आपल्यापैकी अनेकांनी चॅटजीपीटी वापरला असेल आणि कधी कधी ते खूप चुकीची उत्तरे देते हा अनुभवही घेतला असेल. अशी उत्तरे देताना त्याला भ्रम झालेला असतो, म्हणजेच तो हॅलुसिनेट झालेला असतो. चॅटजीपीटीची ही भ्रमिष्ट वागणूक इतकी गाजली की केंब्रिज डिक्शनरीने २०२३चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ‘हॅलुसिनेट’ हाच शब्द निवडला!

पण गंभीरपणे पाहायचे तर अब्जावधी शब्दांमधून शिकलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली अशा चुका का करत असेल? याचे एक कारण आहे की विचारलेला प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी निवडलेली माहिती यातील भाषा समजून घेताना या प्रणाल्या गोंधळू शकतात. त्यांना संदर्भ नीट समजला नाही तर त्या भलतेच उत्तर देतात. दुसरे कारण म्हणजे त्या प्रचंड प्रमाणात माहिती वापरतात आणि त्यातली काही चुकीची असू शकते. आपल्याकडील माहिती बरोबर आहे याची खात्री करून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. त्यामुळे त्यांची उत्तरे भरकटू शकतात. शिवाय आपणही अजून या प्रणाल्यांना नीट सूचना देण्यास सरावलेलो नाही. या साऱ्याचा परिणाम म्हणजे प्रणालींना होणारा भ्रम.

Sahil Singh's Inspirational Journey
Success Story: शाब्बास पोरा! लहान वयात घरची जबाबदारी; रस्त्याकडेला पर्सविक्रीपासून प्रोफेशनल फॅशन मॉडेलपर्यंतचा प्रवास; साहिल सिंगचा प्रेरणादायी प्रवास
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
Franklin Templeton India Asset Management Company Independent Director Pradeep Shah
बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा
ondc launches digital credit services
‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज
Mumbai, Bakeries, Pollution, Bombay Environmental Action Group, BEAG, Wood Fuel, PM10, PM2.5, Respiratory Diseases, E Division, K (West) Division, LPG, Sustainable Bakery Industry
मुंबईतील ४७.१० टक्के बेकरींमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर, बॉम्बे एन्व्हॉयन्मेंटल ॲक्शन ग्रुपचा अहवाल
kolkata murder rape polygraph test
Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?
Startups like Ola Electric Mobility FirstCry and Unicommerce which sold shares responded to the IPO
दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी

हेही वाचा >>> कुतूहल : रोबोटिक वाहने

काही वेळा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विसरतेही. दक्षिण कोरियातील एका संशोधक गटाने डीपफेक व्हिडीओ ओळखण्यासाठी एका प्रणालीला खूप उदाहरणे देऊन शिकवले. ती शिकून छान तयार झाली. नंतर काही महिन्यांनंतर तो गट दुसरे डीपफेक व्हिडीओ शिकवायला गेला तर प्रणालीला आधीच्या शिक्षणाचा साफ विसर पडल्याचे आढळले. नवीन माहिती शिकल्यानंतर आधीची माहिती पूर्णपणे विसरण्याच्या या प्रवृत्तीला आकस्मिक विसरणे (कॅटास्ट्रोफिक फरगेटिंग) म्हणतात. अर्थात असे क्वचित होते.

माणूस विसरण्याची अनेक कारणे असतात, पण भरपूर स्मृतिक्षमता वापरणाऱ्या प्रणाली कशा विसराळू होतील? त्याचे कारण न्युरल नेटवर्क प्रणालीच्या कार्यात दडले आहे. नवीन माहिती मिळाली की तिचा अर्थ लावण्यासाठी त्यात नवीन मार्ग रचले जातात. नवीन मार्ग तयार होताना जुने मार्ग नष्ट होणे शक्य आहे त्यामुळे प्रणाली विसरते. पण पुढचे पाठ मागचे सपाट ही परिस्थिती येऊ नये म्हणून नवीन काही शिकवताना अधूनमधून आधीची माहिती देत राहण्याचा उपाय त्यावर आहे. म्हणजे पुढचा धडा शिकण्याआधी आधीच्या धड्याची उजळणी.

अर्थात आजच्या भ्रम होणाऱ्या आणि विसरभोळ्या प्रणाली उद्या तशा राहणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक प्रगत होत जाईल तशा या अडचणी दूर होतील.

डॉ. मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org