डॉ. नागेश टेकाळे, मराठी विज्ञान परिषद

मृदुकाय वर्गातील द्विपुटी म्हणजे दोन कवच असणाऱ्या कालव प्राण्यांच्या शरीरातील कॅल्शियम स्रावापासून तयार झालेल्या शुभ्र चकाकणाऱ्या गोलाकार रचनेस मोती असे म्हणतात. शिंपल्यामधील प्राण्यासाठी मोती हे अनाहूतपणे आत घुसलेल्या वाळूच्या लहानशा कणापासून स्वरक्षण असले तरी आपल्यासाठी मात्र ते मौल्यवान प्राणिज रत्न आहे. निसर्गाच्या या आविष्कारामागच्या निर्मितीचा शोध आता विज्ञानाने घेतला आहे.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

शिंपल्यामधील वाळू अथवा त्यासम कचऱ्याच्या ओबडधोबड कणाभोवती एवढा सुंदर सारख्या आकाराचा गोलाकार मोती कसा तयार होत असेल हे शास्त्रज्ञांना पडलेले कोडे आता पूर्ण उलगडले आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ म्हणतात, शिंपल्यामधील मोत्याची निर्मिती ही गणिती नियमावर आधारलेली प्रक्रिया आहे. वाळूचा कण शिंपल्यामध्ये प्रवेश करताच आतील मृदुकाय प्राणी त्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्या कणाभोवती कॅल्शिअम काबरेनेट आणि प्रथिनांचे अनेक वर्तुळाकार थर तयार करतो. गंमत म्हणजे वाळूचा कण कसाही आणि कितीही विचित्र आकाराचा असला तरी त्याभोवताली तयार झालेली ही असंख्य वर्तुळे मात्र अतिशय सम प्रमाणात असतात म्हणूनच त्यातून गोलाकार तयार होतो.

शास्त्रज्ञांनी हिऱ्याच्या धारधार चाकूने मोत्याचा आडवा छेद घेऊन त्यास उजळून रामन स्पेक्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने त्याचा अभ्यास केला असताना त्यांना आढळले की हे वर्तुळाकार थर एक आड एक पद्धतीने जाड आणि पातळ असून प्रत्येक थराची सूक्ष्म जाडी मध्यिबदूपासून बाह्य अंगापर्यंत सारखीच आहे. अभ्यासासाठी वापरलेल्या मोत्यामध्ये शास्त्रज्ञांना ५४८ दिवसांत दोन हजार ६१५ वर्तुळाकार थर तयार झालेले आढळले. त्यावरून मोतीनिर्मिती ही प्रदीर्घ प्रक्रिया असून त्यात दिवस आणि वर्तुळसंख्या यांचाही संबंध आहे हे सुद्धा लक्षात आले.

मोत्याच्या चक्राकार थरांमधील सेंद्रिय घटक हा मानवनिर्मित तत्सम रासायनिक घटकांपेक्षा तब्बल तीन हजार पट कठीण आहे, म्हणूनच तो सौर ऊर्जापटले तसेच इतर उपकरणांमध्ये उष्णेतेचे प्रतिरोधक म्हणून वापरला जातो. अंतराळयान निर्मितीमध्येसुद्धा याचा उपयोग आहे. थोडक्यात शिंपल्यामधील गोलाकार शुभ्र मोती ही निसर्गाने मानवास दिलेली अनमोल भेटच आहे, मात्र या सुंदर आविष्कारावर यापुढे वातावरण बदलाचा परिणाम होईल का, हा संशोधनाचा विषय ठरावा.