आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टींपकी प्राणवायू, धान्य आणि पाणी या गोष्टी निसर्गानं आपल्याला मुक्तहस्तानं दिल्या आहेत. त्यातल्या धान्य आणि पाण्यावर निसर्गाने आणि माणसाने अनेक प्रकारे प्रक्रिया करून त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. याखेरीज निसर्ग काही वस्तूंवर स्वत:च प्रक्रिया करून त्याची काही वेगळीच रसायनं निर्माण करीत असतो. ताडाच्या झाडापासून मिळणारी ताडी किंवा माडापासून तयार होणारी माडी ही उदाहरणं घेता येतील.
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडलं जातं. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे ‘माडी’. हा sam07स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडकं बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढं भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. ताडीमध्ये शर्करा आणि काही प्रमाणात आम्ल असतं. हवेतले यीस्ट लगेच माडीतल्या शर्कराचा कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल करण्याच्या कामाला लागतात, म्हणजेच माडीमध्ये किण्वन प्रक्रिया किंवा आंबवणे (फर्मेटेशन) ही प्रक्रिया सुरू होते. शर्करा यीस्टनं संपवल्यामुळे माडीची आधीची चव, इतकंच नाही तर वासही बदलतो. याचप्रमाणे ताडाच्या झाडांपासून ताडी निर्माण होते. ताडाच्या फळाच्या पेंडीच्या बुंध्याला खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते, ती मादक पेय आहे. रसापासून गूळ व साखरही करतात. मादी झाडापासून नर झाडापेक्षा जवळजवळ दीडपट जास्त रसाचं उत्पादन होतं. ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात. त्यात १२ टक्केसाखर असते. ताडी अनेक लोकांच्या आवडीचं उत्तेजक, स्वस्त व मादक पेय आहे. हा रस आंबला जात असता पहिल्या ३-८ तासांत ३ टक्के इथिल अल्कोहोल व १ टक्का आम्ले असतात. प्रक्रिया चालू ठेवल्यास ५ टक्के इथिल अल्कोहोल बनते. त्यापेक्षा जास्त आंबल्यास ती मनुष्याला पिण्यास योग्य नसते.
 
मनमोराचा पिसारा: नैना लड जइ है
प्रेमात पडण्याचा क्षण सहसा नाजूक असतो. एखाद्या जलाशयाच्या शांत पृष्ठभागावर लहानसा खडा पडून तरंग उमटावे, तशी मनात नकळत स्पंदनं उमलतात. थोडी हुरहुर, थोडी आठवण, थोडी उत्सुकता आणि अचानक चेहऱ्यावर पसरणारं आत्ममग्न स्मित. सूक्ष्म दैहिक आणि मानसिक जाणिवेतून हळूच जाणवतं. कहीं मुझे इष्क तो नहीं हुआ उनसे? मग अधिकच अस्वस्थता, ही कोमल स्पंदनं दोन्ही बाजूला जाणवताहेत की मला. फक्त मलाच? करावं का प्रेम व्यक्त? करावा का इजहार मोहब्बत का?
sam06मनाच्या पातळीवरचे हे हेलकावे म्हटले तर गोड, म्हटले तर साशंक व्याकूळतेचे!
या सर्व हळव्या भावनांना छेद देणारं आणि प्रेमात पडण्याच्या एहसासचा जल्लोष करणारं गाणं. खूप लोकप्रिय आहे तसं. जुनंच आणि अर्थातच मनमोहक.
श्रेय भोजपुरी भाषेतल्या गाण्याचे शब्द शकील बदायुनी यांचे. केवळ शब्दच नाहीत, तर प्रेमाचा नायकावर कसा परिणाम झालाय, इम्पॅक्ट झालाय यासाठी वापरलेल्या संकल्पनाही साध्यासुध्या आणि देहाती. प्रेमाचा फटाका उडून होणारा धमाका आणि ‘फांस लगी है तो करेजवामा खटक होईबे करी.’
जणू काही नायकाच्या धुंद तऱ्हेवाईक वागण्याचा नायिका आरोप करतेय आणि नायक आपल्या अस्वस्थ वृत्तीचं समर्थन करतोय आणि आत्मसमर्थन करताना, माझेही हाल होतायेत हे तो सांगायला विसरत नाहीये म्हणजे ‘होयी गवा सारा चौपट रुजगार..’
गाण्याची मांडणी लोकगीतासारखी आहे, पण त्यातली सगळी गंमत ते दृश्यरूपात पेश करण्यात आहे.
दिलीपकुमारच्या सर्वागसुंदर अभिनयाबद्दल काय बोलावं? पण या गाण्यात युसूफसाब असे काही नाचलेत की पाहात राहावं.
नायकाचा निरागसपणा, स्वत:च्या हक्काच्या जाणिवेने आलेला खमकेपणा तर दिसतोच, पण प्रेमात पडण्याची धुंदी, बेहोशी दिलीपकुमारच्या चेहऱ्यात यथातथ्य उमटते.
लोकनृत्यातल्या दिलीपकुमार किंवा कोरसच्या हालचालीत खरं पाहता कोणत्याच अवघड स्टेप्स नाहीत. अलीकडे शाळांच्या वार्षिक कार्यक्रमात याहून बोल्ड हालचाली असतात, पण या नाचातली प्रत्येक हालचाल आणि आविर्भाव बोलका आहे, उत्स्फूर्त आहे. कोणीही असंच नाचेल असं स्वाभाविकपणं वाटतं.
नौशादमियांचा तर उत्तर प्रदेशी लोकगीत मांडण्यात जबर हातखंडा.
गाणं म्हणजे शंभर टक्के मस्त, रिलॅक्स फीलिंग, कधीही पाहावं, ऐकता ऐकता मोराचे पाय आपोआप का थिरकतात. हे अनुभवता येईल. फक्त गाण्यात शेवटी ‘दिल ले गयी धोबनिया राजा कैसा जादू डाल के. धोबन का?’
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: राम बापट  – लोकाभिमुख विचारवंत
राम बापट (१९३१-२०१२) यांच्याकडे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते पन्नासहून अधिक वर्षे आकर्षित झाले होते. त्यातील बऱ्याच चळवळी-संघटनांचे ते सबकुछ होते. त्यांच्याविषयी डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ‘‘बापटसरांच्या एकूण चरित्राकडे पाहिल्यास जर कुणाची आठवण होत असेल तर ती प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याची. कारण सॉक्रेटिस कुठेही मार्केटमध्ये, चौकात उभा राहायचा. आणि त्याच्या भोवती अ‍ॅथेन्समधील तरुण गोळा व्हायचे आणि ते सॉक्रेटिसला सतत प्रश्न विचारायचे. सॉक्रेटिस त्यांना उत्तर द्यायचा. कधी कधी सॉक्रेटिस त्या तरुणांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं काढून घ्यायचा. सॉक्रेटिसची ही पद्धती आणि बापटसरांची पद्धती यात मला खूप साम्य वाटतं.’’
बापट यांच्या नावावर केवळ दोन पुस्तके आहेत. ‘परामर्श’ (२०११) हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांना लिहिलेल्या सहा प्रस्तावनांचा संग्रह आहे, तर ‘राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद’ (२०१३) यात काही लेख व व्याख्यानांचा समावेश आहे. त्यांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, नाटय़शास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, सामाजिक चळवळी, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा यांचा गाढा अभ्यास होता. पण बापटसरांचं मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी गेल्या ४०-५० वर्षांत सामाजिक संस्था- संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गात व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील. महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय, पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यास वर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली आहेत. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जाणार. सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडणार. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत. बापट लोकाभिमुख विचारवंत होते. ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ हा त्यांचा बाणा, ध्यास आणि  श्वास होता.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा