ही दोन वाक्ये वाचा :

(१) ‘वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य हे परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.’

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
How sugar sakhar and chini get its name
Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…

(२) ‘मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हे वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.’

या दोन्ही वाक्यांत एक चूक आहे, ‘हे’ हा शब्द. या दोन्ही वाक्यांत ‘हे’ हे सर्वनाम, नपुसकिलगी, एकवचनी आहे. वास्तविक पहिल्या वाक्यात हे सर्वनाम ‘वार्धक्य’ किंवा ‘दीर्घायुष्य’ या नपुसकिलगी नामाचे नसून ‘कृपा’,‘अवकृपा’ या स्त्रीलिंगी एकवचनी नामांचे आहे. तसेच, दुसऱ्या वाक्यात ‘हे’ हे नपुसकिलगी सर्वनाम ‘सौंदर्य’ या नपुसकिलगी, एकवचनी नामाचे नसून ते ‘शाप’ ‘वर’ या (पुल्लिंगी) नामांचे आहे. हे शब्द – नामे, पुल्लिंगी, एकवचनी आहेत, त्यामुळे ही वाक्ये अशीच योग्य आहेत. (१) ‘वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य ही परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.’ (२) मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हा वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.

या संदर्भात लोकमान्य टिळकांचे एक अत्यंत प्रसिद्ध वचन येथे उद्धृत करावेसे वाटते. – ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ ‘हा’, ‘तो’ ही पुल्लिंगी सर्वनामे ‘स्वराज्य’ या नपुसकिलगी नामाची नसून, ‘हक्क’ या पुल्लिंगी नामासाठी आहेत.

अलीकडेच ‘लोकसत्ता’त छापलेले हे वाक्य पाहा – ‘मुंबई पोलीस प्रशासनाने काढलेला आदेश हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाठपुराव्याचे यश आहे’ असे परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. ‘हे’ हे सर्वनाम (नपुसकिलगी एकवचनी) ‘आदेश’ या पुिल्लगी नामाचे नसून ‘यश’ या नपुसकिलगी नामाचे आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.

शब्दात होणारी चूक

 लिहिण्यात आणि बोलण्यातही काही चुकीची रूपे आढळतात. भाषा- भाषक आणि भाषिक . यापैकी भाषक हे नाम असून भाषिक हे विशेषण आहे. ‘मराठी भाषिक’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. भाषक म्हणजे बोलणारा- मराठी भाषा बोलणारा तो मराठी भाषक. भाषिक  म्हणजे भाषेतील, भाषेसंबंधी, भाषाविषयक जसे भाषिक व्यवहार, भाषिक अपप्रयोग इ.

यास्मिन शेख