डॉ. आदिती पंत या अंटाक्र्टिका खंडावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समुद्रवैज्ञानिक आहेत. १९८३ मध्ये प्रदीप्त सेनगुप्ता या भूगर्भशास्त्रज्ञाबरोबर इंडियन अंटाक्र्टिक कार्यक्रमांतर्गत त्यांनी अंटाक्र्टिकाला जाऊन विशेष अभ्यास केला. आप्पासाहेब पंत या भारत सरकारच्या राजनैतिक उच्चयुक्तांची कन्या असलेल्या आदिती यांचा जन्म ५ जुलै १९४३ रोजी नागपूर येथे झाला. त्यांची आई वैद्यकीय डॉक्टर होती. तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. केल्यावर ‘अॅलिस्टर हार्डी’ यांचे ‘ओपन सी’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले, तेव्हाच समुद्रविज्ञानात करिअर करायचे त्यांनी ठरवले. अमेरिकेतील हवाई विद्यापीठात समुद्र विज्ञानपदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. येथे त्यांनी सूर्यप्रकाशाची उपलब्धता आणि त्याचा प्लवकांच्या
समुदायात घडणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर होणारा परिणाम या विषयावर प्रबंध लिहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन विद्यापीठाच्या वेस्टफिल्ड महाविद्यालयातून त्यांनी समुद्र शैवालांच्या शरीरक्रियाशास्त्रावर पीएच.डी. केले. त्यानंतर त्यांनी भारतातील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत (एन.आय.ओ.) १७ वर्षे काम केले. त्या वेळी अंटाक्र्टिक समुद्राचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे कार्यक्रम राबवले जात. नंतर त्या पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधन करू लागल्या. अन्नसाखळीमधील काही ठरावीक क्षार-प्रेमी सजीवांच्या विकरांवर त्यांनी संशोधन केले. २००३ ते २००७ या काळात पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात त्या मानद प्राध्यापक झाल्या.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr aditi pant the first indian woman oceanographer to visit antarctica amy
First published on: 10-03-2023 at 03:24 IST