जोसेफ तुस्कानो

इंधनाच्या दरांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवाढीने जनतेस त्रस्त करणारी, वाहनांत वापरली जाणारी दोन प्रमुख इंधने म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल. ही इंधने वेगळी आहेत म्हणजे नेमके काय? याचा सामान्य माणसाच्या मनात संभ्रम असतो. काही दुचाकी, चारचाकी वाहनांचे इंजिन ठिणगी प्रज्वलन (स्पार्क इग्निशन) तत्त्वावर चालते, ही वाहने पेट्रोलवर चालतात. काही गाडय़ा, ट्रक-बससारखी जड वाहने, रेल्वे हे संपीडन प्रज्वलन (कंम्प्रेशन इग्निशन) प्रणालीवर चालतात, त्यांना डिझेल लागते. इंजिनाच्या रचनेप्रमाणे इंधनाची भौतिक आणि रासायनिक जडणघडण असते. त्यानुसार त्यांचे उत्कलनिबदू भिन्न असतात.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
coal production
कोळसा उत्पादनानं पार केला १ अब्ज टनचा टप्पा; आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार

पेट्रोल हे मुळात रंगहीन असते. त्याची सहज ओळख व्हावी म्हणून त्यांच्या वापरानुसार अल्प प्रमाणात लाल (साधारण वाहने), नारिंगी (उच्च तंत्रज्ञानाची वाहने) किंवा निळा (लष्करातील वाहने) रंग मिसळतात. डिझेलचा रंग  नैसर्गिक असतो. रशियातील खनिज तेलाच्या शुद्धीकरणापासून मिळणारे डिझेल रंगहीन (पाण्यासारखे) असते, तर आखातातील खनिज तेलातून मिळणारे डिझेल खाकी रंगाचे असते. आपल्याकडील खनिज तेलातून बाहेर पडणारे डिझेल पिवळसर रंगाचे असते. इंधनांची गुणवत्ता तपासताना पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक, तर डिझेलचा सीटेन क्रमांक मोजला जातो, कारण ते त्यांच्या इंजिनातील ज्वलनक्षमतेचे निर्देशांक असतात.

खरे तर स्वस्त व कमी प्रदूषणकारक म्हणून डिझेल इंधनाची ख्याती होती, मात्र ती हळूहळू खालावली. युरोप-अमेरिकेत २००१ ते २०१५ सालच्या दरम्यान आणि त्यानंतरही डिझेलवर धावणाऱ्या वाहनांच्या विक्रीत घट झालेली आढळली. कार्बन वायूच्या प्रदूषणापेक्षा डिझेल गाडय़ांच्या धुरातून बाहेर पडणारे नायट्रोजनची ऑक्साईड्स आणि हवेत तरंगणारे कण ही प्रदुषके कर्करोग, अ‍ॅलर्जी, फुप्फुसांचे रोग अशा व्याधींना कारणीभूत ठरत असल्याचे आढळले. त्यामुळे युरोपीयन युनियनने प्रदूषणाची नियमावली अधिक काटेकोर केली. सध्या युरो-४ ही प्रणाली अस्तित्वात आहे आणि त्यानुसार डिझेल गाडीतून प्रति किलोमीटर अंतरावर जास्तीत  जास्त ०.०८ ग्राम आणि पेट्रोल गाडीतून ०.६ ग्राम नायट्रोजनची ऑक्साईड्स हवेत सोडण्यास मुभा आहे. पुढे येणाऱ्या युरो-५ आणि युरो-६ नियमावलीत हे प्रदूषण याहूनही कमी होत आहे. तुलनात्मकदृष्टय़ा डिझेल गाडय़ांना पेट्रोलपेक्षा जास्त नायट्रोजनची ऑक्साईडस तर पेट्रोल गाडय़ांना डिझेलपेक्षा जास्त कार्बन वायू सोडण्यास मुभा आहे.