इब्न सौद याने १९०२ मध्ये  हद्दपारीतून सुटका करून घेत त्यांचा पूर्वीचा रियाध आणि त्याच्या आसपासचा प्रदेश घेण्याचा धडाकाच लावला. १९०२ ते १९२६ या काळात इब्न सौदने रियाध, नेज्द, हेजाझ, अल-हासा, असिर वगैरे प्रदेश घेत आपली तीन दशकांची विजयाची मालिका संपन्न केली.  इब्न सौद हा एक करिष्माई नेता होता. अनेक समर्थक त्याच्या आवाहनासरशी शस्त्रसज्ज होऊन त्याच्या पाठीशी उभे राहत. त्याशिवाय त्याने स्थानिक धर्माधिकाऱ्यांच्या पसंतीने इखवान ही धार्मिक बंधुभाव जोपासणारी लष्करी संघटना बांधली. इखवानच्या मदतीने इब्न सौदने ऑटोमानच्या ताब्यातील अरब द्वीपकल्पातला बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्याखाली आणला. या काळात ऑटोमान साम्राज्य कमकुवत झाले असले तरी त्यांना अरब प्रदेशातला छोटा सत्ताधारी इब्न रशीद हा इब्न सौदचा कडवा विरोधक मदत करीत होता. इब्न सौदने या दोन्ही फौजांशी गनिमी काव्याने छापे टाकून बराचसा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला.

पहिल्या महायुद्ध काळात ब्रिटिश सरकारने इब्न सौदशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. अरबी लोक त्यांच्या या नेत्याला अब्दुल अझीझ या नावाने ओळखत, तर युरोपियन लोक इब्न सौद या नावाने. १९१५ मध्ये ब्रिटिशांनी इब्न सौदशी तह केला. या तहान्वये सौद घराण्याच्या सर्व प्रदेशांचे ब्रिटिश, संरक्षक झाले म्हणजेच आता सौदी प्रदेश ब्रिटनचे प्रोटेक्टोरेट बनले. इब्न सौदने त्याच्या अखत्यारीत असलेला पर्शियन आखाताचा किनारा आणि इराकी प्रदेशातल्या ब्रिटिश आधिपत्याला मान्यता दिली. सुवेझ कालव्यातून होणाऱ्या ब्रिटन आणि ब्रिटिश भारत दरम्यानच्या समुद्रमार्गातील वाहतुकीसाठी लाल समुद्राच्या किनाऱ्यावर जहाजांमध्ये कोळसा भरण्यासाठी थांब्यांची ब्रिटिशांना आवश्यकता होती. आणि त्यामुळे या अरबी प्रदेशाचे ब्रिटिशांना महत्त्व होते. इब्न सौदने ब्रिटिशांशी प्रोटेक्टोरेट म्हणून केलेला करार १९२७ मध्ये संपला. त्यानंतर राजे इब्न सौद यांनी आपले सामर्थ्य वाढवत १९३० पर्यंत अरब द्वीपकल्पातला बहुतेक प्रदेश, मक्का-मदिनाच्या हेजाझसह एकत्रीकरण करून तिथे सप्टेंबर १९३२ मध्ये ‘किंगडम ऑफ सौदी अरेबिया’ या नावाने राजसत्ता स्थापन केली. त्यांच्या या राजसत्तेला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि मदतही भरपूर प्रमाणात मिळाली.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
engineers design light weight ai jackets
कुतूहल : सीमेवरील सैनिकांचा सखा!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com