डॉ. नंदिनी विनय देशमुख, मराठी विज्ञान परिषद

आसाममधील ‘मिसिंग’ या आदिवासी जमातीत १९६३ मध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या सोळा-सतराव्या वर्षांपासून सातत्याने वनीकरण करणाऱ्या जादव मोलाई पायेंग यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. याच नावाचा त्यांच्याविषयीचा लघुपट २०१३ मध्ये आला, तर २०१५ मध्ये या कामाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली. माजुली जंगलात वन-कामगार असणाऱ्या पायेंग यांनी गेल्या काही दशकांत ब्रह्मपुत्र नदीच्या वालुकामय किनाऱ्यावर इतकी झाडे लावून जगवली की आसाममधील जोऱ्हाट जिल्ह्याचा कोकिळामुख भाग संपूर्ण जंगलमय झाला आहे. या मानवनिर्मित जंगलाला ‘मोलाई जंगल’ म्हटले जाते. एकूण ५५० हेक्टरवर वसलेले हे जंगल त्यांनी १९७९ पासून लावायला सुरुवात केली होती. एकदा या प्रदेशात खूप मोठय़ा संख्येने मेलेले साप त्यांनी पाहिले. मोठा पूर ओसरून गेल्यानंतर पसरलेल्या उष्णतेमुळे हे साप मरून पडले होते. त्या वेळी त्यांनी बांबूची वीस रोपे या वालुकामय प्रदेशावर लावली आणि नंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने त्यांनी ‘अरुणाचापोरी’ नावाच्या भागात २०० हेक्टरवर झाडे लावायला सुरुवात केली. त्या वेळी ते केवळ एक मजूर होते. बाकीचे मजूर काम संपल्यावर निघून गेले, परंतु हे तेथेच थांबून झाडांची काळजी घेऊ लागले आणि स्वत:च्या कल्पनेनुसार आणखी झाडे लावू लागले.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

या मोलाई जंगलात आता ‘रॉयल बेंगॉल’ वाघ, भारतीय गेंडा, १०० हून अधिक विविध प्रकारची हरणे, सशांच्या जाती, असंख्य प्रकारचे पक्षी, गिधाडे आणि माकडे इत्यादी आढळून येतात. आता येथे हजारो झाडे सुखाने जगलेली दिसतात. या जंगलाला शंभर हत्तींचा कळप भेट देतो व तेथे सहा महिने सलग राहतो. त्यांची अपत्येदेखील या जंगलात जन्म घेतात. हरवलेल्या हत्तींच्या कळपाचा शोध घेत २००८ मध्ये वनाधिकारी या जंगलात आले. जादव पायेंग यांच्या परिश्रमांनी सारे वनखाते आश्चर्यचकित झाले. २०१३ साल गेंडय़ाची शिकार करायला आलेल्या शिकाऱ्यांनादेखील पायेंग यांनी तत्परतेने पकडून दिले. एवढेच करून पायेंग शांत बसलेले नाहीत तर अशाच प्रकारची जंगले ब्रह्मपुत्रेच्या इतर सर्व वालुकामय प्रदेशावर पसरवण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. स्वत: पायेंग जंगलातच एका छोटय़ा झोपडीत आपल्या बायको व तीन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे असलेल्या गुरांचे दूध विकून त्यांची उपजीविका चालते. जादव पायेंग यांच्या कार्यावर ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’सारख्या संस्था संशोधन करीत आहेत. अनेक माणसे मिळून वने उद्ध्वस्त करतात अशा या काळात, एका माणसाने संपूर्ण जंगल तयार केले आहे यापेक्षा सकारात्मक घटना ती कोणती!