scorecardresearch

भाषासूत्र : षष्ठयब्दि नव्हे, षष्टयब्दी..

आणखी एक चूक ब्दि  या ऱ्हस्व अक्षराची. अब्दी हे दीर्घान्त अक्षर बरोबर आहे, कारण अब्द शब्दाचे स्त्रीिलगी रूप अब्दी आहे.

marathi words
(संग्रहित छायाचित्र)

‘माझ्या बाबांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा षष्ठय़ब्दिपूर्तीचा समारंभ आम्ही उद्या करणार आहोत. तुम्ही सर्वानी या समारंभाला अवश्य यायचं बरं का.’

या वाक्यांपैकी दुसऱ्याच वाक्यात एका चुकीच्या शब्दाची योजना केली आहे. तो शब्द आहे- षष्ठय़ब्दिपूर्ती. या शब्दाची फोड करून पाहू या आणि त्याचा अर्थही जाणून घेऊ या. हा शब्द संस्कृतातून स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. हा सामासिक शब्द आहे. हे वाचकांच्या लक्षात आले असेल. याची फोड- षष्ठी अब्दी पूर्ती पहिला शब्द षष्ठी या शब्दाचा अर्थ आहे सहा (६). या शब्दाचे स्त्रीिलगी रूप आहे षष्ठी. अर्थ-सहावी, पंधरवडय़ातील सहावी तिथी, षष्ठी (सहावी) विभक्ती (प्रथमा, द्वितीया..षष्ठी) विभक्ती म्हणजे नामाला, सर्वनामाला लागणारे प्रत्यय. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय एकवचन- चा, ची, चे अनेकवचन चे, च्या, ची (चे- एकवचन, ची-अनेकवचन) षष्ठी+अब्द =षष्ठय़ब्द. अब्द म्हणजे वर्ष. षष्ठय़ब्द = सहा वर्षे पुढचा (येथे शेवटचा) शब्द आहे. पूर्ती (संस्कृत शब्द पूर्ति, मराठीत तो शब्दात शेवटी आल्यास दीर्घ लिहितात, जसे, पूर्ति (संस्कृत) पूर्ती- मराठी , अर्थ : पूर्णता. पूर्त (संस्कृत विशेषण) अर्थ : पूर्ण.) आता वरील वाक्यातील षष्ठय़ब्दिपूर्तीचा अर्थ पाहूया. अर्थ = सहा वर्षांची पूर्णता. आणखी एक चूक ब्दि  या ऱ्हस्व अक्षराची. अब्दी हे दीर्घान्त अक्षर बरोबर आहे, कारण अब्द शब्दाचे स्त्रीिलगी रूप अब्दी आहे. पूर्ती-पूर्तता या स्त्रीलिंगी नामाचे ते विशेषण आहे.

वरील वाक्याचा अर्थ काय होईल? ‘बाबांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण (वर्षांची पूर्णता)! म्हणजे षष्ठय़ब्दी’ हा शब्दच चुकीचा आहे,

आता योग्य शब्दयोजना अशी आहे- षष्टय़ब्दीपूर्ती. षष्ट म्हणजे साठ (६०), षष्टी + अब्दी = षष्टय़ब्दी + पूर्ती = षष्टय़ब्दीपूर्ती. अर्थ आहे- (माणसाच्या) वयाला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने होणारा समारंभ – षष्टय़ब्दीपूर्तीचा समारंभ.

असाच आणखी एक शब्द रूढ आहे- जन्मशताब्दी- जन्मशताब्दीपूर्ती (समारंभ)

यास्मिन शेख

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about marathi words marathi language learning sentence in marathi zws