महासागर ९० टक्के अतिरिक्त उष्णता शोषतो, तसेच मानवाने सोडलेल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडपैकी एकतृतीयांश स्वत:त साठवतो. परिणामी तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने कमी राहते. पण याचा परिणाम समुद्राच्या परिसंस्थेवर होतो. महासागरातील जैवविविधतेचा नाश होतो, समुद्रजलाचे आम्लीकरण होते आणि सागरात उष्णतेच्या लाटा येतात. या बदलांवर जगभरातील समुद्रशास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

त्यासाठी गेल्या काही वर्षांत विशेष उपकरणे निर्माण करण्यात आली आहेत. हवामानबदलामुळे मानवावर येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी अशा प्रकारच्या उपकरणांचा फायदा होणार आहे. अमेरिकेतील वूड्सहोल संस्थेचे शास्त्रज्ञ थेट ध्रुवीय समुद्रापासून ते संधिप्रकाशातील खोल सागरात काम करतील अशा उपकरणांचा वापर करून या बदलांवर लक्ष ठेवत आहेत. यातील दोन महत्त्वाची उपकरणे म्हणजे अर्गोफ्लोटस आणि पोलर सेंटीनेल्स.
अर्गोफ्लोटस वापरण्याची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती. याअंतर्गत जगभरातील महासागरात तरंगते रोबो सोडण्यात आले आहेत. सुमारे ३९०० रोबो सतत समुद्राच्या वरच्या थरांतील पाण्याचे तापमान, क्षारतेसारखे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तपासत असतात. २००० मीटरपेक्षा जास्त खोलीतील तापमानात आणि क्षारतेत काय बदल घडत आहेत, याची माहिती हवामान तज्ज्ञ आणि समुद्रविज्ञान संशोधकांना सतत पाठवली जाते. ही मुक्तपणे तरंगत जाणारी उपकरणे प्रादेशिक आणि जागतिक पातळय़ांवर महासागराचे तापमान, तेथील उष्णता, क्षारता, गोडय़ा पाण्याचे प्रमाण, समुद्राची खोली, प्रवाहांची माहिती, तसेच वरच्या आणि मधल्या थरांचा अभ्यास करतात. समुद्राच्या पृष्ठभागापासून २००० मीटर खोलीपर्यंत अर्गोफ्लोटस स्वत:च वरखाली करू शकतात.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

हिमातून आत पाठवलेल्या प्रोफायलर्सचे (आईस टेथर्ड प्रोफायलर्स) बाह्य स्वरूप पिवळय़ाधम्मक रंगाच्या एखाद्या मोठय़ा पिपांप्रमाणे असून या हिमाच्या पृष्ठभागावर तरंगत राहणाऱ्या पिंपांमध्ये समुद्रात होणारे बदल सतत तपासण्याची क्षमता असते. प्रत्येक उपकरणातून वजनदार धातूंची तार हिमाला पाडलेल्या ११ इंच व्यासाच्या छिद्रातून समुद्रात गेलेली असते. या तारेवरून वर-खाली जाणारे संवेदक समुद्राच्या विविध खोलीपर्यंत जातात. त्यांच्याकरवी तापमान, क्षारता आणि समुद्रजलाचे इतर गुणधर्म तपासण्यात येतात. यात मिळणारी विदा जहाजावर केलेल्या निरीक्षणांसोबत एकत्रित करून शास्त्रज्ञांच्या अभ्यासास पूरक माहिती मिळवली जाते.-

डॉ. नंदिनी विनय देशमुख,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org