समुद्रकिनारी सहलीला जाताना सुरक्षित किनाऱ्याची निवड हा कळीचा मुद्दा ठरतो. खडकाळ किनाऱ्यावर सागरी पाण्याच्या खोलीचा अंदाज हमखास चुकतो. त्यामुळे सहलीसाठी असे किनारे टाळावेत. उदाहरणार्थ, मुरुड- जंजिरा किल्ल्याजवळील खडकाळ किनारा धोकादायक आहे. तसेच काही वालुकामय किनारे अत्यंत असुरक्षित आहेत. जिथे पाण्याचा रंग नितळ हिरवा किंवा गडद निळा दिसतो असे किनारे खोल पाण्याचे असतात, तिथे पाण्यात उतरणे टाळावे. किनाऱ्यापासून किती अंतरावर लाटा सुरू होतात, यावरून किनाऱ्यापासून पाणी किती खोल आहे हे समजते. लाट जेवढय़ा अधिक दूरवरून सुरू होतात, तेवढे अंतर पोहण्यासाठी सुरक्षित समजावे. पण स्थानिक व्यक्तींकडून माहिती घेण्याने अधिक मदत होते. उदाहरणार्थ, ओहोटीच्या वेळी अलिबाग किंवा मालवण येथे लांबपर्यंत उथळ पाण्यातून चालत जाता येते. असे किनारे अधिक सुरक्षित असतात.

ज्या ठिकाणी नदी समुद्रास मिळते अशा खाडीच्या मुखात नेहमी गाळ साठलेला असतो. खारफुटी वाढलेली असते. तेथे गाळात पाय रुतण्याची शक्यता असते. असे किनारे टाळावेत. गाळात रुतलेल्या व्यक्तीस बाहेर काढणे अत्यंत धोकादायक असते. ज्या ठिकाणी गाळ साठलेला असतो तिथे पाण्याची डबकी असतात. अशा डबक्यांतून पाय किती खोल जातो, याची खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नये. जामनगरजवळील ‘सिक्का बेट’ फसव्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी स्थानिक व्यक्तीशिवाय जाण्याचे धाडस करू नये. खडकाळ किनाऱ्यावर पायात सुरक्षित रबरी आणि न घसरणारी पादत्राणे जरूर वापरावीत. खडकावर वाढणारी धारदार कालवे, बार्नकल हे संधिपाद प्राणी यांच्या कवचामुळे जखमा होतात. पाण्यातून बाहेर आल्यावर त्यातून वाहणारे रक्त पाहिल्यावर जखम झाल्याचे समजते. पडताना आधारासाठी हात टेकताना हात फाटतो. अशा वेळी किनाऱ्यावर जाताना प्रथमोचार साहित्य हाताशी बाळगावे. विद्यार्थ्यांची सहल न्यायची असल्यास ज्या व्यक्तीस सागरसहलीचा पूर्वानुभव आहे अशा व्यक्तीबरोबर नव्या व्यक्तीस पाठवल्यास त्याचे आपोआप प्रशिक्षण होते.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक
issue of redevelopment of old chawls buildings in colaba
समुद्रालगतच्या वस्त्या, इमारतींना विकासाची प्रतीक्षा

किनाऱ्यावर प्राणी एकसारखे पसरलेले नसतात, त्यामुळे त्यांचे अधिवास कशा प्रकारचे असतात याची माहिती मिळविणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रजात एका विशिष्ट पट्टय़ातच आढळते. तसेच हिवाळय़ाच्या सुरुवातीला किनाऱ्यानजीक जास्तीत जास्त प्राणी आढळतात. डोळसपणे समुद्रसहलीचे आयोजन केल्यास अपघात टाळता येतात. अननुभवी शिक्षकांमुळे त्यांच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.