निसर्गातील क्षुल्लक वाटणारे कीटक त्यांच्या बहुमोल कर्तृत्वाने गेली कित्येक शतके मानवजातीसाठी मोठे योगदान देत आहेत. मधमाशी, रेशीमकिडा आणि लाखनिर्मिती करणारा कीटक त्यांच्यात असणाऱ्या क्षमतेमुळे हे शक्य झाले आहे.

मधमाशी तर अविश्रांत परागीभवन करीत असते, त्यामुळे मानवाला अन्नधान्य मिळण्यासाठी यांचीच अप्रत्यक्ष मदत होते. मध हा चविष्ट आणि आरोग्यपूर्ण पदार्थ मधमाश्यांच्या परिश्रमामुळे निर्माण होत असतो. मधनिर्मिती ही टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया आहे. कामकरी माश्या वसंत आणि ग्रीष्म ऋतूत फुलातून आपल्या खास मुख-अवयवाने मधुरस आणि पराग घेऊन येतात. हे करत असताना एका खेपेमध्ये त्या कमीत कमी शंभर फुलांना भेट देतात. त्यांच्या शरीरात असणाऱ्या खास पिशवीत किंवा ‘हनी-स्टमक’मध्ये हा मधुरस लाळेबरोबर मिसळला जातो. या पिशव्या पूर्ण भरल्या की त्या पोळय़ाकडे परत येऊन पोळय़ात राहणाऱ्या कामकरी माश्यांच्या ताब्यात हा मध देतात. हा मधुरस एका माशीच्या मुखातून दुसऱ्या माशीच्या मुखात देताना त्यात विविध विकरे मिसळली जातात. यामुळे त्याचा सामू आणि रासायनिक गुणधर्म बदलतो. एका माशीकडून दुसऱ्या माशीकडे जाताना मधाचे निर्जलीकरण होतेच, शिवाय मधाच्या पोळय़ावर तो पसरून सुकला जातो. शिवाय इतर मधमाश्या आपले पंख सतत फडफडवत राहतात आणि मधात असलेले ७० टक्के पाणी हळूहळू १७ ते २० टक्के इतक्या प्रमाणावर येते. या मधाची मधमाश्यांना स्वत:साठी गरज असते. त्यांच्या पोषणासाठी ते मध आणि पराग सेवन करत असतात. नव्या अळय़ांना खास आहार दिला जातो. राणी बनणार असेल तर तिला रॉयल-जेली आहार मिळतो. आपल्या अन्नाच्या साठवणीकरिता त्यांनी हे अफाट काम केलेले असते.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

मधमाशीच्या या नैसर्गिक आहारात आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. मध टिकावा म्हणून मधमाश्या पोळय़ाला बी-वॅक्सचे किंवा मक्षिकामेणाचे बूच लावतात बी-वॅक्स हा नैसर्गिक, पर्यावरणस्नेही, जलरोधक, जिवाणूविरोधक आणि बुरशीविरोधक असा असल्याने त्याचा अनेक ठिकाणी उपयोग करता येतो. यात प्रोपोलीस किंवा सेरा अल्बा हा नैसर्गिक पदार्थ असतो. या पदार्थाची निर्मिती कामकरी मधमाशी तिच्या पोटाकडच्या खंडात असलेल्या आठ ग्रंथींमधून करते. यात मेदाम्लाची इस्टर्स आणि अल्कोहोलच्या लांब  शृंखला असलेली रसायने असतात. मधमाश्या डंख मारतात या समजामुळे त्यांची पोळी जाळून त्यांचा नायनाट करणे हे मानवजातीला खूप महागात पडू शकते. मधमाशी नाहीशी झाली तर आपणदेखील संपलोच हे लक्षात ठेवावे!

 -डॉ. नंदिनी विनय देशमुख  मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org