यास्मिन शेख

ही वाक्ये वाचा- ‘आई आणि बाबा यांच्यात वाद झाले, की आई थोडय़ा वेळाने शांत होई. घरात जाऊन काहीतरी वाचत बसे. बाबा मात्र बाहेरच्या गॅलरीत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत.’या वाक्यांतील शेवटच्या वाक्यात एक शब्द चुकीचा योजला आहे. तो शब्द आहे- येरझाऱ्या. आता या येरझाऱ्या या शब्दाचे मूळ रूप पाहू या. येरझाऱ्या- (नाम, स्त्रीलिंगी, अनेकवचन). या शब्दाचे एकवचनी रूप होईल- येरझारा- (नाम, स्त्रीलिंगी, एकवचन) म्हणजे येरझारा (एकवचन)-येरझाऱ्या अनेकवचन! हा शब्दच चुकीचा आहे. योग्य शब्द आहे- येरझार (नाम, स्त्रीलिंगी, ए.व.)- येरझारा (नाम, स्त्रीलिंगी, अ. व.)- येरझाऱ्या हा शब्दच चुकीचा आहे. मात्र हे चुकीचे रूप अनेकदा ऐकायला आणि वाचायलाही मिळते. येरझार हा अकारान्त शब्द आहे. मराठीतील काही अकारान्त स्त्रीलिंगी नामे पुढे देत आहे. त्या शब्दांचे एकवचन-अनेकवचन अशी रूपे आपण पाहू या- (हे मराठी शब्द आहेत, तत्सम शब्द नव्हेत.)

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

नामे- अकारान्त, स्त्रीलिंगी- एकवचन आणि अनेकवचन :चूक-चुका, झुळूक- झुळुका, जाणीव-जाणिवा, जीभ-जिभा, टीप-टिपा, तारीख, तारखा, नजर-नजरा, वाट-वाटा, नेमणूक-नेमणुका इ.- तसेच येरझार-येरझारा (ऱ्या-चूक)

नामे- इकारान्त स्त्रीलिंगी- एकवचन आणि अनेकवचन : बातमी-बातम्या, तबकडी-तबकडय़ा, नवरी- नवऱ्या, पालखी- पालख्या, परडी- परडय़ा, मेहुणी-मेहुण्या, पाटली-पाटल्या, फणी-फण्या, फुशारकी-फुशारक्या, बरणी-बरण्या, वाटी-वाटय़ा, पातळी-पातळय़ा, पोळी-पोळय़ा, पुरी-पुऱ्या इ. (येरझार हा शब्द आहे-येरझारी असा एकवचनी शब्द नाही,त्यामुळे येरझाऱ्या हे अनेकवचन संपूर्णपणे चुकीचे आहे.) मराठी भाषकांनी अशी चूक करू नये, असे माझे आग्रहाचे सांगणे आहे.

तत्सम इकारान्त एकवचनी नामांची रूपे पुढे दिल्याप्रमाणे (मराठीतील प्रचलित रूपांपेक्षा वेगळी) होतात, हेही लक्षात घ्यावे. उदा. मूर्ती (एकवचन) मूर्ती (अनेकवचन), अभिनेत्री-अभिनेत्री, अतिवृष्टी-अतिवृष्टी, अनुभूती-अनुभूती, स्मृती-स्मृती, व्याधी-व्याधी, व्यक्ती-व्यक्ती इ.