जीवाश्म खडकात आढळतात, म्हणून जीवाश्मांचा अभ्यास भूविज्ञानात करतात. पण जीवाश्म हे सजीवांचे अवशेष असल्याने त्यांचा अभ्यास जीवविज्ञानातही करतात. म्हणूनच पुराजीवविज्ञानाला, म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानशाखेला, भूविज्ञान आणि जीवविज्ञान यांच्या सीमारेषेवरील विज्ञानशाखा म्हणतात. अर्थात जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळणारी माहिती भूविज्ञानाच्या आणि जीवविज्ञानाच्या अभ्यासकांना सारखीच उपयुक्त असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवाश्मांपासून मिळणारी जी विविध प्रकारची माहिती भूवैज्ञानिकांना उपयोगी ठरते, त्यात प्राचीन पर्यावरणाचा, म्हणजे पुरापर्यावरणाचाही समावेश असतो. पुरापर्यावरणाविषयी निष्कर्ष काढताना भूवैज्ञानिकांच्या मनात एक सूत्र असते. ते सूत्र आहे नैसर्गिक प्रक्रियांच्या कालातीत एकसमानतेचे. ते सूत्र सांगते की भूतकाळाविषयी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानकाळ गुरुकिल्ली म्हणून उपयोगी पडतो. हे सूत्र वापरून प्रवाळवर्गीय प्राण्यांच्या जीवाश्मांवरून पुरापर्यावरणाची माहिती कशी मिळते ते आपण पाहू.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment fossil geology study faculty of science alive amy
First published on: 11-10-2022 at 01:54 IST