‘माझ्या बाबांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा षष्ठय़ब्दिपूर्तीचा समारंभ आम्ही उद्या करणार आहोत. तुम्ही सर्वानी या समारंभाला अवश्य यायचं बरं का.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वाक्यांपैकी दुसऱ्याच वाक्यात एका चुकीच्या शब्दाची योजना केली आहे. तो शब्द आहे- षष्ठय़ब्दिपूर्ती. या शब्दाची फोड करून पाहू या आणि त्याचा अर्थही जाणून घेऊ या. हा शब्द संस्कृतातून स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. हा सामासिक शब्द आहे. हे वाचकांच्या लक्षात आले असेल. याची फोड- षष्ठी अब्दी पूर्ती पहिला शब्द षष्ठी या शब्दाचा अर्थ आहे सहा (६). या शब्दाचे स्त्रीिलगी रूप आहे षष्ठी. अर्थ-सहावी, पंधरवडय़ातील सहावी तिथी, षष्ठी (सहावी) विभक्ती (प्रथमा, द्वितीया..षष्ठी) विभक्ती म्हणजे नामाला, सर्वनामाला लागणारे प्रत्यय. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय एकवचन- चा, ची, चे अनेकवचन चे, च्या, ची (चे- एकवचन, ची-अनेकवचन) षष्ठी+अब्द =षष्ठय़ब्द. अब्द म्हणजे वर्ष. षष्ठय़ब्द = सहा वर्षे पुढचा (येथे शेवटचा) शब्द आहे. पूर्ती (संस्कृत शब्द पूर्ति, मराठीत तो शब्दात शेवटी आल्यास दीर्घ लिहितात, जसे, पूर्ति (संस्कृत) पूर्ती- मराठी , अर्थ : पूर्णता. पूर्त (संस्कृत विशेषण) अर्थ : पूर्ण.) आता वरील वाक्यातील षष्ठय़ब्दिपूर्तीचा अर्थ पाहूया. अर्थ = सहा वर्षांची पूर्णता. आणखी एक चूक ब्दि  या ऱ्हस्व अक्षराची. अब्दी हे दीर्घान्त अक्षर बरोबर आहे, कारण अब्द शब्दाचे स्त्रीिलगी रूप अब्दी आहे. पूर्ती-पूर्तता या स्त्रीलिंगी नामाचे ते विशेषण आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about marathi words marathi language learning sentence in marathi zws
First published on: 27-06-2022 at 04:09 IST