डॉ. बाळ फोंडके

रेल्वे स्थानकावर गाडी थांबली की त्या फलाटाच्या दोन्ही टोकांच्या ठिकाणी असलेल्या काँक्रीटच्या मोठय़ा पिवळय़ा रंगाच्या पाटय़ांवर हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील त्या स्थानकाचे नाव आणि त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची पातळी लिहिलेली तुम्हाला दिसली असेल. त्यावरून ते ठिकाण किती उंचीवर आहे, हे समजते. त्या माहितीचा फायदा रेल्वे खात्याला कशाप्रकारे होतो हे कळत नसले तरी ही समुद्रसपाटी मोजण्याचा खटाटोप केवळ त्यासाठीच केला जातो की काय, असा प्रश्न मनात उभा राहिला तर नवल नाही.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

त्याचे उत्तर मात्र नि:संदिग्धपणे देण्यात आलेले आहे. जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या वाहतुकीसाठी नसली तरी ही माहिती हवाई आणि सागरी वाहतुकीसाठी कळीची भूमिका बजावते. आपले विमान नेमके किती उंचीवरून उडत आहे याचे निदान करण्यासाठी वैमानिक विमानातील उपकरणाने दाखवलेल्या उंचीतून समुद्रसपाटीची उंची वजा करतो. विमानातल्या प्रवाशांसाठी योग्य दाब नियंत्रित करण्यासाठी हे निदान उपयोगी पडते. त्याशिवाय जमिनीवरच्या नियंत्रकांकडून वेळोवेळी किती उंचीवरून प्रवास करायला हवा याचे जे निर्देश येतात त्यांचे पालन करण्यासाठीही ती माहिती आवश्यक असते. यासाठी भारतात चेन्नईची समुद्रसपाटी शून्य मानली गेली आहे.

पृथ्वीचे अचूक नकाशे तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनाही या माहितीची गरज असते. त्या नकाशांचा उपयोग जहाजांचे कप्तान आपले जहाज हाकारण्यासाठी करतात. समुद्रसपाटीची माहिती हवामानाच्या अचूक अंदाजासाठीही उपयोगी ठरते. विशेषत: मान्सूनच्या अवघड अनुमानासाठी सतत बदलणाऱ्या या पातळीची माहिती अत्यावश्यक ठरते. भूगर्भशास्त्रज्ञही भूतकाळातील हवामानाविषयीची माहिती मिळवण्यासाठी तिचा उपयोग करतात. त्या त्या कालखंडांत या पातळीतील चढाव उतार कसे झाले याचा धांडोळा घेत भविष्यात तिची वर्तणूक कशी राहणार आहे, याचे निदान करण्यासाठी ती माहिती त्यांना उपयुक्त ठरते. जमीन सलग नाही. तिचे काही तुकडे पडलेले आहेत. त्यांनाच टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. भूगर्भातील द्रवरूप मॅग्मावर तरंगणारे हे भूखंड सतत हलत राहतात. त्यांच्या या भटकंतीचा परिणामही समुद्रसपाटीवर होत असतो. भूतकाळात झालेल्या या भूखंडांच्या भ्रमंतीचा समुद्रसपाटीवर काय आणि कसा परिणाम झाला याचा अभ्यास करून पृथ्वीचा इतिहास अधिक अचूकतेने समजणे शक्य होते. समुद्रसपाटीचा संबंध केवळ भूगोलाशीच नाही तर इतिहासाशीही आहे तो असा.