डॉ. नंदिनी विनय देशमुख, मराठी विज्ञान परिषद

मुंबईतल्या राणीच्या बागेला म्हणजेच जिजाबाई उद्यानाला नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली. येथील प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान या दोन्हीचा उपयोग अनेक जण गेली कित्येक वर्षे निसर्ग शिक्षणासाठी करत आहेत. पर्यावरणवादी आणि प्राणिप्रेमी यांच्या दृष्टीने प्राणिसंग्रहालय हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. कारण येथील बंदिस्त वातावरण प्राण्यांच्या नैसर्गिक जीवनाशी सुसंगत नसते. काही प्राणिसंग्रहालयांत मात्र शक्य तितक्या प्राण्यांना नैसर्गिक अधिवास देण्यात येतो. राणी बागेत अलीकडेच झालेल्या सुधारणांमुळे येथील प्राणी-पक्षी चांगल्या स्थितीत आहेत. विशेषत: पक्षी आणि पाणथळ जागेत राहणाऱ्या पक्ष्यांचे सुंदर अधिवास चांगल्या नियोजनाचे द्योतक आहे. हिमप्रदेशात राहणाऱ्या पेंग्विनचा निवारा येथील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. निसर्ग समजून घेताना लहान वयात प्राणिसंग्रहालयाला भेट दिली तर प्राण्यांची माहिती सहज मिळते. शिवाय प्राणी प्रजातींच्या संवर्धनाचा ‘एक्स-सिटू’ पर्याय (नैसर्गिक अधिवासांव्यतिरिक्त अन्यत्र संवर्धन) देखील प्राणिसंग्रहालयामुळे पूर्ण होतो.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

राणीच्या बागेची स्थापना १८६१ मध्ये झाली. ‘अ‍ॅग्री-हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेने ‘व्हिक्टोरिया गार्डन’ या नावाने वनस्पती उद्यान म्हणून याची स्थापना केली. ब्रिटिश राजवटीतील हा पहिला सार्वजनिक प्रकल्प होता. व्हिक्टोरिया गार्डनची उभारणी १८६१ मध्ये होत असताना जगन्नाथ शंकरशेट, सर डेव्हिड ससून, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. जॉर्ज बर्डवूड आणि सर जमशेदजी जिजीभाई या मान्यवरांचा त्यात सहभाग होता. प्राणिसंग्रहालय १८९० मध्ये सुरू झाले. १९६९ मध्ये व्हिक्टोरिया गार्डनचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले. तर १९८० मध्ये याच नावाने प्राणिसंग्रहालय विस्तारित करण्यात आले.

या उद्यानाला ‘वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान’ म्हणतात. कारण गेली १५० वर्षे येथील विविध वनस्पतींना संरक्षण मिळालेले आहे. येथे ५४ वनस्पती कुलांमधील २५६ प्रजातींचे चार हजार १३१ वृक्ष असून त्यातील काही भव्य वृक्ष १०० वर्षांपासून येथे स्थित आहेत. मध्य मुंबईत असणारा इतका मोठा वृक्षसमूह आज शहराचे एक आकर्षण केंद्र आहे. मुंबईतील अनेक महाविद्यालयांतील वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे भेट देऊन या वनस्पतींचा अभ्यास करतात. या वनराईमुळे नैसर्गिक अधिवास निर्माण होऊन अनेक छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक अशा जीवांची नैसर्गिक परिसंस्थादेखील येथे निर्माण झाली आहे. तर जपानी उद्यान, गुलाब उद्यान, फुलपाखरू उद्यान अशा विविध प्रकल्पांमुळे निसर्गसौंदर्यात वाढ झाली आहे. या उद्यानातील ४६५ वनस्पतींचे नमुने सेन्ट झेवियर्स महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत.