नवदेशांचा उदयास्त : सध्याचे ताजिकीस्तान

पुढे मिखाइल गोर्बोचेव्ह हे सोव्हिएत प्रमुख झाले. त्यांच्या ग्लासनोक्त म्हणजे पारदर्शकता आणि पेरेस्त्रायका म्हणजे पुनर्बांधणी या धोरणांमुळे ताजिकी लोक खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले.

ताजिकीस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष एमोमाली रहमान

जोसेफ स्टालीन सोव्हिएत युनियन प्रमुख झाला आणि त्याने ताजिकीस्तानचे रुसीकरण सुरू केले. स्टालीनने त्याच्या विरोधकांपैकी दहा हजार ताजिकींना हद्दपार करून तेवढ्याच रशियन लोकांना ताजिकीस्तानच्या महत्त्वाच्या सरकारी पदांवर नेमले आणि कम्युनिस्ट पक्षात घेतले. दुसऱ्या महायुद्धात अडीच लाख ताजिकी तरुण रशियन फौजांमधून जर्मनीविरुद्ध लढले आणि त्यापैकी दीड लाख मारले गेले. या महायुद्धात १९३९ साली सोव्हिएत प्रमुखांनी ताजिकी तरुणांना सक्तीने सोव्हिएत रेड आर्मीत भरती होण्यास लावले. या युद्धात साधारणत: अडीच लाख ताजिकी जर्मनी, जपान व फिनलॅण्डविरुद्ध लढले. हे युद्ध लढताना साधारणत: दीड लाख ताजिकी सैनिक आणि सामान्य नागरिक मारले गेले. या घटनांमुळे ताजिकी लोकांच्या गटांमध्ये सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून स्वतंत्र ताजिकीस्तान स्थापन करायचा विचार पुढे आला आणि अनेक ठिकाणी शांततापूर्वक आंदोलने सुरू झाली. स्टालीनने या आंदोलनकर्त्यांवर गोळ्या झाडून हे आंदोलन दडपून टाकले, त्यात १२०० लोक मारले गेले.

पुढे मिखाइल गोर्बोचेव्ह हे सोव्हिएत प्रमुख झाले. त्यांच्या ग्लासनोक्त म्हणजे पारदर्शकता आणि पेरेस्त्रायका म्हणजे पुनर्बांधणी या धोरणांमुळे ताजिकी लोक खुलेपणाने स्वातंत्र्याची मागणी करू लागले. १९८८ च्या सुमाराला सोव्हिएत युनियनही मोडकळीला आले. अखेरीस ९ सप्टेंबर १९९१ रोजी ताजिकी नेत्यांनी सोव्हिएतमधून बाहेर पडून ताजिकीस्तान एक स्वायत्त, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा केली. स्वातंत्र्याची घोषणा झाल्यावर लगेचच निरनिराळ्या गटांमध्ये यादवी युद्ध सुरू होऊन अनागोंदी माजली. या गोंधळातच नोव्हेंबर १९९४ मध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी एमोमाली रहमान हे निर्वाचित झाले. १९९४ साली राष्ट्राध्यक्ष झालेले रहमान हे पुढच्या सर्व निवडणुका जिंकून सध्याही ते ताजिकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत! १९९१ मध्ये सुरू झालेली यादवी नियंत्रणात आणण्यासाठी पुढची पाच वर्षे गेली. सध्या ताजिकीस्तानची अर्थव्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था रशियाच्या मदतीवर अवलंबून आहे. त्याशिवाय शेजारच्या अफगाणिस्तानमधून होणारी अमली पदार्थाची चोरटी आयात आणि इस्लामी स्टेट चळवळीचा होणारा उपद्रव यावर काबू करण्यासाठी ताजिकींना मास्कोची मदत घ्यावी लागते. अलीकडे चिनी कंपन्यांनीही या देशात मोठी गुंतवणूक केली आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Joseph stalin head of the soviet union russianization of tajikistan akp

Next Story
इतिहासात आज दिनांक… ८ सप्टेंबर
ताज्या बातम्या