डॉ. नंदिनी वि. देशमुख

परजीवी वागणे म्हणजे एका प्रजातीने दुसऱ्या प्रजातीचा फायदा घेत जगणे आणि ज्या यजमान प्रजातीचा फायदा घ्यायचा त्याचेच नुकसान करणे. अर्थात असा फायदा करून घेताना यजमान प्रजाती मरणार नाही याची काळजी असे सजीव घेतात. कारण यजमानाचा अंत झाला तर परजीवीदेखील प्राणाला मुकतो. यजमानाच्या शरीराबाहेर वास्तव्य करणारे बाह्यपरजीवी आणि अंतस्थ राहणारे अंत:परजीवी अशा दोन्हीचा यजमान प्रजातीला खूप त्रास होऊ शकतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

सागरी प्राणिसृष्टीमध्ये अशा परजीवी प्राण्यांचे प्रमाण मोठे असते. संधिपाद प्राण्यांपैकी क्रस्टेशिया वर्गातले आयसोपॉड आणि कॉपेपॉड या प्रजातीतील अनेकजण बाह्य परजीवी अनुकूलित झालेले असतात. आयसोपॉड प्राण्यांमध्ये प्रभावी चूषक, शक्तिशाली जबडे आणि चपटी शरीरे असतात,  त्यामुळे ते कायमच यजमान प्रजातीला चिकटून राहतात. आपल्या यजमान माशाचे रक्त आणि पोषक द्रव हे सतत शोषून घेतात. परंतु यामुळे यजमान माशांना रोग होतात. बाह्य परजीवी प्राण्यांच्या निर्मूलनासाठी असे ग्रस्त मासे, ‘क्लीनर फिश’सारख्या प्रजातींचा आधार घेतात.

हिंदी आणि प्रशांत महासागरात प्रवाळद्वीपावर राहणारे ‘लाब्रोइडेस’ नावाचे मासे ‘सफाई स्थानके’ निर्माण करतात. या सफाई स्थानकात परजीवी प्राण्यांपासून त्रस्त झालेले यजमान एकत्र येतात. हे सफाईकर्मी  मासे यजमानांच्या अंगावरचे परजीवी सजीव चावून बाजूला काढतात. ‘लॉगरहेड’ हे मोठय़ा डोक्याचे आणि जबरदस्त जबडे असलेले कासव कवचधारी प्राणी खातात. अशा कासवाच्या पाठीवर वनस्पती आणि प्राणी हे दोघेही ‘अपि-जीव’ आसरा घेतात. ते कासवांना त्रास देत नाहीत, पण ‘ओझोब्रान्क्स’ ही समुद्र जळू मात्र कासवाच्या कवचातून बाहेर येणाऱ्या अवयवांचा खाद्य म्हणून वापर करते. शिवाय आपली अंडीदेखील कासवाच्या अंगावर घालते. जळूची पिल्लेही कासवाच्या पाठीवर वाढू लागतात. अति प्रमाणात अंडीपिल्ली झाली तर ते कासव मरण पावते. याउलट गोगलगायीसारखे शंख असलेले  मृदुकाय प्राणी आणि शैवालाच्या काही प्रजाती कासवाच्या पाठीवर सुखाने राहतात. काही समुद्र कासवे जळवांच्या त्रासांपासून सुटका करून घेण्यासाठी प्रवाळद्वीपावर जातात. तेथले सफाईकर्मी मासे कासवाची पाठ घासूनपुसून लख्ख करतात. त्यात उपद्रवी जळवापण जातात आणि निरुपद्रवी शैवालही!

Story img Loader