scorecardresearch

कुतूहल – हायड्रोजन वायू (H2)

इंधनांची वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर विचार चालू आहे. खनिज तेल, कोळसा,

इंधनांची वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर विचार चालू आहे. खनिज तेल, कोळसा, लाकूडफाटा या इंधनांमुळे हवेचे प्रदूषण घडते व जागतिक स्तरावर वातावरण बदलत जाते. याउलट वाहतुकीसाठी गाडय़ांच्या इंजिनात हायड्रोजन वायूचा वापर केला तर केवळ ऑक्सिजन वायू व बाष्पाची निर्मिती होते. हे दोन्ही घटक वातावरणाला बाधा आणणारे नाहीत.
निसर्गातील आम्ल-अल्कलीचा समतोल राखण्यास हायड्रोजनचा हातभार लागतो. कारण त्याचा अणू निरनिराळ्या परिस्थितीत धनभार वा ऋणभार धारण करू शकतो. हायड्रोजनचा समस्थानिक असलेल्या प्रोटियम या मूलद्रव्यात एक प्रोटॉन असतो व न्यूट्रॉन नसतो. त्याचे हे एक अणुरूप या विशाल विश्वात मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे. ताऱ्यांमध्ये हा वायू प्लाझ्माच्या रूपात असतो. हेन्री स्कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने १७६६-८१ च्या दरम्यान धातूवर आम्लाची प्रक्रिया करून या वायूची निर्मिती केली होती. औद्योगिक क्षेत्रात नसíगक वायूपासून त्याची उत्पत्ती होते.
परंतु हायड्रोजन वायूचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून तो ‘फ्युएल सेल’द्वारा दूरवर पसरवलेल्या ग्राहकांना पुरवणे खíचक असते. ‘फ्युएल सेल’ची अवास्तव किंमत आणि हायड्रोजन वायूची वितरण करणारी यंत्रणा या दोन समस्या मोठय़ा जिकिरीच्या ठरत आहेत. जनरल मोटार, टॉयोटा, होंडा या दादा कंपन्या मात्र हायड्रोजन वायूवर धावणाऱ्या गाडय़ा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच भरपूर खर्च आणि कमी मागणी त्यामुळे पेट्रोल पंपावर हायड्रोजन वायूच्या वितरणाची यंत्रणा बसवून घ्यायला वितरक नाखूश असतात.
हायड्रोजन वायू एक तर खनिज तेलांतून मिळवला जातो किंवा खनिज इंधनाद्वारे घडवून आणल्या जाणाऱ्या विद्युतप्रक्रियांतून निर्माण केला जातो. त्यामुळे या निर्मितीत नकळत हवेचे प्रदूषण होत राहतेच. त्यामुळे जल-वायू-सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून हायड्रोजन वायूची निर्मिती करता आली तरच या वायुरूप इंधनाची ‘क्लीन फ्युएल’ म्हणून प्रशंसा होईल.
हायड्रोजन वायूचा वाहनातील इंधन म्हणून वापर करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न चालू आहेत. ‘मोअर िथग्स चेंज मोअर दे स्टे’, हीच गत हायड्रोजन इंधनाबाबत होत आहे.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – ‘हार्ड वायर्ड’ म्हणजे काय?
बदलत्या काळाबरोबर लवचीक भाषा बदलत जातात. विशेषत: औद्योगिक आणि संगणक क्रांतीनंतर नवे शब्द, नवी क्रियापदं आणि शब्दप्रयोग जगातल्या सर्व भाषांत रुळले. भाषा तत्कालीन सामाजिक मानसिकतेचं भान राखत अधिक समृद्ध झाल्या. नव्या शब्दांची सरमिसळ झालेली भाषा वापरणाऱ्या भाषकांच्या मनोवृत्तीचं त्यात प्रतििबब उमटू लागलं की ती बोली भाषा अधिक प्रवाही आणि अभिव्यक्ती करू शकते. कधी मूळ भाषेतला हरवलेल्या शब्दांचं पुनरुज्जीवन होतं तर कधी संपूर्ण नवे शब्दप्रयोग मराठाळलेले होतात. उदा. हार्ड वायर्ड एखादी सवय हाडीपाशी खिळणे, सहजपणे कृती घडणे, न कळत दिलेला प्रतिसाद म्हणजे टिपिकल प्रतिसाद अशा अर्थानं हे शब्द वापरले जातात.
परंतु नृत्यामधल्या विविध कौशल्यपूर्ण हालचाली, गाण्यामधल्या हरकती, आलाप, उत्तम भाषण अशा अंगवळणी पडलेल्या  निपुण क्रियांना ‘हार्ड वायर्ड’ म्हटलं जात नाही.
राजकीय पुढाऱ्यांचे ठरावीक प्रतिसाद, पोथीनिष्ठ विश्लेषकांनी केलेली प्रेडिक्टेबल टीका, कुस्ती खेळताना घेतलेले बचावात्मक अथवा आक्रमक पवित्रे या गोष्टी गुंतागुंतीच्या असल्या तरी हार्ड वायर्ड आहेत; असं आपण म्हणतो. पण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याकरता वायरी दुरुस्त करणाऱ्या घरगुती इलेक्ट्रिशिअन, वायरमनकडे जायला नको. या वायरी हार्ड असल्या तरी प्रत्यक्षात मात्र ‘सॉफ्ट’ असतात, कारण या वायरी निळ्या-पिवळ्या वेष्टनातल्या नसून मेंदूमधल्या विविध पेशीजालांमधली कनेक्शन असतात.
मेंदूमधल्या पेशी परस्परांशी केमिकलची (जीवरसायनं. उदा. डोपामिन, सेटो टोनिन इ.) देवाणघेवाण करीत बोलत असतात. अशा नित्य कर्माच्या कामाशी संलग्न असलेल्या पेशींची ही  ‘कनेक्शनं’ पक्की आणि कायमस्वरूपी असतात. जणू काही ही कनेक्शनं म्हणजे नित्य वापरातल्या दिवे -पंखे यांना जोडणाऱ्या वायरी. या वायरींवरून नेमाने विद्युतवहन झाल्यामुळे जणू काही अशा संदेशवहनांची त्यांना सवय होते. प्रत्यक्षामध्ये मेंदूमधल्या पेशी अशी अनेक संदेशवाहक कनेक्शनं सांभाळत असतात.
सवय लागते म्हणजे मेंदूमधल्या त्या विशिष्ट हालचाली करणाऱ्या पेशींची ही कनेक्शनं अथवा वायरिंग निश्चित होतात. पेशी आपोआप त्या वायरींमधून नॅनो सेकंदात धडाधड संदेश धाडतात. आपण ती कृती करून मोकळे झालेले असतो. अशा आपोआप घडणाऱ्या-  उदा. चेहऱ्यावरची माशी हाकलणे, डोळे चुरचुरणे, शिंका, चटका लागल्यावर हात दूर करणे. या कृतींना प्रतिक्षिप्त क्रिया अथवा रिफ्लेक्स अ‍ॅक्शन म्हणतात. या हार्ड वायर्ड क्रिया उपजत असतात. आपण लहानाचे मोठे होताना पुष्कळ गोष्टी नि क्रिया पुन:पुन्हा करतो आणि त्या क्रिया हार्ड वायर्ड होतात. उदा. धावणं, खाणं, लिहिणं इ.
परंतु हार्ड वायर्ड शब्दाला आणखी खास अर्थ आहे. काही प्रतिक्रिया विचारपूर्वक, साधकबाधक आठवणींचा मेळ घालून करायच्या असतात. त्या ऐवजी आपण विचार न करता एखादी प्रतिक्रिया नकळत देऊन टाकतो. त्यामुळे, ठरावीक साच्याच्या राजकीय प्रतिक्रिया पाहातो. या प्रतिक्रिया वास्तवाची दखल घेऊन दिलेल्या असतात. घरामधल्या नवरा-बायकोच्या भांडणामध्ये असेच ठरावीक हार्ड वायर्ड रिस्पॉन्स आढळतात. त्यामुळे अनेकदा हार्ड वायर्ड हास्यास्पद ठरतात! भाषा बदलते आणि समृद्ध होते, कारण जुन्या किंवा ठरावीक शब्दांना विशेष अर्थ प्राप्त होतो.
.. हे बघणं म्हणजे पिसारा फुलणं!
 डॉ.राजेंद्र बर्वे –     drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – अराजकतेचे व्याकरण आणि विभूतीपूजा
‘‘केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठय़ा प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ  शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.’’ २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान संमत करताना केलेल्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
‘‘दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वाना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, ‘‘लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.’’ संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.. इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते.’’

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hydrogen gas h2

ताज्या बातम्या