जलजागर आंतरराष्ट्रीय जल क्षेत्र आणि जल साक्षरता या दोन क्षेत्रांत महनीय कार्य असणारी व्यक्ती म्हणजे स्टॉकहोम पारितोषिक विजेते डॉ. माधवराव चितळे. डॉ. माधवरावांनी जल साक्षरतेचे धडे त्यांच्या अनेक शिष्यांना दिले आणि समाजाच्या तळागाळापर्यंत जात लोकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व समजावून देण्यास सांगितले. गुरुआज्ञा तंतोतंत पाळणारे त्यांचे एक शिष्य म्हणजे डॉ. दत्ता देशकर. त्यांचा जन्म १५ जून १९३९ रोजी झाला. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेले देशकर शासकीय सेवेमधून सन्मानाने मुक्त झाल्यानंतर डॉ. माधवराव चितळे यांच्या संपर्कात आले आणि जलसेवेसाठी समर्पित झाले. त्यांनी डॉ. चितळे यांच्याबरोबर दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या पाणी समस्येवर काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वतंत्रपणे पाणी क्षेत्रास वाहून घेऊन विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले. आजच्या घटकेपर्यंत डॉ. देशकर हे एक लाखापेक्षाही जास्त शाळकरी मुलांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात यशस्वी झाले आहेत.

ते फक्त विद्यार्थ्यांनाच पाण्याविषयी जागरूक करून थांबले नाहीत तर त्यांची ‘एकला चलो रे’ ही जलिदडी महाराष्ट्राच्या अनेक गावांत, कानाकोपऱ्यांत पोहोचवली. त्यांनी हजारो शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजावून दिले. पाणी हा महिलांसाठी कायम संवेदनशील विषय तोही मराठवाडय़ासारख्या दुष्काळी भागासाठी जास्तच. डॉ. देशकर यांनी या भागात जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक महिला शिबिरांत महिलांना मार्गदर्शन केले. जलशिक्षण हेच आपणास खऱ्या अर्थाने जलसुरक्षा देऊ शकते या घोषवाक्यास अधोरेखित करत देशकरांनी डॉ. माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जलसंवाद’ हे मराठीमधील फक्त पाणी या विषयास वाहिलेले मासिक २००५ साली सुरू केले आणि आजही ते तेवढय़ाच उमेदीने समाजाच्या सर्व थरांमधील वाचकांना पाण्याविषयी जागरूक करत आहेत. आजपर्यंत ‘जलसंवाद’चे २२० अंक प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. देशकर जल साक्षरतेसाठी २४ तास प्रसारित होणारा ‘जलसंवाद’ रेडिओसुद्धा चालवतात.

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

या जलपुरुषाने साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. त्यांची जल साक्षरता आणि जल सुरक्षितता यावरील अनेक पुस्तके महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली आहेत. अन्नाच्या गरिबीपेक्षाही पाण्याची गरिबी असणे ही त्या राष्ट्रासाठी फार मोठी शोकांतिका आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतासारखा पवित्र मानला तरच पाणी प्रश्न सुटू शकतो, असे त्यांचे ठाम मत आहे. पुणेकर डॉ. दत्ता देशकर आजही वयाच्या ८३व्या वर्षी तेवढय़ाच उत्साहात जलजागर करून युवकांना जलसंवादामध्ये सहभागी करून घेत आहेत.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org