कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज ( Ca2+ , Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकाबरेनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा क्षारयुक्त पाण्याला कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही. वास्तविक कठीण पाणी पिण्यासाठी (र्निजतुक असल्यास) अयोग्य मानले जात नाही. उलट कित्येक नसíगक झऱ्यांचे पाणी आरोग्यास उपकारक मानले जाते. बायकाबरेनेट क्षारांमुळे पाण्याला ‘तात्पुरता कठीणपणा’ आलेला असतो. असे पाणी उकळून व गाळून पिण्यायोग्य बनते. पण त्यातले क्षार काबरेनेट बनून तळाशी जमतात. नळावर असे थर जमा झालेले आपल्या पाहण्यात असतील. क्लोराईड, सल्फेट क्षार मात्र पाण्याला ‘कायमचा कठीणपणा’ बहाल करतात. कठीण पाण्याने आंघोळ वा कपडे धुणे जमत नाही, कारण साबणाचा फेस न होता साका तयार होतो. हा साका सफेद कपडय़ांवर जमा झाल्यास काही दिवसांनी सफेद कपडे पिवळट, मळकट दिसतात. चिलेट (chelates) युक्त डिर्टजट वापरल्यास कठीण पाण्यातही कपडे चांगले धुता येतात. कठीण पाण्याला मृदू करण्यासाठी आयन एक्सचेंज रेझिन वापरतात. यात कॅल्शिअम, मॅन्गनीजचे आयन काढून सोडिअम आयनचे क्षार बनवले जातात आणि पाण्याला मृदुपणा प्राप्त होतो. पाणी उकळवून आलेल्या वाफेला थंड करून वेगळे केलेल्या पाण्याला ‘ऊध्र्वपातित पाणी’ म्हणतात. असे पाणी औषधोपचारांसाठी वापरतात. ‘जड पाणी’ हा शब्द अणुभट्टीच्या बाबतीत ऐकू येतो. नेहमीचे पाणी म्हणजे हायड्रोजन ऑक्साइड, तर जड पाणी हे डय़ुटेरियमचे ऑक्साइड असते. अणुभन्जनातून निघालेले किरण, अणुकण, उष्णता शोषून घेण्यासाठी जड पाणी वापरले जाते. जड पाणी आणि साधे पाणी हे रासायनिकदृष्टय़ा एकच आहेत. पिण्याच्या पाण्यात दर दशलक्ष थेंबांमध्ये अंदाजे ७५ थेंब जड पाणी असते. मनमोराचा पिसारा: चक्क स्टेशनात!समोरच्या दृश्यानं स्तिमित झालो. आपण कुठे आहोत? कशासाठी इथे आलो आहोत? कुठे जायचं आहे, याचा विसर पडला.एका महानगराच्या मुख्य स्थानकामध्ये, ऐन गर्दीच्या वेळी बिझी कम्युटर म्हणून वावरत असूनही तिथेच खिळून उभा राहिलो. विसावलो आणि ते दृश्य मनात साठवत राहिलो.माद्रिद शहराच्या रेल्वे स्टेशनमधला हा अनुभव. युरोपात असतं तसं आखीवरेखीव स्टेशन. स्पेनमध्ये असल्यामुळे अंमल जास्त, रहदारी होती इतकंच.स्टेशन विस्तीर्ण आहे, एखाद्या प्रचंड इन्डोअर स्टेडियमसारखं. पण आयताकृती.या स्टेशनच्या मुख्य भागात मोठी विस्तारलेली बाग आहे. बाग कसली ४००० स्क्वेअर मीटरचं जंगल आहे. उंच उंच पामवृक्ष आहेत, एखाद-दुसरा माड आहे. स्टेशनच्या छतामध्ये भलंमोठं ग्लास कव्हर आहे, त्यातून सूर्याचा लख्ख प्रकाश आनंदानं या बागेत पसरतो. त्या स्कायलाइटनं स्टेशनमधला अवकाश प्रकाशात न्हातो. आपण तिकीट चेकइन करून सरकत्या जिन्यानं उतरू लागलो की ही जंगलवजा बाग आपल्याला अधिक स्पष्ट दिसते.पामवृक्षांच्या झावळ्यांनी या बागेवर हिरवकंच छप्पर केलेलं आहे. त्यातून खाली झेपावणारा प्रकाश अधिकच गहिरा होतो आणि त्या किंचित काळसरपणानं ते जंगल आता गूढ रम्य वाटू लागतं. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल सात हजार झाडं तिथे आहेत. २६० प्रकारच्या वनस्पतींच्या संग्रहामुळे ती बाग आता ‘बोटॅनिकल गार्डन’ झालीय. एका गजबजलेल्या प्रमुख रेल्वे स्टेशनच्या आत अशी बाग हा विस्मयचकित करणारा अनुभव होता. युरोपातली मोठी स्थानकं एखाद्या दुकानासारखी सजली-धजलेली असतात. टोक्योत तर अनेक मजली मॉलमध्ये कुठे तरी मेट्रो स्टेशन असतं.मोठमोठय़ा विमानतळामध्ये झाडंझुडपं अर्थातच वज्र्य नाहीत. अगदी मोठाली झाडं कुंडय़ांमध्ये विराजमान असतात. तरी शोभिवंत फुलझाडं शिष्टासारखी जागोजागी उभी असतात. पण इथे तर! जवळून पाहिल्यावर अधिकच आश्चर्य. जंगलाच्या जमिनीवरचं नैसर्गिक मॉस आणि अधूनमधून जाणाऱ्या चिमुकल्या वाटा. आत खोलवर पाहिलं तर वेलींच्या जाळीने केलेले लहानमोठे मंडप आणि पलीकडे छोटंसं तळं, त्यात मासे. अनेक प्रकारची कासवं, त्यांच्याकरता ठेवलेल्या दगडांवर ऊन खात सुस्त.. आत वावरायला बंदी असली तरी वाटलं हळूच जावं आणि कुठे तरी आसन मांडून बसावं. नि त्या निसर्गाचाच एक भाग व्हावं.. पण ते शक्य नव्हतं. मग डॅफोडिल्सवाल्या वर्डस्वर्थसरांना स्मरून मनातच त्या बागेची प्रतिमा कोरून ठेवली. आणि आता रोज आठवण करतो मुंबईतल्या स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून.. त्या अटोचा स्टेशनची..डॉ.राजेंद्र बर्वे प्रबोधन पर्व: स्वच्छतेचे दुराग्रही इंद्रिय आवरा‘‘इंद्रियांची तोंडें बाहेर आहेत, त्यामुळे त्यांचें पाहणें आंतल्या बाजूस होऊच शकत नाही. डोळ्यातल्या बाहुलीला बाहेरची दुनिया लख्ख दिसते; पण आंत सगळा अंधार असतो. आंतल्या गुहेचें दर्शन तिला नाही. कान बाहेरचे सूर ऐकण्यात सताड उघडे असतात; पण आंतला आवाज ऐकण्याच्या कामीं ते तितकेच मिटलेले असतात. हा इंद्रियांचा स्वभाव ओळखून शहाणे लोक इंद्रियांच्या पाहण्यावर भरवसा ठेवीत नाहीत. पण ज्या लोकांचें मन इंद्रियांच्या मागे धावत असतें त्यांच्या मनालाहि इंद्रियांप्रमाणे बाहेरचें वळण लागतें. आणि एकदा विचार करण्याचेंच इंद्रिय बहिर्मुख बनलें म्हणजे मनुष्याची हालत डोळे असून आंधळा किंवा कान असून बहिरा अशासारखी होऊन बसते. वस्तूचा वरवरचा आकार त्याला दिसतो, पण अंतरंगाला तो पारखा होतो. आजचा आपला समाज बहुतेक अशा जातीचा आहे. त्याचें एकंदर देखणेंच बावरलें आहे. त्यामुळे बरें आणि वाईट ह्य़ांतला फरक समजण्याइतकाहि विवेक त्यात उरलेला नाही.’’ इंद्रियांची ही मर्यादा सांगत आचार्य विनोबा भावे स्वच्छतेच्या इंद्रियालाही योग्य मर्यादेनंतर आवरायला सांगतात, ते असे -‘‘वास्तविक स्वच्छता म्हणजे पवित्रतेच्या ग्रंथाचें बाइंडिंग आहे. स्वच्छतेवरून पवित्रतेचा अंदाज करणें म्हणजे बाइंडिंग पाहून ग्रंथावर अभिप्राय देण्यासारखें आहे. बहुतकरून स्वच्छता आणि पवित्रता जोडीने जातात हे काही खोटें नाही; पण कधी कधी ह्य़ांची जोडी कुस्तीची असते हेंहि विसरून चालणार नाही.. स्वच्छता राखण्याची इष्ट तितकी काळजी घ्यावी, पण स्वच्छतेचें स्तोम माजवू नये. स्वच्छतेचा सत्याग्रह राखून देवळें बाटवू नयेत. ईश्वराच्या लेकरांना त्याच्याच नांवाखालीं त्याच्यापासून दूर राखण्याचा प्रयत्न करणें म्हणजे स्वत: ईश्वरापासून दूर जाण्यासारखें आहे. आईला स्वच्छ मुलें आणि शेंबडी मुलें हा भेद ठाऊक नाही. तिला दोन्ही प्यारीं आहेत. शेंबडय़ा मुलाविषयी तिला अधिक काळजी आहे. आईची काळजी लक्षात घेऊन आम्ही वागलें पाहिजे. नाही तर आमच्यासारखे पतित आम्हीच होऊ.’’