वैशाली पेंडसे-कार्लेकर vaishali.karlekar1@gmail.com

मराठीत सध्या असलेली क्रियापदे पाहिली, तर ती जा- जाणे, ये- येणे, कर- करणे अशा मूळ धातूंपासून आणि पाणी- पाणावणे, लांब- लांबवणे, खाली- खालावणे अशा नाम, विशेषण, क्रियाविशेषण अशा वेगवेगळय़ा शब्दांपासून तयार झालेली दिसतात. या प्रकारे अजून क्रियापदे घडवली तर पत्र- पत्रणे, प्रयत्न- प्रयत्नणे, प्रसिद्ध- प्रसिद्धणे, बरोबर- बरोबरणे, तयार- तयारणे, टपाल- टपालणे अशी करता येतील.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

यापूर्वी आपण फारसी शब्दांपासून खर्च- खर्चणे- खर्च करणे, बदल- बदलणे- बदल करणे अशी मराठी वळणाची क्रियापदे करून घेतली आहेतच. याच धर्तीवर काही रुळलेले इंग्रजी शब्द घेऊन मेल- मेलणे- मेल करणे, पोस्ट- पोस्टणे- पोस्ट करणे, फोन- फोनणे- फोन करणे, शेअर- शेअरणे- शेअर करणे अशी इंग्रजीवर मराठी साज चढवून तयार केलेली क्रियापदेही स्वीकारावीत का? आज समाजमाध्यमांमध्ये काही जण ती वापरतही आहेत. ती स्वीकारावीत की नाही, हा इथे कळीचा मुद्दा आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (मराठय़ांच्या इतिहासाची साधने खंड- ८) म्हणतात, ‘शपथ खाणे’, ‘याद राखणे’ अशा प्रकारच्या क्रियापदांचे मूळ फारसीतच शोधले पाहिजे. मराठी बखरकारांनी व कारकुनांनी आपल्या भाषेचे संस्कार फारसी शब्दांवर चालवले त्यामुळे त्या शब्दांचा नूर उतरून गेला आणि ते इतर मराठी शब्दांप्रमाणे वापरले जाऊ लागले.’ डॉ. माधवराव पटवर्धन (फारसी-मराठी कोश- प्रस्तावना) आपल्या विवेचनात म्हणतात, ‘अशा प्रकारे करणे, मारणे, देणे यांच्यापूर्वी इतर शब्द योजून संयुक्त क्रियापदे तयार करण्याचा प्रकार फारसीवरून मराठीने उचलला.’ थोडक्यात, शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी परभाषेतले शब्द, संकल्पना स्वीकारताना ते भाषेचा स्वभाव, उच्चार, व्याकरणिक आचार-विचार यानुसार वळवून घेतले की त्या भाषेत मिसळून जातात, असे आढळते. आज इंग्रजीचा मोठा प्रभाव किंवा दबाव मराठी भाषेवर आला आहे आणि तो वाढतच चालला आहे. सोपे, अर्थवाही मराठी प्रतिशब्द तयार करून वापरात आणणे हा त्यावर एक उपाय आहेच. पण तरीही असंख्य इंग्रजी शब्द मराठीच्या दारे-खिडक्यांवर उभे आहेत; त्यांना परतवायचे, सनदशीर मार्गाने आपलेसे करून आत घ्यायचे की लोंढय़ाने येतील तसे घुसू द्यायचे, याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे.