद्याचं व्यसन लागतं. त्यामुळे मद्य प्राशन करू नये.  

मनमोराचा पिसारा: कालिदासांचा हेमंत
महाकवी कालिदासांची प्रतिभा नवनवोन्मेषशाली होती. निसर्गात रममाण होणारे कालिदास रसिक नजरेनं सभोवतालच्या जीवनाचं वर्णन करतात. बदलत्या ऋतुमानाप्रमाणे स्त्री-जीवन बदलतं. त्यांच्या हालचाली, आविर्भाव आणि अलंकार यामध्ये ऋतुमानातला निसर्ग प्रतिबिंबित होतो. कधी मीलनोत्सुक रमणी तर कधी विरहिणी, कधी कामुक तर कधी क्लांत. या सर्व भाववृत्तीला सामायिक ठरतो तो शृंगाररसाचा स्थायिभाव.

शृंगाररस म्हणजे मानवी जीवनातला आणि गात्रांमधला सदैव बहरलेला वसंत! कधी प्रत्यक्ष तर कधी कल्पनेमध्ये शृंगार हाच मानवी आयुष्यातला सहजप्राप्य आनंद, प्रिय व्यक्तीच्या सहवासातील शरीरसुख आणि मनोमीलन म्हणजेच ऋतुसंहार.. महाकवी आधी हेमंतात सर्वत्र आसमंतात विस्तारलेला निसर्ग पाहतात. ऋतूमधील सस्यशामल धरती पाहून म्हणतात-
बहुगुणरमणीयो योषितां चित्तहारी
परिणतबहुशातिल्या कुलग्राम सीम:।
सततमतिमनोज्ञ: क्रौञ्चमालापरीत:
प्रदिशतु हिमयुक्त: काल एष सुखं व:।।१९।।
अनेक गुणवैशिष्टय़ांनी बहरलेला हेमंत मनोहर वाटतो. स्त्रियांचे चित्त वेधून त्यांनाही आनंदित करतो. शामल धान्यानी गावांच्या अन् जानपदांच्या सीमा ओसंडून वाहात आहेत. सर्वत्र समृद्धी आहे. अशा रमणीय ऋतूमध्ये क्रौञ्चपक्षी सगळीकडे विहरत आहेत. असा हा हेमंत सर्वाना सुख देतो. कालिदासांची दृष्टी आता या सुरम्य ऋतूमधील रमणींकडे वळते.
यापूर्वीच्या ऋतूमध्ये (शरद) स्त्रिया शुभ्र रंगाचे पुष्पहार आपल्या पुष्ट स्तनमंडलांवर मिरवीत असायच्या; परंतु आता वातावरणातील गारव्यामुळे धवल रंगाच्या फुलांना चंदनी (की केसर?) रंगात बुडवून त्यांनी रंगीत हारांनी आपल्या स्तनांना सजविले आहे.
एरवी रमणी आपल्या नाजूक दंडांमध्ये बाजूबंद आणि कंकण धारण करतात. अंगाखांद्यावर स्तननितंबावर पातळ रेशमी वस्त्र परिधान करतात; परंतु थंडीच्या दिवसांत मात्र अशी विरल वस्त्रं त्यांना पुरेशी ऊब देत नसावीत. हेमंतामध्ये प्रमदानी इतर अलंकारणंही बदलली आहेत. शरदामध्ये कमरेवर रत्नजडित सुवर्ण मेखला नेसतात, पायामध्ये क्रौञ्चपक्षासारखा सुरेल कलरव करणारी नूपुर बांधत असत. आता त्यांच्या शरीरावर ना त्या मेखला रुळतात ना पायात पैंजण! परंतु रमणी हेमंत विरक्त झाल्यात असं समजू नये. त्या शृंृगाररसाचा परिपोष प्रत्यक्ष रतिसुखात अनुभवत आहेत. कालिदास म्हणतात-
 अन्या प्रकामसुरतश्रमखिन्नदेहा रात्रिप्रजागरविपाटलनेत्र पद्मास्त्रस्तांसंदेश लुलिताकुलकेश पाशा निद्रां प्रयाति मृदूसूर्यकराभितसा
शृंगाररसात रत झालेल्या रमणींचे देह आता थकले आहेत. रात्रभर रतिक्रीडा केल्यानं त्यांचे सुंदर कमळासारखे नेत्र आता लाल लाल झालेत. त्यांचे केशकलाप मुक्त झाले आहेत. रतिसुखात उत्तेजित झालेल्या प्रियकराने ते विस्कटलेले आहेत आणि खांद्यावर रुळत आहेत. आता सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांच्या उबेत निद्रेच्या कुशीत विसावल्या आहेत.
महाकवी कालिदासांना हे सारं मोहक वाटतं. शृंगारातील नख आणि दंतक्षतानं दुखावलेल्या ओठ आणि शरीराला कुरवाळणाऱ्या स्त्रिया म्हणजे शृंगाराचा परमोच्च बिंदू..
मित्रांनो, असा हा हेमंत.. कालिदासांचा.
डॉ.राजेंद्र बर्वे  drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: साहित्यिकाची सामाजिक बांधिलकी कुणाला मान्य नाही
.सामाजिक बांधिलकी न मानणारा लेखकही चांगलं नाटक लिहू शकतो. कारण त्याला अगदी व्यक्तिगत पातळीवरही काही प्रश्न सतावत असतील तर त्यांची अभिव्यक्ती कलात्मक स्वरूपात होऊ शकते. तथापि सामाजिक बांधिलकीचा प्रश्न हा विकासमग्न समाजामध्ये जास्त महत्त्वाचा ठरतो. युरोपमध्ये तो आता कदाचित एवढा महत्त्वाचा ठरणार नाही. कारण विकासाच्या अशा अवस्थेत ते समाज पोचलेले आहेत की तिथे सामाजिक बांधिलकीला काही अर्थच उरलेला नाही. दीज आर सोसायटीज् ऑफ एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम.’’
गो. पु. देशपांडे हे दिनकर बेडेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणतात – ‘‘आपले समाज हे त्या अवस्थेला पोचलेले नाहीत. त्यामुळे येनकेन प्रकारेण सामाजिकता येतेच. ती कधी सामाजिकतेच्या विरोधी होऊन येईल कधी तिचा पुरस्कार करणारी येईल पण सामाजिकता ही येतेच. फक्त सगळे लेखक हे कबूल करतातच असं नाही. पण ज्या प्रकारच्या नाटकांची मी मराठी नाटकाची गोष्ट मध्ये चर्चा केली त्या परंपरेतलं नाटक घेतलं तर त्या नाटकामध्ये एकूण साहित्याची सामाजिक बांधिलकी मानण्याकडे कल आहे असं मला दिसत नाही.  गांधीवाद, टिळकवाद, राष्ट्रवाद यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ठरवून नाटकं लिहिली. पण अशी तुरळक उदाहरणं वगळली तर स्थूलमानानं सौंदर्यवादी परंपराच नाटकाच्या क्षेत्रात अग्रेसर राहिलेली आहे. आणि याला तेंडुलकरसुद्धा अपवाद नाहीत. तेंडुलकरांसारखे नाटककार जरी सकृतदर्शनी सामाजिक प्रश्नावर लिहिताना दिसतात, तरीसुद्धा शेवटी ज्या प्रकारची मूल्यव्यवस्था तेंडुलकर त्यांच्या नाटकांमध्ये मांडतात ती एकप्रकारे आधुनिक युरोपची मूल्यव्यवस्था आहे. हे गैर का वाजवी याची चिकित्सा करण्याची गरज नाही, पण त्या मूल्यव्यवस्थेची अभिव्यक्ती त्यांच्या नाटकातून झालेली मला दिसते. त्यामुळे साहित्यिकाची सामाजिक बांधिलकी फारसं कुणी मान्य करतंय असं मला तरी दिसत नाही.’’