मानवाचा सागराशी संबंध मूलत: दोन कारणांनी येतो. पहिले कारण मासेमारी आणि दुसरे कारण सागरी मार्गाने चालणारे दळणवळण. फार फार वर्षांपूर्वी फिनलँडमधील फिनिशियन आणि नंतर ग्रीक मंडळींना पृथ्वी हा भूमध्य समुद्राच्या सभोवताली असणारा जमिनीचा चपटा तुकडा वाटत असे, आणि याभोवती जो समुद्र होता त्याला ते ‘ओशनस फ्लुवियस’ असे म्हणत. प्राचीन काळातल्या इजिप्शियन लोकांनादेखील असेच काहीसे वाटत होते.
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या पलीकडे त्या काळात ग्रीक पोहोचले होते. सारगॅसो समुद्राला वळसा घालून ते आफ्रिकेभोवतीदेखील फिरून आले होते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात पायथागोरसने पृथ्वीच्या गोलपणाबद्दल ठासून सांगितले आणि नंतर सन १५०च्या सुमारास अक्षांश आणि रेखांश या संकल्पनादेखील अस्तित्वात आल्या. तरीही तोपर्यंत अमेरिकन खंड आणि प्रशांत महासागर याची कल्पना तत्कालीन मानवाला नव्हती. मध्ययुगापर्यंत थोडी प्रगती होऊन सातव्या शतकात युरोप आणि आफ्रिका या खंडांकडे समुद्रमार्गे जाण्याची सुरुवात झाली होती. व्हायकिंग्सनी सन ७७०मध्ये आइसलँड आणि सन ८३५मध्ये ग्रीनलँडचा शोध लावून तेथे वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली होती.

९८२सालापर्यंत कॅनडातील बॅफिन बेटावरदेखील युरोपीय लोक पोहोचले होते. पूर्वेकडे अरबस्तानातील लोक भारताकडे आणि तेथून पुढे चीनमध्येदेखील प्रवास करून जाऊ लागले होते.भारतीयांनीदेखील तोपर्यंत समुद्रसफारी करण्यास सुरुवात केली. चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अनेक शोध लागले. १४८७ मध्ये बार्थोलोम्यू डायाजने ‘केप ऑफ गुड होपला’ वळसा घातला. तसेच १४९२मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून वास्को दि गामा भारतात १४९९मध्ये पोहोचला तर १५३३मध्ये प्रशांत महासागराचा पूर्व किनारा वास्को न्युनेज बल्बोवा याने शोधला. १५५१मध्ये मॅगेलन याने प्रशांत महासागराची संपूर्ण फेरी पूर्ण केली आणि १५२२मध्ये त्याने पृथ्वी प्रदक्षिणादेखील पूर्ण केली. त्या काळातील दर्यावर्दी पाश्चिमात्य समुद्र, अरुंद (नॅरो) समुद्र, सेवन सीज, अशी नावे वापरत असत. या सप्तसिंधूत आक्र्टिक, उत्तर आणि दक्षिण अटलांटिक, पूर्व आणि दक्षिण प्रशांत महासागर, हिंदी महासागर आणि अंटाक्र्टिक महासागर तसेच भूमध्य समुद्र यांचा समावेश होतो. तसे पाहिले असता संपूर्ण महासागर हा एकच मोठा जलौघ आहे. आपण मानवांनी त्याला विविध नावे दिली आहेत. अजूनही महासागराचा ८० टक्के अभ्यास बाकी आहे असे म्हटले जाते. अर्थात, देशोदेशी यावर संशोधन चालू आहे.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!

डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org