जगभरात अनेक ठिकाणी समुद्रात प्रवाळ भित्तिका आढळतात, त्यापैकी ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ किंवा भारतातील अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप येथील प्रवाळ भित्तिका (कोरल रीफ्स) सर्वज्ञात आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे सर्वात जास्त परिणाम होणारी परिसंस्था म्हणूनदेखील याकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या महत्त्वाच्या प्रजाती वाढीव तापमानामुळे पांढुरक्या पडत आहेत. त्यालाच ‘कोरल ब्लिचिंग’ असे म्हटले जाते. समुद्री परिसंस्थांपैकी प्रवाळांची परिसंस्था महत्त्वाची मानली जाते, कारण येथे विविध प्रकारचे सागरी जीव आश्रयासाठी येतात. तसेच काही मत्स्य प्रजाती प्रजननासाठी येतात.

प्रवाळाच्या काही जातींपासून फार पूर्वीपासून लाल रंगांची रत्ने तयार केली जात होती. काही स्त्रिया अशा प्रवाळ अलंकाराचा नित्य वापर करतात. त्यांचा वापर केल्याने आरोग्य सुधारते असाही समज आहे. तसेच प्रवाळ-भस्म आयुर्वेदिक औषधांत वापरले जात असे. अलीकडच्या काळात प्रवाळापासून निरनिराळी जैवक्रियाशील संयुगे मिळू शकतात, हे लक्षात आले आहे.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
cheese
Health Special : फसवं चीज आपली फसवणूक करतं?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

प्रवाळ हे जैवक्रियाशील संयुगांचे समृद्ध स्रोत आहेत, म्हणूनच रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रांतील शास्त्रज्ञांचे लक्ष या प्रजातींनी वेधून घेतले आहे. ही संयुगे अर्बुद (टय़ुमर), क्षयरोग, अधिहर्षता (अ‍ॅलर्जी) तसेच विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यास मदत करतात. गोर्गोनियन कोरल या प्रजातीचा असा वापर केला जातो. डिटरपेनेस या प्रवाळांमधून काढल्या जाणाऱ्या संयुगामध्ये दाहशमन (अ‍ॅन्टी इन्फ्लेमेटरी) करण्याचे गुणधर्म आहेत. सीफॅन कोरलमध्ये असणाऱ्या फ्यूकोसाइड ई या संयुगात प्रतिजैविक क्रियाशक्ती असते. मृदू प्रवाळामध्ये आढळणारे मेथोप्टेरोसिन हे संयुग जखमा भरून निघण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते, म्हणूनच शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान हे संयुग असलेल्या औषधांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. सीन्यूलारिया या मृदू प्रवाळामधील सीन्यूलारिन या घटकामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. क्लोट्रिमेझोल हा प्रवाळांमध्ये आढळणारा घटक बुरशीनाशक औषधांमध्ये वापरला जातो. सॅक्रोफिटोन या जातीच्या प्रवाळामधील काही संयुगांमध्ये कोविड १९ विषाणुरोधक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. म्हणूनच अशा प्रवाळांच्या प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांकडून केले जात आहेत.

-हर्षल कर्वे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org