डॉ. संजय जोशी, मराठी विज्ञान परिषद

वटवाघळांमध्ये त्वचेचा अतिरिक्त पडदा हातांच्या रूपांतरित झालेल्या लांब बोटांच्या आधाराने पंखांसारखी उघडझाप करून उडण्याची क्रिया घडवून आणतो. पक्ष्यांमध्ये तर पुढचे पायच पंखांमध्ये रूपांतरित झाले आहेत. परंतु कीटकांमध्ये मात्र धावणे-पळणे, उडय़ा मारणे यासाठी पायांच्या तीन जोडय़ा आहेत, शिवाय उडण्यासाठी अतिरिक्त अवयव म्हणून पंखांच्या एक किंवा दोन जोडय़ा विकसित झाल्या आहेत. हे पंख वास्तवात वक्षाचा (थोरॅक्स) एक भाग आहेत. कीटकांचे पंख वजनाने हलके आणि दिसायला पातळ असले, तरी अतिशय मजबूत आणि शक्तिशाली असतात. पक्ष्यांप्रमाणेच संरक्षण, भक्षकापासून दूर जाणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे, जोडीदार शोधणे, ध्वनी निर्मिती (सिकाडा), दृश्य संप्रेषण (फुलपाखरे) यासाठी कीटकांना पंखांचा उपयोग होतो.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

विलक्षणरीत्या उत्क्रांत झालेले हे पंख जैव-अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहेत. या पंखांमध्ये अतिशय गुंतागुंतीची भौमितिक रचना असलेल्या बारीक आणि आतून पोकळ असलेल्या शिरांचे (व्हेन्स) जाळे असते. दोन ते तीन प्रमुख शिरा आणि केशिकांसारख्या (कॅपिलरी) त्यांच्या असंख्य शाखा-उपशाखा यांचे हे नाजूक जाळे असते. या जाळय़ातून रक्तप्रवाह सुरू असतो. याशिवाय मेंदूला जोडलेले मज्जातंतू तसेच श्वासनलिकादेखील या शिरांना जोडलेले असतात. या शिरांमुळे पंखांना एक प्रकारचा ताठपणा आणि बळकटी मिळते. विशेषत: उडताना अशा प्रकारचा ताठपणा आवश्यक असतो. या शिरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे माणसांच्या बोटांचे ठसे ज्याप्रमाणे भिन्न भिन्न असतात, त्याचप्रमाणे या शिरांच्या रचनेतदेखील कमालीचे वैविध्य आढळून येते.

अगदी एकाच कीटकाच्या डाव्या आणि उजव्या पंखांमधील शिरांची रचनादेखील एकसारखी नसते. एवढेच नाही तर या शिरांमधे काही विशिष्ट प्रकारची ज्ञानेंद्रियेदेखील असतात. वर्गीकरणशास्त्राच्या नियमांनुसार कीटकांचे वर्गीकरण करण्यासाठी शिरांची रचना हे एक महत्त्वाचे लक्षण ग्राह्य धरण्यात येते. विश्रांतीच्या काळातील पंखांच्या स्थितीतही कमालीचे वैविध्य आढळते. बहुतांश कीटकांमध्ये पंखांच्या दोन्ही जोडय़ा एकावर एक मिटलेल्या अवस्थेत संपूर्ण धड झाकून टाकतात. फुलपाखरे आपले दोन्ही पंख शरीरावर उभे करून ठेवतात. मधमाश्यांचे पंख शरीराच्या दोन्ही बाजूंस मिटलेल्या अवस्थेत असतात, तर चतुरसारख्या कीटकांचे पंख कायम दोन्ही बाजूंस पसरलेले असतात.