scorecardresearch

कुतूहल : नळ आणि माकूळ

प्राचीन काळी ग्रीस व रोम देशांत या शाईचा उपयोग लिहिण्यासाठी करीत.  ‘सेपिया इंक’ या नावाने ती ओळखली जाते. 

kutuhal sepia aculeata needle cuttlefish and loligo duvauceli
माकूळ (कटलफिश- सेपिया अॅटक्युलियेटा) व नळ (स्क्विड- लॉलिगो डुवासेली)

नळ आणि माकूळ अपृष्ठवंशीय सागरी जलचर मृदुकाय संघातील असून ते ठरावीक लोकांचे आवडते सागरी अन्न आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या माकूळ (कटलफिश- सेपिया अ‍ॅक्युलियेटा) व नळ (स्क्विड- लॉलिगो डुवासेली) यांच्या निर्यातीतून आपल्याला परकीय चलन बऱ्यापैकी मिळते.

डोक्याभोवती भुजा, शरीराच्या तुलनेत जास्त मोठे डोळे आणि शरीराच्या आत कवच हे त्यांचे वैशिष्टय़. नळ आणि माकूळ यांच्या शरीररचनेतील काही फरक वगळता दोघेही सकृद्दर्शनी सारखेच दिसतात. माकूळ ५० सेंमीपर्यंत तर नळ १३०० सेंमीपर्यंत वाढतात. माकुळाच्या शरीरातील कवच हे काहीसे रुंद, सुरीप्रमाणे कडक असून नळाचे कवच ठिसूळ, पिसासारखे लांबट असते. माकुळाच्या संपूर्ण शरीराला मांसल पराने वेढलेले असते, तर नळाच्या शरीराच्या पार्श्वभागातच मांसल पर असतात. माकुळाचे हे कवच कॅल्शिअमयुक्त असून, त्याचा भुगा पाळीव पशू व पक्ष्यांच्या खाद्यात वापरतात. हे कवच उच्च तापमान सहन करू शकते व त्यावर सहजपणे कोरीव काम करता येत असल्याने त्यापासून दागिने बनविण्याचे साचे बनवतात.

bedbug outbreak in France
फ्रान्समध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव? ऑलिम्पिक आयोजनावर परिणाम होणार? नेमके वास्तव काय?
period pain relieving foods
Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; न्युट्रिशनिस्टनी सांगितल्या खास टिप्स….
thailand tourists came to see ganesh visarjan, mumbai ganesh visarjan, thailand tourists in mumbai, ganesh visarjan mumbai
Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी
ganeshotsav video in germany
VIDEO : सातासमुद्रापलीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा, जर्मनीत जपताहेत महाराष्ट्राची संस्कृती; व्हिडीओ एकदा पाहाच….

हेही वाचा >>> कुतूहल: हुशार खेकडा!

नळ व माकूळ शत्रूपासून बचाव करण्यासाठी, शिकार करताना, मीलनाच्या वेळेस परस्परांना आकर्षित करण्यासाठी त्वचेतील रंगपेशींच्या साहाय्याने स्वत:च्या त्वचेचा रंग, पोत व त्यावरील नक्षी बदलू शकतात. शत्रूची चाहूल लागताच, शरीरातील ग्रंथींमधून शाईसारखे काळे द्रव्य उत्सर्जित करून ढगासारखे वातावरण निर्माण करून त्यामागे लपून निसटतात किंवा भक्षकाला घाबरवतात. तर कधी शत्रूला हुलकावणी देण्यासाठी त्या शाईत शरीरातील चिकट द्रव मिसळून, स्वत:च्या शरीरासारखा आकार तयार करतात. प्राचीन काळी ग्रीस व रोम देशांत या शाईचा उपयोग लिहिण्यासाठी करीत.  ‘सेपिया इंक’ या नावाने ती ओळखली जाते. 

माकुळावरील संशोधनात आढळले की, आपण अगोदर काय व किती खाल्ले याचे स्मरण त्यांना असते व पुढच्या टप्प्यावर आवडीचे खाद्य मिळण्याची शक्यता असल्यास ते पोट रिकामे ठेवतात. खेकडे, कालवे, झिंगे, छोटे मासे हे त्यांचे खाद्य आहे. प्रजनन काळात नर मादीच्या शरीरात शुक्राणू सोडतो. पारदर्शी वेष्टनातील फलन झालेली अंडी मांदी खडकांच्या फटीत, रिकामी शिंपले, इत्यादी सुरक्षित ठिकाणी घालते. वाढ पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेली नळ व माकुळाची पिल्ले पाण्यात पोहू लागतात.

डॉ. सीमा खोत

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal sepia aculeata needle cuttlefish and loligo duvauceli zws

First published on: 16-11-2023 at 04:42 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×