scorecardresearch

Premium

कुतूहल – भारतीय वस्त्रोद्योगाचे जगातील स्थान (भाग- २)

भारतीय वस्त्रोद्योग देशांतर्गत मागणी तर पूर्ण करतोच, पण मोठय़ा प्रमाणात निर्यातही करतो. परंतु मुख्यत: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही या उद्योगास मोठी संधी आहे.

कुतूहल – भारतीय वस्त्रोद्योगाचे जगातील स्थान (भाग- २)

भारतीय वस्त्रोद्योग देशांतर्गत मागणी तर पूर्ण करतोच, पण मोठय़ा प्रमाणात निर्यातही करतो. परंतु मुख्यत: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही या उद्योगास मोठी संधी आहे. जागतिक बाजारपेठेतील विविध देशांचा हिस्सा खालीलप्रमाणे :
याआकडेवारीवरून हे स्पष्ट होते की भारताचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा ४.१ टक्के आहे आणि त्या आधारावर भारताचा जगात चौथा क्रमांक आहे. पण पहिल्या क्रमांकावरील चीन (३५ टक्के) आणि दुसऱ्या क्रमांकावरील युरोपीय देश (२७ टक्के) यांच्यापेक्षा आपण खूप मागे आहोत. भारतात वस्त्रोद्योग सर्वात जुना उद्योग आहे, त्याचबरोबर विविध प्रकारची वस्त्रे  भारतात तयार होतात. या उद्योगात काम करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. निर्यातीसाठी  nav02लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान आता भारताकडे उपलब्ध आहे. या सर्व बलस्थानांचा फायदा घेऊन भारताला जागतिक बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवणे शक्य आहे. वस्त्रोद्योगातील उपलब्ध सर्व क्षमता वापरून आपण ही कामगिरी पार पाडू शकतो. आता सरकारी पातळीवरही निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्याचा फायदा घेऊन भारताने जागतिक बाजारात मोठी झेप घ्यायला हवी आणि आपले स्थान उंचावायला हवे. या बाबतीत भारताची अंतराळक्षेत्राची कामगिरी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवी. ती नक्कीच सर्वाना प्रेरणादायी आणि मोठी मजल मारायला आत्मविश्वास देणारी ठरेल यात शंका नाही. याचबरोबर निर्यातवाढीमुळे आपल्या देशाला आवश्यक अशा परकीय चलनाची मिळकत वाढेल. त्याचा फायदा आयात-निर्यात व्यापारातील तूट कमी करण्यासाठी होईल. ही कामगिरी देशहिताची ठरेल म्हणूनच याबाबतीत ठोस कृती करणे गरजेचे आहे.
चं. द.काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ब्रिटिशपूर्व राजकीय परिस्थिती
nav03ब्रिटिश लोक भारतात आले त्या काळात दोन हजारांहून अधिक संख्येने लहान मोठय़ा स्थानिक सत्तांनी सामाविष्ट असलेला हा खंडप्राय भूप्रदेश होता. या पकी बहुसंख्य सत्तांची कार्यक्षेत्रे अत्यंत लहान म्हणजे केवळ दहा चौरस किलोमीटर हूनही कमी होती. परंतु या सत्तांचे शासक स्वतला राजे म्हणवून घेत.. आणि स्वतच्या प्रदेशाला राज्य!
याचे एक उदाहरण म्हणजे तत्कालीन मद्रास इलाख्यात ‘पालायकार’ हा एक जमीनदारांचा वर्ग होता. त्यांच्याकडे केवळ एखादी जहागीर असे. परंतु या लहानशा प्रदेशावर त्यांचे अधिराज्य चालत असे आणि ते स्वतला राजे म्हणवून घेत. बंगाली आणि बिहारी जमीनदारही स्वतला  त्यांच्या-त्यांच्या टापूचे ‘राजे’च म्हणवत.
पुढे अशा प्रकारच्या छोटय़ा शासकांचे ब्रिटिशांनी जमीनदार, जहागीरदार असे वर्गीकरण करताना यापैकी काहीजण इंग्लंडमधील उमरावांच्या बरोबरीचे ठरविले जाऊ शकतात, हे ओळखले. बंगालमध्ये अशा छोटय़ा शासकांना त्यांच्या महसूल गोळा करण्याच्या अधिकारामुळे तालुकदार किंवा तहसिलदार म्हणूनच वागविण्याचे ब्रिटिशांनी. अशा प्रकारे ब्रिटिशांनी, संस्थानिक आणि अन्य हे वर्गीकरण प्रथम केले. या असंख्य लहान मोठय़ा राज्यकर्त्यांपकी  दिल्ली, अवध, रोहिलखंड, बंगाल, हैदराबाद, कर्नाटक, म्हैसूर, भोपाळ, जुनागढ, सुरत इत्यादी ठिकाणचे बहुसंख्य राज्यकत्रे मुस्लीम होते. पंजाब आणि सरिहद या राज्यांचे शासक शीख होते. सातारा, कोल्हापूर, इंदूर, ग्वाल्हेर, राजपुताना, काठियावाड, बुंदेलखंड, ओरिसा, मध्यभारत, मद्रास आणि केरळ या राज्यांचे बहुसंख्य शासक हिंदू धर्मीय होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2015 at 01:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×