आरोग्यसेवेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रोगनिदान. आवश्यकतेनुसार रुग्णाच्या अद्यायावत सिटीस्कॅन, एमआरआय, पेटस्कॅन, अल्ट्रा सोनोग्राफी अशा चाचण्या केल्या जातात. एमआरआयचे उदाहरण पाहू.

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग शरीरांतर्गत अवयवांचे तपशीलवार चित्र तयार करते. त्यासाठी हे यंत्र शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरी वापरते. ऊतींकडून मिळालेले रेडिओतरंगीय संकेत संगणकाला दिले जातात. आधुनिक संगणक या संकेतांचे गणितीय विश्लेषण करून त्यापासून सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करू शकतात. चुंबकआधारित अतिरिक्त संगणकीय तंत्रे वापरून त्रिमितीय प्रतिमादेखील मिळू शकतात.

loksatta kutuhal artificial intelligence empowered visual communication
कुतूहल : दृश्य संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
Loksatta kutuhal Maculochpitts neuron Intelligence
कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन
Shani Vakri 2024
Shani Vakri 2024 : शनि वक्री होताच ‘या’ राशींचे होऊ शकते आर्थिक नुकसान, वेळीच सावध व्हा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते..
loksatta analysis zika virus detected in pune patient how much risk of zika to human life
विश्लेषण: पुण्यात आढळले झिकाचे रुग्ण… झिकाचा धोका नेमका किती?
loksatta kutuhal sense of smell and artificial intelligence
कुतूहल : गंधज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
Weather forecasting and artificial intelligence models
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपे
Are you sleeping after 1 am? It can affect your mental health
Healthy sleep: तुम्हीही रात्री १ वाजता झोपता का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

एमआरआयने निर्माण केलेली चित्रे सामान्य आणि रोगग्रस्त ऊतींमधील, अवयवांमधील सूक्ष्म फरक देखील दाखवतात. अशा प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर फारच मोठा डेटा किंवा विदा निर्माण होते आणि शरीरांतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळतात. या निर्माण झालेल्या विदेचे आणि प्रतिमांचे पृथक्करण करून योग्य निष्कर्ष काढणे हे कसोटीचे काम असते. निष्णात डॉक्टर हे काम करू शकतात. परंतु हेच काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक अचूक आणि वेगाने केले जाऊ शकते. काही वेळा निष्णात डॉक्टरांच्या नजरेतूनही काही गोष्टी सुटू शकतात. त्यांना रोज शेकड्याने एमआरआय प्रतिमा पाहाव्या लागतात. त्यांच्यावर कामाचा भार असतो, त्यामुळे लहानसहान गोष्टी काही वेळा लक्षात येत नाहीत.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्राथमिक रोगनिदान

कृत्रिम बुद्धिमत्ता, विशेषत: सखोल शिक्षण अल्गोरिदम येथे उपयोगी पडतो. याला कृत्रिम बुद्धिमत्ता अधिष्ठित प्रतिमा ओळखणारे तंत्रज्ञान असे म्हणतात. सखोल शिक्षण अल्गोरिदम या प्रचंड विदेमधून, प्रतिमांमधून काही सूक्ष्म आणि जटिल आकृतीबंध काढू शकतो जो मानवी डोळ्याला सहजासहजी दिसणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता दमत नाही, थकत नाही. दिवसातले २४ तास काम करू शकते. जलद आणि अचूक निर्णय देऊ शकते आणि पुढील उपचार त्वरित सुरू करता येऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे एखाद्या रोगाचे पहिल्या टप्प्यात निदान होण्यास मदत मिळते. कारण अवयवांच्या ऊतींमधील सूक्ष्म बदलसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सहज कळू शकतात.

दुसरे उदाहरण अल्ट्रा सोनोग्राफीचे देता येईल. स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग फार मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचे लवकर निदान झाले तर रुग्णाला जीवनदान मिळू शकते. एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड वापरून स्तनाच्या कर्करोगाचे निदान करता येते. सखोल शिक्षण अल्गोरिदम वापरून अल्ट्रा सोनोग्राफी वापरून मिळालेल्या प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने अगदी अचूकपणे तपासता येतात आणि पटकन निदान करता येते.

बिपीन देशमाने

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org