Premium

कुतूहल : समुद्रातील ‘वलयांकित’

वलयी प्राणिसंघातील गांडूळ आपल्या परिचयाचा आहे. परंतु समुद्रात असणाऱ्या असंख्य प्रकारच्या वलयींबाबत आपण अनभिज्ञ असतो.

aarenikola
आरेनीकोला

डॉ. नंदिनी विनय देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वलयी प्राणिसंघातील गांडूळ आपल्या परिचयाचा आहे. परंतु समुद्रात असणाऱ्या असंख्य प्रकारच्या वलयींबाबत आपण अनभिज्ञ असतो. परापाद असणाऱ्या ‘पॉलिकीट’ प्रकारच्या वलयी प्राण्यांपैकी काही पोहू किंवा सरपटू शकतात, तर काही कायमच नळय़ांसारख्या घरात राहतात. ज्या किनाऱ्यांवर चिखल आणि वाळू यांचे मिश्रण असते, अशा ठिकाणी आजूबाजूच्या तुटक्या शंखांच्या छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांतून, तसेच इतर कचऱ्यातून नळय़ा तयार करून त्यांत वलयी राहतात. यातील काही नळय़ा मीटरभर लांब आणि १० ते १५ सेंटिमीटर रुंद असतात. नळीचा बहुतेक भाग समुद्रात खुपसलेला आढळतो. साधारण पन्नास वर्षांपूर्वी दादर चौपाटीवर अशा वलयी प्राण्यांच्या नलिका मोठय़ा प्रमाणात दिसत.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal sea animals in the sea polychaete animals arenicola ysh