मानवी बुद्धिमत्तेने होणाऱ्या शक्य तितक्या कृती अंकीय तंत्रज्ञानामार्फत प्रत्यक्षात घडवायच्या हा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचा गाभा आहे. त्यामुळे, शिक्षणक्षेत्राच्या विविध कार्य व्यवस्थांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जाणे हे स्वाभाविक आहे. शिक्षणात प्रभावी अध्यापन, संतुलित समावेशक प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका काटेकोर तसेच वस्तुनिष्ठपणे तपासणे आणि विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यमापन करणे  या कळीच्या बाबी मानल्या जातात. या प्रत्येक घटकासाठी मदत करणाऱ्या संगणकीय प्रणाल्या उपलब्ध होत आहेत. त्यांच्या बाबत इथे आणि पुढील भागांत जाणून घेऊ.

अध्यापनाला पूरक ठरतील अशा अनेक प्रणाल्या बाजारात आल्या आहेत. त्यापैकी कुठली प्रणाली दिलेल्या विद्यर्थी वर्गाला इष्टतम ठरेल याचा निर्णय घेण्यासही कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त वेगळी प्रणाली मदत करू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांची निवडक शैक्षणिक माहिती जशी की, मागील काही परीक्षांमध्ये त्यांना मिळालेले गुण आणि अध्यापनासाठी उपलब्ध विविध प्रणालींची तांत्रिक व इतर माहिती त्या मूल्यांकन प्रणालीला दिली की, ती शिक्षकांना योग्य अध्यापन प्रणाली निवडण्यास मदत करते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence in education amy
First published on: 10-06-2024 at 05:21 IST